आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई पोलिस आयुक्तांचा खुलासा:सुशांत गुगलवर पेनलेस डेथविषयी सर्च करायचा, 2019 मध्ये जानेवारी ते जून या काळात त्याच्या खात्यात 14.5 कोटी रुपये जमा झाले होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे, हे सांगितले.
  • परमबीर यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतने त्याच्या नावाव्यतिरिक्त पेनलेस डेथ, स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर अशा गोष्टी गुगलवर सर्च केल्या होत्या.

सोमवारी मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास कुठवर आला आहे, याविषयीची माहिती दिली. त्यांनी सांगितल्यानुसार, सुशांतने गुगलवर त्याच्या नावाव्यतिरिक्त पेनलेस डेथ, स्किझोफ्रेनिया आणि बायपोलर डिसऑर्डर अशा गोष्टी सर्च केल्या होत्या.

  • सुशांतच्या बँक खात्यात 14.5 कोटी रुपये जमा झाले होते

परमबीर सिंग यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले की, सुशांतच्या जानेवारी 2019 ते जून 2020 या कालावधीतील सर्व बँक स्टेटमेंटचे विश्लेषण केले गेले आहे. या कालावधीत त्याच्या खात्यात सुमारे 14.5 कोटी रुपये जमा झाले होते. सोबत चार कोटींचे फिक्स डिपॉझिटही होते. या पैशांच्या व्यवहाराची चौकशी सुरू आहे.

पोलिस आयुक्तांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत 56 जणांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. यात रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे. 13 आणि 14 जून रोजीचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पण तिथे पार्टी झाल्याचा पुरावा मिळालेला नाही. सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन ही आधीच तणावग्रस्त होती. त्या प्रकरणाचा तपासदेखील सुरु असल्याचे सिंग यांनी सांगितले.

दिशाच्या मृत्यूनंतर सुशांत तणावात होता. सुशांत आणि दिशा केवळ एकदाच भेटले होते. तसेच त्याने दिशाच्या वकिलांना मेसेज करुन या प्रकरणात माझे नाव का गोवण्यात येतंय असा प्रश्नही विचारला होता, असा खुलासाही सिंग यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना परमबीर सिंह म्हणाले, चौकशीदरम्यान सुशांतच्या घरी उपस्थित असलेल्या सर्व लोकांचे जबाब 16 जून रोजी नोंदविण्यात आले होते. यामध्ये त्याच्या तीन बहिणी आणि वडिलांचा समावेश आहे. सुशांतचे मेहुणे सिद्धार्थ तमर आणि ओपी सिंह यांचे जबाबही घेण्यात आला आहे. आपल्या जबाबात सुशांतच्या कुटुंबियांनी खुनाचा संशय व्यक्त केला नाही. तसेच सुशांतच्या बहिणींना आम्ही पुन्हा चौकशीसाठी बोलावले होते, पण त्या आल्या नाहीत, असेही ते म्हणाले.

  • मृत्यूच्या काही तासांपूर्वी गुगलवर स्वतःचे नाव केले होते सर्च

सुशांतच्या मोबाइलचा प्राथमिक फॉरेन्सिक अहवाल सुमारे महिनाभरापूर्वी समोर आला होता. यात सुशांतने 14 जून रोजी सकाळी 10:15 च्या सुमारास गुगलवर स्वतःचे नाव सर्च केल्याचे समोर आले होते. त्याने त्याच्यासंबंधित आर्टिकलही वाचले होते आणि काही काळानंतर मोबाइल ब्राउझर बंद केला होता. काही तासांनंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली होती.

बातम्या आणखी आहेत...