आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईत आलेले बिहार पोलिस गुरुवारी पाटण्याला परतले आहेत. चार पोलिसांचे पथक मुंबईत आले होते. मात्र चौघांपैकी तिघे परतले असून आयपीएस अधिकारी विनय तिवारी हे मुंबईतच आहेत. मुंबईला पोहोचताच त्यांना क्वारंटाइन केले गेले. मागील चार दिवसांपासून ते क्वारंटाइन आहेत.
11 दिवसांत बिहार पोलिसांच्या पथकाने सुशांतच्या बँक खात्यांचा तपास केला आणि जवळजवळ 12 जणांचे जबाब नोंदवले. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. यानंतर पोलिस प्रभारी यांच्या मार्गदर्शनासाठी चार सदस्यीय पथक या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आले होते.
मीडियाला सुशांतच्या निधनाच्या आठवड्याभरापूर्वीचा मोबाईल कॉलचा तपशील मिळाला आहे. 8 जून ते 14 जून या कालावधीत सुशांत आणि रियाचे एकदाही बोलणे झाले नसल्याचे यावरुन समजते. 8 जून रोजी रिया सुशांतचे घर सोडून निघून गेली होती. घर सोडताना रियाने त्याचा नंबर ब्लॉक केला होता. सुशांतच्या CDR (कॉल डिटेल्स रिपोर्ट) नुसार, 8 ते 14 जून दरम्यान सुशांतने फक्त दोन आउटगोईंग कॉल लावले होते. दोन्ही त्यांच्या बहिणीचे होते. याकाळात त्याला एकुण नऊ वेळा इनकमिंग कॉल आले होते.
सीडीआरनुसार सुशांतला अखेरचा फोन 13 जून रोजी दुपारी 2.22 वाजता आला होता. हे कॉल तपशील सुशांतच्या परमनंट नंबरचे आहेत. असे सांगितले जाते की, रिया गेल्यानंतर त्याने बर्याच नवीन नंबरचा वापरही केला. कॉल तपशीलांनुसार, रियाच्या नंबरमध्ये शेवटी 647 हे आकडे आहेत.
सुशांत सिंह राजपूत मृत्युप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. तपासाबाबत बिहार आणि मुंबई पोलिसांतील वादावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली. न्या. हृषीकेश रॉय यांचे पीठ म्हणाले. सुशांतसारखा प्रतिभावंत कलाकार आपण गमावणे हे अतिशय दुर्दैवी आहे. असामान्य स्थितीत त्याचा मृत्यू झाला. चौकशीनंतर सत्य समोर यायला हवे.
बिहार सरकारची सीबीआय चौकशीची शिफारस स्वीकारल्याचे केंद्राने कोर्टात सांगितले. रियाचा खटला पाटण्यामधून मुंबईत वर्ग करण्याच्या मागणीवर कोर्टाने केंद्र, महाराष्ट्र, बिहार सरकार व सुशांतच्या कुटुंबाकडून ३ दिवसांच्या आत म्हणणे मागवले आहे. सोबतच रियाला सुरक्षा देण्यासही सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला.
या प्रकरणात चौकशीसाठी मुंबई पोलिस हे बिहार पोलिसांना सहकार्य करत नसल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांचे वकील विकाससिंह यांनी केला. एसपी विनय तिवारी यांना बळजबरीने क्वॉरंटाइन केल्याचेही ते म्हणाले. यावर महाराष्ट्र सरकारला फटकारत न्यायमूर्ती रॉय म्हणाले, ‘एसपींना क्वाॅरंटाइन करणे हे चांगले संकेत नाहीत. बिहारमध्ये दाखल झालेला खटला मुंबईत सुरू असलेल्या चौकशीचा भाग नाही का? एकाच प्रकरणाची दोन राज्यांच्या पोलिसांनी चौकशी करणे योग्य नाही.’
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.