आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणाला नवीन वळण:आता कुटुंबातील सदस्यांसह भावोजी ओपी सिंह यांचीही होणार चौकशी, प्रत्येक अँगलने सुरु आहे तपास; सीबीआयकडून स्पष्टीकरण

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियांकाला लवकरच सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. - Divya Marathi
सुशांत सिंह राजपूतची बहीण प्रियांकाला लवकरच सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
  • सीबीआय आता रिया चक्रवर्तीने मुंबई दाखल केलेल्या एफआयआरची चौकशी करत आहे.
  • सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह म्हणाले - बहिणींना अद्याप समन्स नाही, परंतु त्या तपासात सहकार्य करतील

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण आले आहे. या प्रकरणातील चौकशीसाठी कोणताही अँगल सोडत नसल्याचे सीबीआयने म्हटले आहे. याची सर्व बाजूंकडून चौकशी केली जात आहे. आता सीबीआय सुशांतची बहीण प्रियांका सिंह आणि भावोजी ओपी सिंह यांचीही चौकशी करू शकते. सुशांतची बहीण मितू सिंहची यापूर्वी चौकशी करण्यात आली आहे.

  • मुंबई पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप

तपासादरम्यान सुशांतच्या कुटुंबीयांवर मुंबई पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप आहे. हा आरोप सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने आपल्या एफआयआरमध्ये केला आहे. रियाच्या एफआयआरची सीबीआय चौकशी करीत आहे, जी तिने सुशांतच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध मुंबईत दाखल केली होती. सुशांतच्या बहिणी पैशांसाठी त्याच्यावर दबाव आणत असल्याचा दावा रियाने आपल्या एफआयआरमध्ये केला होता.

सुशांतचे वडील केके सिंह यांचे वकील विकास सिंह यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतच्या बहिणींना कोणतेही समन्स मिळालेले नाही. मात्र तपास एजन्सीने त्यांना चौकशीसाठी बोलावले तर त्या पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहेत.

  • सीबीआयच्या चौकशीवर प्रश्न उपस्थित केले

अलीकडेच विकास सिंह यांनी आपल्या एका ट्विटमध्ये सीबीआयच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी लिहिले, "सीबीआय सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणाला हत्या प्रकरणात बदलण्यास उशीर करत आहे, यामुळे निराशा होत आहे. एम्स टीमचा सदस्य असलेल्या डॉक्टरांनी मला फार पूर्वी सांगितले होते, की मी पाठवलेले फोटो 200% दर्शवत आहेत की आत्महत्येमुळे नव्हे तर गळा दाबल्याने त्याचा मृत्यू झाला आहे."

मात्र, एम्सच्या टीमने सिंह यांचा दावा फेटाळला आहे. सीबीआयच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाच्या चौकशीत उशीर होत नाहीये तर उलट केंद्रीय एजन्सी प्रत्येक कोनातून याचा तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...