आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Death Case CBI Probe Accepts Suicide Theory That Is Matches With AIIMS Finding, According To Sources, CBI Is Now Focusing On The Gamut Of Reasons Of Suicide

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:मीडिया रिपोर्ट्सचा दावा- सीबीआयच्या फायनल रिपोर्टमध्ये एम्सच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब, सुशांतने आत्महत्याच केल्याचे मानले

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एम्सच्या फोरेन्सिक टीमनेही याला आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी करणा-या सीबीआय टीमनेही अभिनेत्याचा खून झाला नसून त्याने आत्महत्या केल्याचे मान्य केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार एजन्सी आपल्या अंतिम रिपोर्टमध्येही हेच नमूद करणार आहे. यापूर्वी एम्सच्या फोरेन्सिक टीमनेही याला आत्महत्येचे प्रकरण असल्याचे म्हटले आहे.

सीबीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे इंडियन एक्स्प्रेसमध्ये वृत्त आहे की, या प्रकरणात सीबीआयला हत्येशी संबंधित कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. घरात जबरदस्तीने प्रवेश केल्याचा किंवा खुनाशी संबंधित अन्य कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळलेली नाही. त्यामुळे हत्येची थिअरी पूर्णपणे अयशस्वी ठरली आणि आता सुशांतने कोणत्या कारणामुळे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, या अँगलने सीबीआय आपला तपास करणार आहे.

दोनदा सीन रिक्रिएट करुन पाहिला

या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने दोनदा सुशांतच्या उंचीच्या आणि वजनाच्या डमीने सीन रिक्रिएट केला. 22 ऑगस्ट रोजी पहिल्यांदा सीन रिक्रिएट करण्यात आला होता. त्यानंतर काही अन्य प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 5 सप्टेंबर रोजी दुसर्‍यांदा सीन रिक्रिएट केला गेला. दोन्ही वेळा एम्सची फॉरेन्सिक टीम सीबीआयसोबत हजर होती. गळफास घेणे शक्य आहे, हे दोन्ही वेळा तपासात समोर आले.

दुखापत किंवा भांडणाच्या खुणा आढळल्या नाहीत
तपासादरम्यान ही हत्या असल्याचे कोणतेही पुरावे घटनास्थळी सीबीआयला मिळाले नाहीत. त्यामुळे हे आत्महत्येचे प्रकरण असल्याच्या निष्कर्षावर तपास यंत्रणा पोहोचली आहे. तपासादरम्यान सुशांतच्या गळ्यावर फाशीच्या खुणाव्यतिरिक्त कोणतीही जखम आढळली नाही. शिवाय त्याला विष दिल्याचाही पुरावा तपासात मिळाला नाही.

सीबीआय आता या अँगलने या प्रकरणाची चौकशी करेल
आत्महत्येचे प्रकरण स्पष्ट झाल्यानंतर सीबीआय आता त्याच्या आत्महत्येमागील कारणांची चौकशी करेल. यामध्ये रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावाची भूमिका, व्यावसायिक प्रतिस्पर्धी आणि बॉलिवूडमधील घराणेशाही, अमली पदार्थांचा दुरुपयोग आणि सुशांतच्या मानसिक आरोग्य यासंदर्भात आता सीबीआय तपास करणार आहे.

फॉरेन्सिक ऑडिटमध्येही संशयास्पद काही मिळाले नाही
दुसरीकडे सुशांतच्या बँक खात्याच्या फॉरेन्सिक ऑडिट अहवालातदेखील संशयास्पद पुरावे सापडलेले नाहीत. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, सुशांतच्या सर्व बँक खात्यांमधून गेल्या पाच वर्षांत 70 कोटींचा व्यवहार झाला होता, त्यापैकी केवळ 55 लाख रुपये रिया चक्रवर्तीशी संबंधित असल्याचे आढळले आहे. यातील बहुतेक खर्च प्रवास, स्पा आणि भेटवस्तू खरेदीवर करण्यात आला होता.

सुशांतच्या वडिलांनी 15 कोटींच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला

सुशांतचे वडील केके सिंह यांनी ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या रिया चक्रवर्तीविरूद्ध 15 कोटी रुपयांच्या फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता. याला आधार म्हणून अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात रियाची तीनदा चौकशी करण्यात आली. अद्याप ईडीने आपला अंतिम अहवाल सार्वजनिक केला नाही. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सुशांतच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडिट झाले.

रियाला जामीन मिळाला
ड्रग्ज प्रकरणात महिनाभरापासून तुरूंगात असलेल्या रिया चक्रवर्तीला मुंबई हायकोर्टाने बुधवारी जामीन मंजूर केला. रिया ही ड्रग्ज डिलर्सचा भाग नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने मंगळवारी रियाच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवस म्हणजेच 20 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली होती.

बातम्या आणखी आहेत...