आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांच्या जामीन अर्जावर आज मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार झाली. याप्रकरणी कोर्टाने शुक्रवारपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे रियाला आजची रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. दुसरीकडे रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी कोर्टामध्ये सांगितले की, चौकशी दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांच्या क्लायंटवर आरोप मान्य करण्यासाठी दबाव आणला होता.
1. चौकशीदरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने रियावर आरोप मान्य करण्यासाठी दबाव आणला.
2. रियाच्या चौकशीदरम्यान कोणतीही महिला अधिकारी हजर नव्हती.
3. रियाच्या अटकेची गरज नव्हती. तिच्या स्वातंत्र्यावर बंदी घातली गेली होती, तिला याप्रकरणात अडकवले जात आहे.
1. रियाच्या चौकशीदरम्यान प्रोटोकॉलची पूर्ण काळजी घेण्यात आली होती.
2. रियाविरूद्ध इलेक्ट्रॉनिक्स पुरावे आहेत.
3. ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या बर्याच लोकांनी रियाशी संपर्क साधल्याची कबुली दिली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या लॉकअपमधून रियाची रवानगी बुधवारी भायखळा कारागृहातील महिलांच्या जेलमध्ये करण्यात आली आहे. रियाने तुरुंगाच्या बॅरेक क्रमांक 1 च्या लॉकअपमध्ये पहिली रात्र घालवली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीना बोरा हत्या प्रकरणात अटक झालेल्या इंद्राणी मुखर्जीच्या बॅरेकच्या शेजारीच ही बॅरेक आहे.
मंगळवारी रियाला एनसीबीने अटक केली होती. त्यानंतर रात्री आठ वाजता तिचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे रिमांड घेण्यात आला. यावेळी तिला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यावेळी रियाच्या वकिलांनी तिला जमीन द्यावा म्हणून अर्ज केला होता. मात्र कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला. ही सुनावणी रात्री 10 पर्यंत चालली होती. नंतर रियाच्या वकिलांनी तिच्या जामिनासाठी कोर्टात अर्ज केला. त्यावर आज सुनावणी आहे.
रियाने जामीन मिळावा यासाठी मुंबई सेशन कोर्टात जवळपास 19 पानी जामीन अर्ज केला होता. यात तिच्या वकिलांनी तिची सविस्तर बाजू मांडली होती. “आपण निरपराध आहोत. आपल्याला या गुन्ह्यात अडकवण्यात आले आहे. यामुळे आपल्याला जामीन द्यावा,” असे तिने आपल्या जामीन अर्जात म्हटले.
“मी निरपराध आहे. मी कोणताही गुन्हा केलेला नाही. मला या गुन्ह्यात गुंतवण्यात आले आहे. माझ्याकडून कोणतेही ड्रग्ज जप्त करण्यात आलेले नाही. माझ्याविरोधात जी कलम लावण्यात आली आहेत ती जामीन पात्र आहेत. एनसीबीने माझ्या विरोधात कोणताही पुरावा नसताना वेगवेगळी कलम लावली आहेत. मी केवळ माझा बॉयफ्रेंड सुशांत सिंह राजपूत याच्या सांगण्यावरुन त्याला सेवन करण्यासाठी ड्रग्ज घेतले होते. मात्र, मला आता ड्रग्जच्या रॅकेटचा भाग असल्याचे दाखवले जात आहे'', असे रियाने आपल्या जामीन पत्रात म्हटले.
रियाच्या या अर्जावर आता शुक्रवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज तिला तुरुंगातच राहावे लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.