आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput CBI Inquiry Update | Rhea Chakraborty Mumbai Latest News | Central Bureau Of Investigation (CBI) Investigation Day 7th Day Today Live News Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात सीबीआय चौकशीचा सातवा दिवस:तपास यंत्रणेची टीम रिया चक्रवर्तीच्या घरी पोहोचली; सुशांतचे वडील म्हणाले- रिया माझ्या मुलाला विष देत होती, तिला अटक झाली पाहिजे

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयचे एक पथक रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीची चौकशी करत आहे.
  • रियाचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांनाही चौकशीसाठी सीबीआयकडून समन्स बजावण्यात आले आहे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजूपतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन उघड झाल्यानंतर सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले, "रिया बर्‍याच दिवसांपासून माझ्या मुलाला विष देत होती. ती सुशांतची खुनी आहे. तपास यंत्रणेने रिया आणि तिच्या साथीदारांना अटक करुन त्यांना शिक्षा करावी."

  • सीबीआयचे पथक रियाच्या घरी पोहोचले

दरम्यान, सीबीआयची टीम रियाच्या घरी पोहोचली आहे. तपास यंत्रणेचे आणखी एक पथक रियाचा भाऊ शोविक याची डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये चौकशी करत आहे. वडील इंद्रजित चक्रवर्ती यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. सीबीआय सुशांतच्या रूममेट सिद्धार्थ पिठानीची सलग सहाव्या दिवशी चौकशी करत आहे. तपास यंत्रणेने आज एका महिलेलाही चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र ही महिला कोण आहे, हे समोर आलेले नाही.

  • बॉलिवूडच्या ड्रग्ज कनेक्शनची चौकशी केली जाईल

रियाच्या ड्रग्ज कनेक्शनच्या चौकशीसाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची (एनसीबी) एक टीम दिल्लीहून मुंबईकडे रवाना झाली आहे. एनसीबीने बुधवारी रियासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला. रियाच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरुन ड्रग्ज कनेक्शनची माहिती समोर आली आहे. एनसीबीने आपल्या मुंबई टीमला ड्रग्ज सप्लायर्स आणि बॉलिवूड कनेक्शनचे विश्लेषण करण्यास सांगितले आहे. एनसीबीदेखील आज रियाची चौकशी करु शकते.

  • रियाचा दावा - युरोपमधील हॉटेल पाहून सुशांत घाबरला होता

रियाची एक मुलाखत समोर आली आहे. सुशांतची तब्येत युरोप ट्रिपदरम्यान खराब झाली होती, असे तिने या मुलाखतीत सांगितले आहे. रियाने सांगितले की, पॅरिसला पोहोचल्यानंतर तीन दिवस सुशांत त्यांच्या रुममधून बाहेर आला नव्हता. पॅरिसला जाण्यापूर्वी तो खूप उत्साही होता. मात्र तिथे पोहोचल्यानंतर तो त्याच्या रुममधून बाहेर पडलाच नाही. परंतु इटलीला पोहोचल्यानंतर आम्हाला जी रुम देण्यात आली होती, त्याची रचना अत्यंत विचित्र होती, सुशांतला सुरुवातीला ती रुम व्यवस्थित वाटली. मात्र नंतर तिथे काहीतरी असल्याचे त्याला जाणवले होते. त्याने तसे मला सांगितलेदेखील. त्या दिवसानंतर त्याच्यात खूप बदल झाला होता, असे रियाने सांगितले.

इतकेच नाही तर सुशांतला फ्लाइटमध्ये बसण्यास भीती वाटायची. त्यामुळे तो विमानात बसण्यापूर्वी मोडाफिनिल नावाचे एक औषध घ्यायचा आणि प्रत्येक वेळी हे औषध तो आपल्या जवळ बाळगायचा, असा खुलासाही रियाने केला आहे.