आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Rhea Chakraborty Shovik | Sushant Singh Rajput Death Case 14 Day CBI Investigation Latest Update: Rhea Chakraborty Father Indrajit Chakraborty And Shovik Interrogated Today

सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीचा 14 वा दिवस:सीबीआयकडून सलग तिस-या दिवशी रियाच्या वडिलांची चौकशी; सुशांतचा बिझनेस पार्टनर वरुण माथूर ईडी ऑफिसमध्ये पोहोचला, शोविकलाही समन्स बजावले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांतच्या घरी काम करणारा नीरज सिंह, सिद्धार्थ पिठानी आणि त्याचा माजी अकाऊंटंट रजत मेवती यांची बुधवारी सीबीआयने 9 तास चौकशी केली.
  • सीबीआयने गेल्या दोन दिवसात रियाचे वडील इंद्रजित यांची तब्बल 18 तास चौकशी केली आहे.
  • सूत्रांच्या माहितीनुसार, सीबीआयने त्यांना ड्रग्ज संदर्भात प्रश्नोत्तरे केली आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) चौकशी करत आहे. सीबीआय चौकशीचा आज 14 वा दिवस आहे. गुरुवारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांची तिस-यांदा चौकशी करत आहे. गेल्या दोन दिवसांत त्यांना 18 तास प्रश्नोत्तरे केली गेली. दरम्यान सुशांतचा बिझनेस पार्टनर वरुण माथूर ईडी कार्यालयात पोहोचला आहे. काल त्याचीही चौकशी करण्यात आली. दरम्यान, रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती आणि एक ड्रग्ज सप्लायर यांच्यातील व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल झाले आहे. या चॅटमध्ये शोविकने त्याच्या वडिलांसाठी ड्रग्ज मागवण्याला खुलासा झाला आहे. यानंतर आता ईडीदेखील शोविकला चौकशीसाठी बोलवण्याची शक्यता आहे. .

  • बुधवारी या प्रकरणात काय झाले?

बुधवारी रियाचे वडील इंद्रजित यांची सुमारे दहा तास चौकशी करण्यात आली. ते सकाळी साडेदहा वाजता डीआरडीओ गेस्ट हाऊस येथे पोहोचले आणि रात्री साडेआठच्या सुमारास तेथून बाहेर पडले. अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार, सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, त्याचा कूक नीरज सिंह, घरगुती सहाय्यक केशव आणि अकाऊंट मॅनेजर श्रुती मोदी यांचीही 8-9 तास चौकशी केली गेली. रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ आणि आई यांना बुधवारी बोलावण्यात आले नव्हते.

  • श्रुती मोदी म्हणाली - ड्रग्ज सुशांतच्या आयुष्याचा एक भाग बनला होता

सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीने खुलासा केला आहे की, ड्रग्ज 'एसएसआर'च्या जीवनाचा एक भाग बनला होता. तिने सीबीआयला सांगितले की, सुशांतसाठी काम करत असल्याने त्याच्या घरी होणा-या पार्ट्यांमध्ये रिया आणि शोविकच्या बोलावण्यावरुन मी सहभागी व्हायचे. पण कधी ड्रग्जचे सेवन केले नाही. यापूर्वी श्रुतीचे वकील अशोक सारओगी यांनी खुलासा केला होता की, सुशांतच्या घरी होणा-या ड्रग्ज पार्ट्यांमध्ये त्याच्या बहिणीही सहभागी व्हायच्या.

  • अमेरिकेत सुशांतला न्याय मिळवून देण्याची मागणी करणारे बिलबोर्ड हटवले

हॉलिवूडमध्ये सुशांतसाठी न्यायाची मागणी करणारे बिलबोर्ड काढून टाकण्यात आले आहे. यावर सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह किर्ती ट्विटरवर म्हणाली, "असे दिसते की पेड पीआर सर्वत्र पोहोचला आहे." होर्डिंग्ज बसवणारी कंपनी म्हणाली की, "ते सुशांतचा न्यायाची मागणी करणारे होर्डिंग आता लावणार नाहीत".