आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण:सुशांतचा रुमपार्टनर राहिलेल्या सिद्धार्थ पिठानीला मिळाला 10 दिवसांचा अंतरिम जामीन, लग्नाच्या 5 दिवसानंतर करावे लागणार आत्मसमर्पण

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अटक होण्याच्या आठवड्यभरापूर्वीच सिद्धार्थ पिठानीचा साखरपुडा झाला होता.
  • 26 जून रोजी आहे सिद्धार्थ पिठानीचे लग्न

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठाणीला अंतरिम जामीन मिळाला आहे. रिपोर्ट्सनुसार त्याला लग्नासाठी 10 दिवसांची तात्पुरता जामीन मिळाला आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सिद्धार्थचे वकील तारक सय्यद म्हणाले, "सिद्धार्थला अंतरिम दिलासा मिळाला आहे. त्याला 2 जुलैला आत्मसमर्पण करावे लागेल." यापूर्वी कोर्टाने सिद्धार्थचा जामीन अर्ज फेटाळला होता.

26 जून रोजी आहे सिद्धार्थ पिठानीचे लग्न
सिद्धार्थ पिठानीचे लग्न 26 जून रोजी आहे. त्याला 28 मे रोजी हैदराबाद येथून अटक करण्यात आली होती. अटकेच्या आठवडाभरापूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. त्याने साखरपुड्याचा फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केला, जो व्हायरल झाला होता. सिद्धार्थने गेल्या आठवड्यात लग्नाचे कारण देत कोर्टाकडे जामीन मागितला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर सिद्धार्थचे नाव सर्वाधिक चर्चेत आले. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. सिद्धार्थ त्या निवडक व्यक्तींपैकी एक होता. जे त्याच्या निधनाच्या वेळी त्याच्या घरी उपस्थित होते. त्यानंतर सिद्धार्थ गायब झाला होता.

9 महिन्यांपासून एनसीबीला चकमा देत होता सिद्धार्थ पिठानी

जवळपास 9 महिन्यांपासून सिद्धार्थ तपास यंत्रणेला चकमा देत होता. मात्र त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या मदतीने एनसीबीची टीम त्याच्यापर्यंत पोहोचली. सुशांतच्या निधनानंतर सिद्धार्थने आपले जुने सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते.

सिद्धार्थने एप्रिलमध्ये नवीन सोशल मीडिया अकाउंट तयार केले
एका इंग्रजी न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, एनसीबी ऑगस्ट 2020 पासून पिठानीच्या मागावर होते. तेव्हापासून तो एनसीबीपासून स्वतःचा बचाव करत होता. यावर्षी एप्रिलमध्ये त्याने आपले नवीन सोशल मीडिया अकाउंट तयार केले आणि जीममधील आपला एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "पिझ्झा पॉवर. फूड अँड फिटनेस." त्याशिवाय त्याने त्याच्या साखरपुड्याचा फोटोही सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. त्यानंतर एनसीबीने त्या जीमचा शोध घेतला ज्या जीमला सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये टॅग केले होते.

एनसीबी जनरल डिरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले होते, 'मागच्या बऱ्याच काळापासून सिद्धार्थ पिठानी एनसीबीने पाठवलेल्या कोणत्याही नोटीसचे उत्तर देत नव्हता. त्यामुळे आम्ही सोशल मीडियावरून त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत होतो.'

सिद्धार्थ पिठानीवर कोणते आरोप आहेत
एनसीबीने कोर्टाला सांगितले होते की, सिद्धार्थ ड्रग सिंडिकेटशी संबंधित असल्याचे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. या पुराव्यांच्या आधारे चौकशीसाठी एनसीबीने त्याची कस्टडी कोर्टाकडे मागितली होती. सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर सुशांतच्या कुटुंबीयाचे वकील विकास सिंह यांनी समाधान व्यक्त केले होते. पिठानीवर एनडीपीएस कायद्याच्या कलम 27ए, 28 आणि 29 अन्वये ड्रग्ज खरेदी करुन सुशांतपर्यंत पोहोचवल्याचा देखील आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...