आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचा आज नववा दिवस आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिची आज पुन्हा चौकशी केली जाईल. थोड्याच वेळात ती डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहचेल. दरम्यान, मुंबई पोलिसांनी म्हटले आहे की, डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशीसाठी येताना आणि तेथून घरी परत जाताना रियाला सुरक्षा दिली जाणार आहे. तशी अपील सीबीआयने केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, रियाची सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंह आणि केशव बचनेर यांच्यासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे. तिघेही डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचले आहेत. मुंबई पोलिसांचे 3 अधिकारीही सीबीआयकडे पोहोचले आहेत.
दरम्यान, ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) देखील आज रियाला चौकशीसाठी बोलवू शकतो. एनसीबीने मुंबईत 2 ड्रग्ज पुरवठा करणा-यांना अटक केली आहे. मात्र ही कारवाई कोणत्या प्रकरणात झाली आहे ते अद्याप समोर आलेले नाही.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सुरू केल्याच्या आठव्या दिवशी शुक्रवारी सीबीआयने रिया चक्रवर्तीची 10 तास चौकशी केली. सीबीआय समन्सनुसार रिया बँक खाती आणि इतर कागदपत्रांसह सकाळी 11 च्या सुमारास चौकशीसाठी पोहोचली होती. सूत्रांनुसार, सीबीआयने रियाला सुशांतशी झालेली तिची पहिली भेट, घटनेआधी सुशांतशी झालेला वाद आणि पैशांच्या देवाणघेवाणीसह इतर अनेक प्रश्न विचारले. सुशांतचा फ्लॅटमेट राहिलेला सिद्धार्थ पिठानी, व्यवस्थापक सॅम्युअल मिरांडा हेही चौकशीत सहभागी झाले होते. रिया रात्री नऊच्या सुमारास डीआरडीओ गेस्टहाऊसमधून बाहेर पडली. तेथून तिने सांताक्रूझ पोलिस स्टेशन गाठले आणि आपल्या सोसायटीत काही पत्रकारांनी केलेल्या गैरवर्तनाविरोधात तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांची एक टीम तिला घरी सोडायला गेली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने रियाला 20 प्रश्न विचारले.
1. आपल्या आणि सुशांतच्या नात्याविषयी सांगा. तुमची कधी आणि कुठे भेट झाली होती आणि हे नाते पुढे कसे आले?
2. 8 जून रोजी असे काय घडले की तुम्ही सुशांतचे घर सोडले आणि त्याचा नंबरदेखील ब्लॉक केला?
3. तुम्हाला सुशांतच्या मृत्यूविषयी कुणी सांगितले? त्यावेळी तुम्ही कुठे होता आणि ही बातमी कळल्यानंतर तुम्ही काय केले?
4. सुशांतच्या मृत्यूची बातमी मिळाल्यानंतर तुम्ही त्याच्या वांद्रास्थित घरी गेला होता का? जर नाही तर त्याचे कारण काय? तुमची शवागाराबाहेरची काही छायाचित्रे समोर आली आहेत, तिथे जाण्याची परवानगी कशी मिळाली?
5. सुशांतच्या घरी तुम्ही कुठल्या नात्याने राहात होत्या? तुम्ही त्याचा संपूर्ण आर्थिक व्यवहार बघत होत्या का? सुशांतचा पिन तुम्हाला कुणी आणि का दिला?
6. सुशांतच्या कुटुंबासोबत तुमचे नाते कसे आहे? त्याच्या वडिलांच्या आणि बहिणींच्या आरोपांवर तुमचे मत काय आहे? तुम्ही खरंच 15 कोटींची हेराफेरी केली आहे का?
7. सुशांतचे घर सोडल्यानंतर 9 ते 14 जून या काळात तुम्हाला कुणी सुशांतच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती का?
8. आपल्या बॉलिवूड प्रवासाविषयी सांगात. एंट्री कशी झाली? कुणी तुम्हाला मदत केली का आणि आजही तुमचा कुणी मेंटॉर आहे का?
9. सुशांत नैराश्यात असल्याचे तुम्हाला सर्वप्रथम कसे समजले आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी तुम्ही कोणते प्रयत्न केले?
