आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याचा कूक नीरजने एक धक्कादायक खुलासा केला आहे. वृत्तानुसार सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, हाऊस कीपर दिपेश सावंत आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक त्याला ड्रग्ज विशेषत: मारुआना (गांजा) द्यायचे. यासोबतच सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जून रोजी वांद्रे येथील घरी कोणतीही पार्टी झाली नसल्याचे त्याने सांगितले आहे.
दिशाच्या निधनानंतर सुशांत कमी जेवत होता: नीरज
टाईम्स नाऊशी बोलताना नीरज म्हणाला की, मॅनेजर दिशा सालियानच्या मृत्यूनंतर सुशांत कमी जेवू लागला होता. तो म्हणतो, "तसे सर (सुशांत) ठीक होते. सर्वसाधारणपणे बोलत होते आणि निराश दिसले नाहीत. आम्ही कधीच दिशाबद्दल ऐकले नव्हते किंवा तिला पाहिले नव्हते. सर, थोडे दुःखी नक्कीच होते आणि कमी जेवू लागले होते."
रिया सुशांतच्या स्टाफवर नियंत्रण ठेवत नव्हती
सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती फायनान्स आणि घरातील कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवत असल्याच्या आरोपांचे नीरजने खंडन केले आहे. रियाने सुशांतचा जुना स्टाफ बदलून आपल्या परिचयातील लोकांना कामावर ठेवले असल्याची चर्चा सुशांतच्या निधनापासून सुरु आहे.
नीरज म्हणाला, "आमच्यावर फारसा दबाव नव्हता. सर आणि मॅम हे दोघेही आमच्यासाठी सारखेच होते. जर आमच्या हातून चूक झाली तर मॅम (रिया) आमच्यावर ओरडत होत्या, परंतु कोणत्याही प्रकारचा दबाव निर्माण केला नव्हता. सरांनी त्यांना सर्व अधिकार दिले होते. त्यांनी आम्हाला मॅमच्या सूचनांचे पालन करण्यास सांगितले होते."
नीरजने 14 जूनबद्दल सांगितले...
14 जून रोजी घडलेल्या घटना आठवताना नीरज म्हणाला, 'मी सकाळी सुशांत सरांना पाणी दिले होते, तर केशवने ज्युस दिला होता. सकाळी आठच्या सुमारास शेवटच्या वेळी मी सुशांत सरांना भेटलो. सर मग खोलीत गेले आणि बाहेर आले नाहीत."
13 जून रोजी रिया-सुशांतच्या भेटीचे केले खंडन
या बातचीतमध्ये नीरजने सांगितले होते की, 13 जून रोजी संध्याकाळी सुशांतच्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती, कोणीही आले नाही किंवा घराबाहेर गेले नाही. रियासुद्धा आठ जूननंतर कधीच त्याच्या घरी आली नव्हती. सीबीआयने त्याला सरकारी साक्षीदार केल्याचा दावा त्याने फेटाळून लावला आहे. नीरज अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याची चर्चा मीडियात होती. मात्र सध्या आपण आपल्या दिल्लीच्या घरी असून तपास यंत्रणेला सहकार्य करत असल्याचे नीरजने म्हटले आहे.
रिया चक्रवर्तीने नीरजला कामावर ठेवले होते
सुशांतच्या निधनाच्या आठ महिन्यांपूर्वी पासून नीरज त्याच्या घरी काम करत होता. त्याला रिया चक्रवर्तीने कामावर ठेवले होते. नीरजची बिहार आणि मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.