आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरणाला नवं वळण:रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार, संजय दत्तचा खटला लढलेल्या वकिलांकडून घेतेये कायदेशीर मदत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली असून पाटणा पोलिसांंनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
  • एफआयआरमध्ये रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन व्यवस्थापकांची नावे आहेत.
  • सुशांतचे वडील म्हणाले - मुलाच्या एका बँक खात्याच्या स्टेटमेंटवरुन गेल्या वर्षभरात सुशांतने 17 कोटी रुपये खात्यात जमा केले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पाटणा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एफआयआर दाखल झाल्यानंतर आता रियावर अटकेची टांगती तलवार आहे. बिहार पोलिसांचे एक पथक सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहे. या प्रकरणी रियासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यात रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन मॅनेजर सौमियल मिरांडा आणि श्रुती मोदी यांच्या नावांचा समावेश आहे.

  • रियाने अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न सुरू केले

सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत रिया चक्रवर्तीने सुशांतकडून पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. तसेच तिने सुशांतला धमक्या दिल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यानंतर आता अटकपूर्व जामिनासाठी रियाने प्रयत्न सुरू केल्याचे समजते. रियाने मंगळवारी रात्री वकिलांची भेट घेतली असून बुधवारी ती अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार आहे. रियाचे वकील सतीश मानशिंदे यांनी जामिनासाठीची सर्व कागदपत्रे तयार केली आहेत. सतीश मानशिंदे यांनी 1993 मुंबई ब्लास्ट केसमध्ये अभिनेता संजय दत्तचा खटला लढला होता. काही प्रकरणांमध्ये ते सलमान खानचेही वकील होते.

  • वडिलांचा आरोप - रिया सुशांतला ब्लॅकमेल करत होती

सुशांतच्या वडिलांनी रियावर सुशांतला ब्लॅकमेल केल्याचा आरोप लावला आहे. ते म्हणाले, “माझ्या मुलाला सर्व काही सोडून केरळला जाऊन आपल्या मित्रासोबत शेती करण्याची इच्छा होती. पण रियाने त्याला रोखले. आपले ऐकले नाही तर मेडिकल रिपोर्ट मीडियामध्ये प्रसिद्ध करणार आणि मानसिक स्थिती योग्य नसल्याचे सांगणार अशी धमकी तिने दिली होती. जेव्हा सुशांत आपले ऐकत नसल्याचे आणि त्याच्या बँक खात्यात पैसे नसल्याचे लक्षात आले तेव्हा रियाने आता त्याचा काही उपयोग नाही असा विचार केला”, असे आरोप सुशांतच्या वडिलांनी तक्रारीत केले आहेत.

  • पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरून पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यात सहा जणांवर भांदवी कलम 341, 342, 280, 420, 406, 420 आणि 306 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एलजेपी नेते चिराग पासवान यांनीही या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.