आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यूप्रकरणी यू टर्न:एम्सने हत्येची थिअरली नाकारली, परंतु ऑगस्टमध्ये फॉरेन्सिक बोर्डाच्या प्रमुखांनी म्हटले होते - शवविच्छेदनात त्रुटी आहेत

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले होते की, माझ्याकडे सर्वप्रथम सुशांतचे फोटो आले, ते पाहून तेव्हाच सुशांतची हत्या झाल्याचे मला वाटले होते.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात आणखी एक ट्विस्ट समोर आला आहे. अलीकडेच एम्सच्या फॉरेन्सिक एक्सपर्ट टीमने आपला अहवाल सीबीआयकडे सोपवला आहे. यात सुशांतची हत्या झाली नसून त्याने आत्महत्या केल्याचे या अहवालात म्हटले गेले आहे. डॉ. सुधीर गुप्ता यांच्या मार्गदर्शनात एम्सच्या पाच डॉक्टरांची समिती या तपासासाठी नेमण्यात आली होती.

मात्र आता या एक्सपर्ट पॅनलचे हेड डॉ. सुधीर गुप्ता यांची एक ऑडिओ क्लीप लीक झाली असून त्यात त्यांनी सुशांतने आत्महत्या केली नाही तर त्याची हत्या झाली असा दावा केला होता. सोबतच पुराव्यांसोबत छेडछाड आणि शवविच्छेदन अहवालात त्रुटी असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये सुनंदा पुष्कर प्रकरणाचा उल्लेख
डॉ. गुप्ता यांनी ऑगस्टमध्ये रिपब्लिक टीव्हीच्या रिपोर्टरशी बातचीत केली होती. तेव्हा डॉ. गुप्ता म्हणाले होते की, सुनंदा पुष्कर प्रकरणाच्या चौकशीच्या वेळी त्यांनी क्राइम सीन आहे तसा राहू दिला होता. सुनंदा पुष्करचा मृतदेह ज्या खोलीत सापडला त्या खोलीत कोणालाही जाऊ दिले नाही, असे सांगितले होते. सोबतच त्यांनी कूपर रुग्णालयाने शवविच्छेदन अहवाल देताना केलेल्या घाईबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. या अहवालात मृत्यूची वेळ देण्यात आली नाही, असेही ते म्हणाले होते.

सुधीर गुप्ता यांनी हे प्रश्न उपस्थित केले होते

ऑडिओ क्लिपमध्ये डॉ.गुप्ता म्हणाले होते की, 5 डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदन केले होते. त्यापैकी फक्त एक ज्युनिअर फॉरेन्सिक डॉक्टर होता. उर्वरित 4 वैद्यकीय अधिकारी होते. नियमांनुसार, पॅनेलमध्ये फॉरेन्सिक तज्ञ असावेत. हे वैद्यकीय मंडळ कोणी तयार केले होते? वैद्यकीय मंडळ का? मेडिकल बोर्डाबद्दल पोलिस कसे स्पष्टीकरण देतील? पोलिस कशाची वाट पहात होते? सुशांतची नखे कुठे आहेत? व्हिसेरा प्रिझर्व का गेला नाही? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. डॉ. सुधीर गुप्ता म्हणाले होते की, माझ्याकडे सर्वप्रथम सुशांतचे फोटो आले, ते पाहून तेव्हाच सुशांतची हत्या झाल्याचे मला वाटले होते. मात्र आता आपल्या रिपोर्टमध्ये डॉ. सुधीर गुप्ता आणि त्यांच्या टीमने सुशांतची हत्या झाली नसून हे आत्महत्येचे प्रकरण असल्याचा दावा केला आहे.

बातम्या आणखी आहेत...