आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या डायरीतील पानांची कहाणी:मृत्यूच्या 59 दिवसांनी पहिल्यांदा समोर आली सुशांतच्या डायरीची 15 पाने, लिहिले होते -  कुटुंबासोबत राहणार, कुणाचीही साथ सुटणार नाही याकडे लक्ष देईल

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या डायरीतील 15 पाने पोलिसांनी समोर आणले आहेत. या डायरीतून सुशांतने त्याच्या भविष्यातील वाटचालींचे नियोजन केले होते.
  • या डायरीत सुशांतच्या दुरदृष्टीची झलक बघायला मिळते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या 59 दिवसांनी त्याच्या डायरीतील 15 पाने समोर आली आहेत. यामध्ये सुशांतने हॉलिवूड पदार्पणापासून कंपनीच्या भविष्यातील वाटचालींचे नियोजन केल्याचे दिसत आहे. बहीण प्रियांका आणि गर्लफ्रेंड रिया यांचाही उल्लेख सुशांतने आपल्या या डायरीत केला होता.

सुशांतच्या डायरीत 2020 च्या नियोजनातील सर्वात महत्त्वाचे पान म्हणजे ज्यात सुशांतने कुटुंबापासून दुर होत चालल्याचे नमूद केले आहे. कुटुंबातील दुरावा वाढू नये यासाठी 2020 च्या नियोजनात कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचे त्याने ठरवले होते. कुटुंबातील कुणाचीही साथ सुटणार नाही, याकडे लक्ष देणार असल्याचे त्याने लिहिले होते.

सुशांतने आपल्या डायरीत त्याची बहीण प्रियांका आपल्या टीमला हँडल करेल असे डायरीत लिहिले आहे. आपली अभिनय कारकीर्द सावरण्यासाठी काय करता येईल, याबाबतही सुशांतने विचार करुन ठेवला होता. यामध्ये कोणत्या अडचणी येऊ शकतात, याचाही त्याने विचार केला होता.

एखादा सीन उठावदार होण्यासाठी कोणता प्रयोग आणि कोणती पद्धत वापरली पाहिजे, त्याची तयारी कशी करावी, याविषयी सुशांतने लिहिले आहे.

सुशांत पुढे लिहितो आपल्याला दिलेल्या ओळी वा वाक्य पाठ करू नका..ती वाक्य अनुभवा..आणि त्यानंतर कॅमेऱासमोर व्यक्त व्हा..

सुशांत चांगल्या लेखकांच्या माध्यमातून चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात होता. त्यामुळेच तो आपली टीम बनवण्यासोबतच लेखकांची लीग तयार करण्याच्याही विचारात होता. जेणेकरुन चांगले लेखन करणारे पटकथाकार आणि त्यांच्या स्क्रिप्ट कोणालाही उपलब्ध होतील.

हॉलिवूडमध्ये काम, स्टार्टअपमध्ये गुंतवणूक, कंपनीत कुटुंबातील कोणत्या सदस्याला काय जबाबदारी द्यायची, कंपनीला कोणत्या शिखरावर न्यायचं, याबाबतही त्याचे नियोजन असल्याचे दिसते.

सुशांतच्या डायरीतील 15 पाने...

1. डायरीच्या पहिल्या पानाच्या हेडिंगमध्ये 'I' म्हणजे सुशांतने स्वतःविषयी लिहिले. भविष्यातील नियोजनात काय काय करायला हवे ते 5 पॉइंट्समध्ये त्याने मांडले होते.

2. डायरीच्या या पानात एंटरटेन्मेंट वर्ल्डमधील सुशांतने प्लानिंग केले होते. भविष्यात हॉलिवूडमध्ये काम करण्याची योजना त्याने आखली होती.

3. 2020 मधील एंटरटेन्मेंट वर्ल्डमधील सुशांतचे आणखी काही प्लानिंग.. याविषयी त्याने तीन योजना आखल्या होत्या.

4. डायरीच्या या पानात सुशांतने Next Initiate Steps विषयी लिहिले होते. यात त्याने बहीण प्रियांकाच्या नावासह मेघा (लीगल) आणि पीडी+श्रद्धा (एक्सक्लूझिव्ह) असा उल्लेख केला आहे.

5. सुशांतने येथे आपल्या भावी क्रिएटिव्ह टीमचा उल्लेख केला आहे. पाच स्टेप्समध्ये त्याने ही प्लानिंग केली होती.

6. सुशांतने डायरीच्या या पानात आपल्या क्रिएटिव्ह कामाची चौथी स्टेप सविस्तर लिहिली आहे.

7. सुशांतने या पानावर त्याच्यावर होत असलेल्या आरोपांवर चिंता व्यक्त केली आणि रियाच्या नावाचा उल्लेख केला. या पानावर सुशांतने लाल शाहीने N या कोडनेमने लिहिले - मला स्वतःबद्दल, कुटूंबाबद्दल विचार करण्याची इच्छा आहे. कोणालाही गमावू इच्छित नाही. संरक्षणात्मक, काळजी घेणारी आणि समजूतदार व्हायची माझी इच्छा आहे. मुक्कू माझ्या गरजा पूर्ण करते, असे त्याने लिहिले आहे.

9. कॅमे-यासमोर अभिनय करण्याची तयारी नोट्स 1 - या पानावर त्याने शीर्षक दिले आहे - कॅमेर्‍यासमोर अभिनय करण्याची तयारी करणे - स्क्रिप्ट वाचणे आणि पुन्हा वाचन करणे.

10. कॅमे-यासमोर अभिनय करण्याची तयारी नोट्स 2 - या पानावर त्याने आपल्या अभिनयाच्या नियोजनाविषयी लिहिले आहे.

11. कॅमे-यासमोर अभिनय करण्याची तयारी नोट्स 3 - या पानावर सुशांतने सीनविषयी लिहिले आहे.

12. आपल्या स्क्रिप्टच्या तयारीविषयी सुशांतचे नोट्स 1 - यावर सुशांतने लिहिले आहे आपली स्क्रिप्ट मार्क करणे.

13. आपल्या स्क्रिप्टच्या तयारीविषयी सुशांतचे नोट्स 2 - या पानावर सुशांतने अभिनय स्किल सुधारण्यासाठी कुठली तयारी करायला हवी त्याबद्दल लिहिले आहे.

14. आपल्या स्क्रिप्टच्या तयारीविषयी सुशांतचे नोट्स 3 - या पानावर त्याने एक सकारात्मक फिलॉसॉफी लिहिली आहे.

15. या पानावर सुशांतने शीर्षक लिहिले नाही. यावर त्याने पाच अँक्शन पॉइंट्स लिहिले आहेत. एखादे काम सुरु करताना त्याच्याशी तुम्ही किती भाविनकरित्या जुळता. कुठलीही क्रिया करण्यापूर्वी त्यावर 30 ते 60 सेकंद नजर ठेवा, असे सुशांतने लिहिले आहे.

बातम्या आणखी आहेत...