आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सीबीआयला रियाच्या विश्वासार्हतेवर संशय:सीबीआयने रियाला विचारले - सुशांतच्या बहिणींविरोधात एफआयआर दाखल करण्यासाठी 90 दिवस का वाट बघितली ?

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या बहिणींविरूद्धची एफआयआर रद्द करण्यासाठी सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात अपील केली.
  • कोर्टाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सीबीआयने सांगितले की - एफआयआरचा हेतू तपासावर परिणाम घडवून आणणे.

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या बहिणींविरोधात रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेला उत्तर म्हणून सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आपले उत्तर सादर केले. यात तपास एजन्सीने म्हटले की, सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर 90 दिवसांनी त्याच्या बहिणी मितू आणि प्रियांकाविरोधात रियाने दाखल केलेली एफआयआर तिच्या विश्वासार्हतेवर शंका उपस्थित करणारी आहे.

  • 'सुशांतच्या बहिणींवरील एफआयआर रद्द करावा'

सुशांतच्या दोन बहिणींविरूद्ध एफआयआर रद्द करण्यासाठी सीबीआयने उच्च न्यायालयात अपील केले आहे. तसेच मुंबई पोलिसांनी रियाची एफआयआर नोंदवणे पूर्णपणे कायद्याचे उल्लंघन असल्याचे सांगितले. तपास एजन्सी म्हणाली, "सुशांतच्या मृत्यूच्या चौकशीवर परिणाम घडवून आणण्याच्या उद्देशाने ही तक्रार रियाने केली आहे."

  • 'समान गोष्टींवर दुसरा एफआयआर करणे चुकीचे आहे'

सीबीआयचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक अनिल यादव यांनी आपल्या उत्तरात म्हटले की, पाटणा पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरची माहिती मुंबई पोलिसांना आहे. त्याच गोष्टींवर आधारित आणखी एफआयआर नोंदवण्याची गरज नव्हती.

यादव म्हणाले, "तत्सम तथ्यांनुसार आणि कारवाईच्या कारणावर आधारित आणखी एफआयआर नोंदवणे कायद्याची हमी देत ​​नाही किंवा परवानगीही नाही."

  • मितू-प्रियांकाने दाखल केली एफआयआर रद्द करण्याची याचिका

रिया चक्रवर्तीने गेल्या महिन्यात मुंबई पोलिसात मितू आणि प्रियांकाविरूद्ध एफआयआर दाखल केला होता. यात तिने त्यांच्यावर सुशांतला बनावट प्रिस्क्रिप्शनद्वारे औषधे दिल्याचा आरोप केला. नंतर हा एफआयआर सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. या एफआयआरच्या विरोधात मितू आणि प्रियांकाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

  • रिया एफआयआर रद्द करण्यास विरोध करत आहे

रियाने प्रियांका आणि मितूच्या याचिकेला विरोध केला आहे. मुंबई उच्च न्यायालयात सादर केलेल्या आपल्या उत्तरात तिने म्हटले की, सुशांतची बहीण प्रियांका आणि दिल्लीचे राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉ. तरुण कुमार यांनी सुशांतला अवैधरित्या मानसिक रोगाशी संबंधित औषधे दिली होती.

रियाच्या म्हणण्यानुसार, प्रियांकाने 8 जून रोजी व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून नॅक्सिटो, लिब्रियम आणि लोनजेप एमडी सारखी औषधे त्याला घेण्यास सांगितली होती. एनडीपीएस कायद्यांतर्गत तिन्ही औषधे सायको-ट्रॉपिकल पदार्थांपासून बनविली जातात. ही औषधे घेतल्यानंतर एका आठवड्यानंतर सुशांतचा मृत्यू झाल्यामुळे प्रियांकाविरोधात दाखल झालेल्या तक्रारीची कसून चौकशी झाली पाहिजे, असा दावाही रियाने केला आहे.

  • प्रियांका-मितू यांच्या याचिकेवर 4 नोव्हेंबर रोजी सुनावणी

हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत, असा दावा रियाने केला आहे, त्यामुळे तपास यंत्रणेला या प्रकरणाची चौकशी करण्याची पुरेशी संधी दिली पाहिजे, असा दावा रियाने केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि एम एस कर्णिक यांच्या खंडपीठासमोर 4 नोव्हेंबर रोजी प्रियांका आणि मितू यांच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे.