आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरणात CBIचा खुलासा:तपास यंत्रणेच्या अधिका-याने दैनिक भास्करला सांगितले - रिया चक्रवर्ती किंवा इतर कोणत्याही आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही वृत्तवाहिन्यांमध्ये सीबीआयने या प्रकरणात कलम 302 जोडली असल्याचे म्हटले गेले आहे.
  • सीबीआय अधिका-याने आम्हाला बातचीतमध्ये स्पष्टपणे सांगितले की, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.

केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी कलम 302 (खून) लागू केल्याचे नाकारले आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना सीबीआय अधिका-याने सांगितले की, त्यांनी रिया चक्रवर्ती किंवा इतर कोणाविरूद्धही ही कलम लावलेली नाही. सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी आणि कुक नीरज यांना सरकारी साक्षीदार करुन या प्रकरणात खुनाची कलम सीबीआय लागू करणार असल्याचे वृत्त समोर आले होते. मात्र सीबीआयने हे सर्व फेटाळले आहे. सीबीआय अधिका-याशी झालेल्या संभाषणाचा खास भाग: -

प्रश्नः कलम 302 खरोखर जोडला गेला आहे का?
सीबीआय: हे पूर्णपणे चुकीचे आहे.

प्रश्नः पण वृत्तवाहिन्यांवर ही बातमी चालवली जात आहे?
सीबीआय: आता यात आम्ही काय करू शकतो? अद्याप तपास सुरू आहे.

प्रश्नः आतापर्यंत आपल्या हाती लागलेल्या पुराव्यांवरून, 302 लागू होतील अशी अपेक्षा आहे?
सीबीआय: भविष्याबद्दल आता काय बोलू शकतो? ते आताच कसे म्हणता येईल. आम्ही एका प्रकरणाचा तपास करत आहोत. कल्पनांवर आधारित कोणतेही कोडे सोडवत नाहीये.

प्रश्नः म्हणजे, अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पुरावे सापडलेले नाहीत, ज्यामुळे 302 लागू करता येईल?
सीबीआयः मला असे म्हणायचे आहे की, यावेळी 302 चा विचार करु नका. तपास अजून सुरू आहे. यावेळी जे काही पुरावे समोर येत आहेत, ते आम्ही मीडिया किंवा इतर कोणाबरोबर शेअर करू शकत नाही.

प्रश्न: आता पुढे आणखी कोणाकोणाला चौकशीसाठी बोलवले जाणार आहे?
सीबीआयः मी पुन्हा सांगू इच्छितो की, तपासादरम्यान जे काही घडतं ते आम्ही शेअर करु शकत नाही.

प्रश्नः आरोपींची पुढील सुनावणी कधी होईल?
सीबीआय: पाहूया. हे तपासावर अवलंबून आहे.

प्रश्नः पुढच्या आठवडा गृहित धरुयात का?
सीबीआयः आत्ता असे म्हणता येणार नाही. आमचे काम कल्पनाशक्तीवर आधारित नाही. आम्ही या गोष्टी सांगत नाही.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser