आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput CBI Inquiry Update | Rhea Chakraborty Mumbai Latest News | Central Bureau Of Investigation (CBI) Investigation Day 12th Day Today Live News Updates

सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीचा 12 वा दिवस:रियाच्या आईची प्रथमच चौकशी केली जात आहे, वडीलही सीबीआय कार्यालयात हजर; रियाला सलग 5 व्या दिवशीही समन्स बजावले जाऊ शकते

मुंबई20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आज सुशांतच्या घरी काम करणारे कर्माचारी आणि रिया-शोविक यांना समोरासमोर प्रश्न विचारू शकतात
  • अंमलबजावणी संचालनालय आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोसमवेत सीबीआयदेखील ड्रग्ज अँगलची चौकशी करत आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचा आज 12 वा दिवस आहे. रियाची आई संध्या चक्रवर्ती यांची सीबीआयकडून प्रथमच चौकशी केली जात आहे. रियाचे वडील इंद्रजितही सीबीआय कार्यालयात हजर आहेत. यापूर्वी असे वृत्त आले होते की, सीबीआय मंगळवारी पुन्हा रियाची चौकशी करेल. पण आता सांगितले जात आहे की, गरज पडल्यास रियाला बोलावले जाऊ शकते.

सुशांतच्या घरी काम करणारे कर्मचारी आणि रिया-शोविक यांना समोरासमोर प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुन्हा एकदा गौरव आर्यला चौकशीसाठी बोलावले आहे. गौरव आणि रियाच्या व्हॉट्सअ‍ॅपवरुन ड्रग्जची बाब समोर आल्यानंतर ईडी वेगळ्या कोनातून या प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणात ईडीने कुणाल जानी या नवीन व्यक्तीला चौकशीसाठी बोलावले आहे. रियाच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून कुणालचे नाव समोर आले आहे.

  • रिया ड्रग्जविषयी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे देऊ शकली नाही

सोमवारी सीबीआयने रिया आणि तिचा भाऊ शोविक यांची चौकशी केली. आयपीएस नुपूर शर्मा यांनी दोन्ही भावंडांना समोरासमोर प्रश्न विचारले. याशिवाय सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी, कुक नीरज सिंह आणि सीए रजत मेवाती यांचीही चौकशी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी रियाला ड्रग चॅट आणि होम पार्टीजवर प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची तिला योग्य उत्तरे देता आले नाही. सीबीआयने विचारलेल्या प्रश्नांवरुन रिया संतापली होती. तिचा अधिका-यांशी वाद झाल्याचेही सांगितले जात आहे.

  • पत्रकारांविरोधात दाखल केली तक्रार

रियाने पत्रकारांवर तिच्या बिल्डिंगबाहेर गर्दी केल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माध्यमांनी तिच्या मार्गावर अडथळा आणू नये आणि घटनात्मक हक्कांनुसार काम करावे, असे पोलिसांनी माध्यमांना सांगावे, अशी तिची इच्छा आहे. मुंबई पोलिसांच्या एका अधिका-याने ही माहिती दिली आहे.

0