आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:सुशांतचा मृतदेह खाली उतरवताना किती जणांनी मदत केली ? सीबीआयने नीरज सिंहला विचारले 10 प्रश्न

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सीबीआयने 3-3 सदस्यांची 3 पथके तयार केली, सीन ऑफ क्राइम री-क्रिएट केले जाणार.
 • बॉलिवूडमधील व्यावसायिक स्पर्धा आणि माफिया अँगलनेही चौकशी केली जाईल.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीसाठी मुंबईत दाखल झालेल्या सीबीआयच्या पथकाने आपले काम सुरू केले आहे. सीबीआयच्या एका पथकाने वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या कार्यालयात तासभर थांबून कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतली आहेत. त्यानंतर हे पथक वांद्रा पोलिस स्टेशनकडे रवाना झाले. यापूर्वी सीबीआयने सुशांतचा कुक नीरज याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सीबीआयचे अधिकारी ज्या गेस्ट हाऊसमध्ये थांबले आहेत, तिथेच या एजन्सीची एक टीम नीरजची चौकशी केली. सुशांतच्या मृत्यूच्या आधी नीरजने त्याला ज्युस दिला होता. चौकशीदरम्यान सीबीआयने 10 प्रश्न विचारले. यात 13 आणि 14 जूनला घडलेल्या घटनेचा तपशील होता.

सीबीआयने नीरजला हे प्रश्न विचारले

सुशांतसोबत तुझे रिलेशन कसे होते आणि किती दिवसांपासून सुशांतसोबत काम करत होता?

13 जूनला घरात पार्टी झाली होती का आणि 14 जूनला घरात वातावरण कसे होते?

सुशांतच्या मृत्यूदितीन कोण-कोण रुममध्ये होते ?

14 जूनला काय घडले आणि तुझी सुशांतसोबत काय बातचीत झाली ?

सुशांत नेहमी रुममध्येच असायचा का ?

13 आणि 14 जुनला सुशांतने काय जेवण केले होते ?

सुशांत आणि रियामधील संबंध कसे होते, आणि सुशांतने रियाला घर सोडून जाण्यास सांगितले होते का ?

सुशांतची बॉडी सर्वात आधी कोणी पाहिली?

सुशांतची बॉडी खाली उतरवण्यास कोणी सांगितले होते आणि याल कोणी मदत केली?

पीसीआरला कधी कॉल केला आणि कोणी केला ?

रिया चक्रवर्तीने नीरजला नोकरीवर ठेवले होते

नीरज सिंह सुशांतच्या घरात मागील आठ महिन्यांपासून काम करत होता. नीरजला रियाने नोकरीवर ठेवले होते. नीरजची बिहार आणि मुंबईत चौकशी झाली आहे.

सीबीआय आज सुशांतच्या फ्लॅटवर जाऊनही आपला तपास करणार आहे. याआधी गुरुवारी, जेव्हा मीडियाने रिया चक्रवर्तीच्या अटकेबाबत त्यांना प्रश्न विचारले तेव्हा सीबीआय अधिकारी काहीही न बोलता निघून गेले. रिया आणि तिच्या कुटूंबाची चौकशी केली जाईल, परंतु ही चौकशी आज होईल की नाही, हे स्पष्ट नाही.

अंमलबजावणी संचालनालया (ईडी) करत असलेल्या मनी लाँडरिंगच्या चौकशीतील निष्कर्ष ही सीबीआय विचारात घेईल, सूत्रांच्या माहितीनुसार सीबीआयच्या तीन टीममध्ये प्रत्येकी तीन सदस्य आहेत.

 • ही टीम तीन भागात काम करेल

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात सीबीआय टीमला तीन भागात विभागले गेले आहे. प्रत्येक टीममध्ये तीन सदस्य असतील आणि हे सर्व आयपीएस मनोज शशिधर यांना रिपोर्ट करतील.

 • पहिल्या टीमला या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे उदाहरणार्थ - केस डायरी, क्राइम सीनची छायाचित्रे, शवविच्छेदन अहवाल, मुंबई पोलिसांचा फॉरेन्सिक रिपोर्ट, ऑटोप्सी रिपोर्ट आणि साक्षीदारांच्या जबाबांची प्रत यासारखी सर्व संबंधित कागदपत्रे जमा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
 • दुसरी टीम रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची, सुशांतची माजी मॅनेजर, सुशांतच्या घरी काम करणा-या लोकांची चौकशी करेल. घटनास्थळी हजर असलेल्या सर्वांचे जबाब नव्याने रेकॉर्ड केले जातील.
 • बॉलिवूड सेलिब्रिटी आणि सुशांतच्या पोस्टमॉर्टम करणा-या डॉक्टरांची तिसरी टीम चौकशी करेल. सीन ऑफ क्राइम रिक्रिएट करण्याचे कामही या टीमला देण्यात आले आहे.
 • या व्यतिरिक्त, सीबीआयची टीम देखील ईडीमार्फत केलेल्या मनी लाँडरिंग चौकशीच्या रिपोर्टच्या मदतीने हे प्रकरण पुढे नेईल.

सीबीआयला या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत

सीबीआयचा तपास बिहार पोलिसांच्या एफआयआरवर आधारित असेल. ज्यामध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूक आणि कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या एफआयआरमध्ये आयपीसीच्या कलम 341, 348, 380, 406, 420, 306 आणि 120 बी समाविष्ट आहेत. तसेच सीबीआयला या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.

 • सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्या आहे की हत्या?
 • सुशांतने आत्महत्या केली असेल तर त्यामागील खरं कारण काय आहे?
 • सुशांतच्या मृत्यू प्रकरणाशी रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंब, आणि त्याच्या घरी काम करणा-यांचा काही संबंध आहे का?
 • सुशांतच्या मृत्यू प्रकरणामध्ये चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींचा काही संबंध आहे का?
 • पैश्यांच्या व्यवहारावरुन झालेले मतभेद आणि इतर आर्थिक गोष्टींमुळे सुशांतचा मृत्यू झाला आहे का?
 • सुशांतच्या आजाराबद्दलचे सत्य काय आहे? तो खरोखर नैराश्याचा सामना करत होता का?
 • सुशांतच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काही माहिती लपवण्यात आली आहे का?
 • साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आलेले जबाब खरे आहेत का?
 • 13 आणि 14 जून रोजी सुशांतच्या घरी नक्की काय काय घडले?
बातम्या आणखी आहेत...