आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत केसमध्ये सीबीआयचा तिसरा दिवस:तपास यंत्रणेची टीम सलग दुसऱ्या दिवशी सुशांतच्या फ्लॅटवर, सिद्धार्थ पिठानी आणि नीरज सिंहची पुन्हा चौकशी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सीबीआयची टीम त्या रिसॉर्टमध्ये गेली, जेथे सुशांत दोन महिने थांबला होता
  • रियाची लवकरच चौकशी होणार, सुशांत आणि रियाचे कॉल डिटेल्स तपासले जातील

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. ही टीम सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सुशांतच्या वांद्रे येथील फ्लॅटवर पोहोचली. यापूर्वी सुशांतचा रुममेट राहिलेलल्या सिद्धार्थ पीठानी आणि कुक नीरज सिंहची चौकशी करण्यात आली. दोघांनाही डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये प्रश्न विचारण्यात आले. सीबीआयची टीम तिथेच थांबली आहे. नीरजची सलग तिसऱ्या दिवशी आणि पिठानीची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली.

रिया चक्रवर्तीची लवकरच होणार चौकशी
सुशांत दोन महिने ज्या वॉटरस्टोन रिसॉर्टमध्ये राहिला होता, तिथे सीबीआय टीम रविवारी गेली होती. सीबीआयच्या टीमने रिसॉर्टमध्ये दोन घंटे चौकशी केली. तपास यंत्रणेने रिसॉर्टच्या स्टाफकडून माहिती घेतली की, सुशांत तिथे राहत असताना त्याचा व्यवहार कसा होता. सीबीआय लवकरच रियाची चौकशी करणार आहे. न्यूज एजेंसी आएएनएसच्या सूत्रांनुसार सुशांत, रिया आणि या केससंबंधीत दुसऱ्या लोकांची कॉल डिटेल्सची माहिती काढली जाईल.

पोलिसांनी घाईगडबडीत पोस्टमॉर्टम करायला लावले
सीबीआयने शनिवारी सुशांतच्या फ्लॅटवर घटनेला री-क्रिएट केले होते. यासोबतच सुशांतच्या पोस्टमार्टम करणाऱ्या कूपर रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांना प्रश्न विचारले. सूत्रांनुसार डॉक्टरांनी सांगितले की, 'मुंबई पोलिसांच्या सांगण्यानुसार सुशांतचे पोस्टमॉर्टम कोरोना टेस्ट न करताच
घाईघाईत करायला लावले होते. रात्रीच ऑटोप्सी करण्यात आली होती'

13 जूनला सुथांच्या घरी पार्टी झाली नाही
सुशांतच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने शनिवारी खुलासा केला की, 'सुशांतच्या घराचा लाइट सामान्यतः सकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असायचा. मात्र 13 जूनच्या रात्री 10 ते 11 वाजेदरम्यान लाईट बंद झाला होता. त्या दिवशी कोणतीही पार्टी झाली नव्हती. यामध्ये काही तर गडबड आहे.'