10. सुशांतचा मृत्यू हत्या की आत्महत्या? तुम्हाला काय वाटतं. दोन्ही परिस्थितीत तुम्ही यासाठी कुणाला दोषी समजता.
11. घरी काम करणा-या कर्मचा-यांसोबत सुशांतचे कसे संबंध होते? सुशांत पैशांसंबंधी निश्चिंत राहायचा की स्वतः पैसे काढून कर्मचा-यांना द्यायचा.
12. त्याच्या जवळचे मित्र आणि त्याला नुकसान पोहोचवू शकतील अशा काही निकटवर्तीयांबद्दल तुम्हाला काही ठाऊक आहे का?
13. 2017 ते 2020 या काळातील आपले काही चॅट्स समोर आले आहेत. यामध्ये ड्रग्जविषयी तुम्ही काही लोकांसोबत बोलला आहात. यावर तुमचे काय स्पष्टीकरण आहे?
14. सुशांत डॉक्टरांकडे जायचा की डॉक्टर घरी यायचे? सुशांत कुठली औषधे घेत होता, त्याचे प्रिस्क्रिप्शन्स कुठे आहेत?
15. सुशांतला बॉलिवूडमधून कुणी त्रास देत होतं का? सुशांतचे कधी कुणाशी भांडण झाले होते का? बॉलिवूडमधून त्याला कुणी नुकसान पोहोचवू शकतं असं तुम्हाला वाटतं का?
16. मुंबई पोलिसांमधील कुठल्याही अधिका-यासोबत तुमची ओळख आहे का? तुम्ही 5 वेळा डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्याशी चर्चा का केली?
17. सुशांतच्या कंपन्यांमध्ये तुमची आणि तुमच्या कुटुंबाची भूमिका काय होती? या कंपन्यांमध्ये फक्त सुशांतचे पैसे गुंतवले गेले आहेत का?
18. सप्टेंबर 2019 मध्ये तुम्हाला सुशांतच्या कंपनीत डायरेक्टर पद सांभाळण्यास कोणी सांगितले होते? आपण सुशांतच्या व्यवसायाशी संबंधित निर्णय घेतले होते का?
19. तुम्ही चहा किंवा कॉफीमध्ये मिसळून सुशांत सीबीडी का देणार होत्या? तुम्ही सांगितले की, सुशांत ड्रग्ज घेत होता? जर तो ड्रग्ज घेत होता, तर तुम्हीही त्यांच्यासोबत ड्रग्जचे सेवन केले होते का?
20. सुशांतच्या कुटूंबाने तुमच्यावर घरुन दागिने घेणे, त्याला आत्महत्येस प्रवृत्त करणे, कुटुंबापासून दूर करणे असे आरोप केले आहेत, यावर तुमचे काय म्हणणे आहे?
दरम्यान, मनी लाँडरिंगची चौकशी करणाऱ्या ‘ईडी’ने शुक्रवारी गोव्यातील हाॅटेल व्यावसायिक गौरव आर्यला 31 ऑगस्टला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. गौरवचे नाव रियासोबतच्या व्हाॅट्सअॅप चॅटमध्ये आले होते. गौरवच्या शोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या पथकानेही अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. रियाशी झालेल्या ड्रग्जसंदर्भातील चॅटमधून गौरवचे नाव समोर आले. एनसीबी लवकरच रियाच्या रक्ताचा नमुना घेऊ शकते. एनसीबीने रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रियाने एका मुलाखतीत सांगितले होते की, "माझ्याकडे खारमध्ये एक मालमत्ता आहे. मी सुशांतला भेटण्यापूर्वी या प्रॉपर्टीची डील केली होती. त्यासाठी मी 74 लाख रुपये दिले आहेत. त्यापैकी एचडीएफसी बँकेकडून 50 लाखांचे कर्ज घेतले आहे. मी अजूनही हे कर्ज फेडत आहे. 17 हजार रुपये ईएमआय आहेत. आता मी हे पैसे कुठून देणाक, कारण माझे आयुष्य खराब झाले आहे."
रियाच्या या वक्तव्यावर सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीने लिहिले की, "घराचा ईएमआय कसा भरणार ही चिंता तुला आहे. मग देशातील सर्वात महागड्या वकिलाला तू पैसे कुठून देत आहात ते मला सांग." रियाला लवकरच अटक करावी अशी मागणीही श्वेताने केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.