आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यूप्रकरणात खुनाचा आरोप:सुशांतच्या मृत्यूप्रकरणात सीबीआय कलम 302 जोडू शकते, पिठानी आणि नीरज होऊ शकतात सरकारी साक्षीदार

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसर्‍या टप्प्यात दिपेश सावंत, सिद्धार्थ पिठानी, नीरज आणि केशव यांची पुन्हा चौकशी केली जाईल.
  • एम्सने तपास अहवाल सोपवला असून म्हटले - या प्रकरणात कोणताही अँगल सोडला जाणार नाही.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणारी सीबीआय आता या प्रकरणात भादंवी (हत्या) कलम 302 जोडण्याचा विचार करत आहे. एम्सच्या पथकाने आपला तपास अहवाल सादर केला असून त्यानंतर सीबीआय या प्रकरणातील दुसर्‍या टप्प्यात चौकशी सुरू करणार आहे. याशिवाय सुशांतचा रुममेट सिद्धार्थ पिठानी हा सरकारी साक्षीदार होण्याची शक्यता आहे.

एम्सच्या अहवालात तीन मोठे प्रश्न समोर आले आहेत
एम्सच्या टीमने कूपर हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सुशांतच्या पोस्टमार्टमवर 3 मोठे प्रश्न उपस्थित केले आहेत. डॉ सुधीर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार-

  • पोस्टमॉर्टम अहवालात सुशांतच्या मृत्यूच्या वेळेचा उल्लेख नाही.
  • सुशांतचे पोस्टमॉर्टम संध्याकाळी आणि कमी प्रकाशात करण्यात आले.
  • त्याच्या व्हिसेरा अहवालात ड्रग्ज तपासणीशी संबंधित कोणतेही तथ्य नाही.

याशिवाय व्हिसेरा योग्यप्रकारे संरक्षित केले नसल्याचे यापूर्वी समोर आले होते, त्यामुळे एम्सच्या टीमला तपासणीत अडचणी आल्या.

नवीन दावा रिया मृत्यूआधी सुशांतला भेटली होती
याशिवाय सुशांतच्या मृत्यूच्या एक दिवस आधी म्हणजे 13 जून रोजी रिया सुशांतला भेटल्याचा दावा एका प्रत्यक्षदर्शीने केला आहे. विवेकानंद गुप्ता असे या प्रत्यक्षदर्शीचे नाव आहे. वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्याने सांगितले की, रिया 13 जूनच्या रात्री 2 ते 3 च्या सुमारास सुशांतला भेटली होती. नंतर सुशांत तिला घरी सोडण्यासाठी गेला होता. त्यामुळे8 जून रोजी तिने सुशांतचे घर सोडल्याचे रियाचे विधान पूर्णपणे खोटे आहे.

याबद्दलची ठोस माहिती पिठानीकडेच आहे, कारण सुशांतच्या मृत्यूच्या केवळ एक दिवस आधी, सुशांतच्या घरी कोणकोण आले होते, हे पिठानीलाच ठाऊक आहे.

सिद्धार्थ पिठानी आणि नीरज हे साक्षीदार होऊ शकतात
रिपब्लिकच्या रिपोर्टनुसार सिद्धार्थ पिठानी सीबीआय अधिका-यांच्या देखरेखीखाली आहे. तो साक्षीदार होऊ शकतो असे अधिका-यांचे म्हणणे आहे. त्याची अनेकदा चौकशी झाली असून त्याचा जबाब नोंदवला गेला आहे. पुढील चौकशीसाठी तो दिल्लीला जाऊ शकतो. सिद्धार्थशिवाय कुक नीरजही साक्षीदार होऊ शकतो.

बातम्या आणखी आहेत...