आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Death Case : According To A Report Rhea Chakraborty Contacted A Top Director For Help Wanted Journalist To Do Articles In Her Favour

सुशांत मृत्यू प्रकरण:रिया चक्रवर्तीने बॉलिवूडच्या एका बड्या दिग्दर्शकाकडे मागितली होती मदत, रिपोर्ट्समध्ये दावा - काही पत्रकारांनी आपल्या बाजूने लेख लिहावेत अशी होती तिची इच्छा

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ईडीकडून सोमवारी रिया आणि तिच्या कुटुंबियांची सुमारे 10 तास चौकशी केली गेली.
  • रियाने मीडिया ट्रायलला चुकीचे सांगत सुप्रीम कोर्टात नव्याने याचिका दाखल केली.

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबीयांच्या चौकशीदरम्यान सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एक नवीन बातमी समोर आणली आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगितले जात आहे की, रियाने बॉलिवूडच्या एका बड्या दिग्दर्शकाकडे संपर्क साधून काही पत्रकारांनी तिच्या बाजूने लेख लिहावे यासाठी मदतीची विनंती केली.

टाइम्स नाऊ या न्यूज चॅनेलने ईडीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितले की, रियाला मीडियाकडून तिच्या बाजूने एक आर्टिकल लिहायचे होते. यासाठी तिने फिल्म इंडस्ट्रीच्या एका बड्या दिग्दर्शकाला फोन करुन मदतीची विनंती केली. रियाच्या फोनच्या सखोल चौकशीतून ईडीला ही माहिती मिळाली आहे.

  • रियाने पत्रकारांचे फोन नंबर मागितले होते

खास गोष्ट म्हणजे हे दिग्दर्शक महेश भट्ट नाहीत. 8 जून रोजी सुशांतचे घर सोडले तेव्हापासून रिया भट्ट यांच्या सतत संपर्कात होती. रियाच्या कॉल डिटेलवरून असे दिसून आले की 8 जून ते 13 जून दरम्यान रिया आणि महेश भट्ट यांच्यात 16 वेळा फोनवर बोलणे झाले होते. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने त्या दिग्दर्शकाला फोन करुन अशा काही पत्रकारांचे नंबर मागितले, जे तिच्या बाजूने आर्टिकल लिहून तिची बाजू लोकांसमोर मांडू शकतील.

10 तासांची चौकशी झाली

तत्पूर्वी, अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोमवारी रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती, त्यांचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी यांची 10 तास चौकशी केली. सोमवारी प्रथमच सुशांतच्या रूममेट सिद्धार्थ पिठानीची सुमारे 6 तास चौकशी झाली. ईडी चौकशीत आतापर्यंत रिया चक्रवर्ती तिच्या उत्पन्नाचे स्त्रोत सांगण्यात अपयशी ठरली आहे.

बातम्या आणखी आहेत...