आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत सिंह मृत्यू प्रकरण:मुंबई उच्च न्यायालयाने बहीण मीतूविरोधातील एफआयआर रद्द केला, प्रियांकाची सीबीआय चौकशी करेल; रिया चक्रवर्तीने दाखल केली होती तक्रार

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया चक्रवर्तीने दाखल केला होता एफआयआर

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियांका सिंह आणि मीतू यांच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला. प्रियांका सिंहविरोधात दाखल केलेला एफआयआर कोर्टाने रद्द केला आहे, तर दुसरी बहीण मीतू सिंहची याचिका कोर्टाने फेटाळली आहे. आता सीबीआय या प्रकरणात मीतू सिंहची चौकशी करेल. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि न्यायमूर्ती एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित सर्व प्रकरणे सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहेत.

रिया चक्रवर्तीने दाखल केला होता एफआयआर
अटकेपूर्वी रिया चक्रवर्तीने राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर तरुण कुमार आणि सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन बनवून सुशांतला औषध दिल्याचा तिने तिघांवर आरोप केला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये या तक्रारीविरोधात दोन्ही बहिणींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करुन एफआयआर रद्द करण्याची अपील केली होती.

प्रियांकाच्या सूचनेवरुन डॉक्टरांनी बोगस प्रिस्क्रिप्शन बनवले होते
रियाने आपल्या तक्रारीत म्हटले होते की, प्रियांकाच्या सांगण्यावरून डॉक्टर कुमारने सुशांतची तपासणी न करता नैराश्यासाठी औषधे दिली होती. जे अनेक प्रकारे कायद्याचे उल्लंघन करणारे होते. 8 जून रोजी सुशांतला त्याची बहीण प्रियंकाने राम मनोहर लोहिया रुग्णालयाचे डॉक्टर तरूण कुमार यांच्याकडून बनावट प्रिस्क्रिप्शन पाठवले होते. या प्रिस्क्रिप्शनमध्ये त्या औषधांची नावे होती, जी एनडीपीएस अॅक्ट अंतर्गत येतात आणि त्यांची बंदी आहे. रियाने मुंबई पोलिसांत फसवेगिरी, एनडीपीएस अॅक्ट आणि टेली मेडिसीन प्रॅक्टिस गाइडलाईन 2020 च्या आरोपांतर्गत ही तक्रार दाखल केली होती.

गेल्या वर्षी 14 जून रोजी झाला सुशांतचा मृत्यू
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील त्यांच्या घरी सापडला. प्राथमिक चौकशीत सुशांतने नैराश्येतून आत्महत्या केली, असे मुंबई पोलिसांनी म्हटले होते. सुशांतच्या मृत्यूच्या 15 दिवसानंतर सुशांतचे वडील कृष्णा कुमार सिंह यांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीवर गंभीर आरोप केले. रियाने सुशांतच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी नंतर बिहार सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवली.