आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:दिल्ली हायकोर्टाचा प्रसारमाध्यमांना सल्ला, म्हणाले - आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित करु नका आणि सोशल मीडियावरही पोस्ट करु नका

9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी होणार आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर मीडिया ट्रायल करणा-या दोन न्यूज चॅनेल विरोधात बॉलिवूडच्या 34 बॉलिवूड निर्माते आणि प्रोडक्शन हाऊसनी दिल्ली हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. बॉलिवूडविरोधात अतिशय बेजबाबदार आणि अपमानास्पद टीका टिप्पणी केल्याचा आरोप त्यांनी आपल्या याचिकेत केला आहे. या याचिकेवर सोमवारी हायकोर्टात सुनावणी झाली असून कोर्टाने अनेक मीडिया हाऊस आणि त्यातील पत्रकारांना नोटिस जारी करुन उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. यात रिपब्लिक टीव्हीचे एक्झिक्युटिव्ह एडिटर अर्णब गोस्वामी आणि टाइम्स नाऊच्या एक्झिक्युटिव्ह एडिटर नविका कुमार यांचा समावेश आहे.

कोर्टाचा आदेश - अपमानास्पद कंटेट दाखवू नका
कोर्टाने वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना त्यांच्या चॅनेलवर आक्षेपार्ह कंटेंट प्रसारित करू नये किंवा सोशल मीडियाच्या हेडलाइन्समध्ये पोस्ट करू नये अशा सूचना दिल्या आहेत. न्यायमूर्ती राजीव शाकधर
यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 डिसेंबर रोजी होणार आहे.

राजकुमारी डायना यांच्या मृत्यूचे उदाहरण कोर्टाने दिले
कोर्टाने यावेळी ब्रिटीश राजकन्या डायना यांचे उदाहरण दिले. डायनाचा मृत्यू 1997 मध्ये झाला होता. कोर्टाने म्हटले की, "राजकुमारी डायना प्रकरणात त्यांचा मृत्यू मीडियापासून दूर पळत असताना
झाला होता. आपण या मार्गाने जाऊ शकत नाही." फोटोग्राफरच्या नजरेतून बचाव करत असताना राजकुमारी डायना यांची कार एका पोलला धडकली होती आणि यातच 31 ऑगस्ट 1997 रोजी त्यांचा
मृत्यू झाला होता.

ऑक्टोबर महिन्यात दाखल करण्यात आली होती याचिका
ऑक्टोबर महिन्यात 4 फिल्म असोसिएशन आणि 34 निर्मात्यांनी काही वृत्तवाहिनी आणि त्यातील पत्रकारांविरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी,
प्रदीप भंडारी, टाइम्स नाऊचे राहुल शिवशंकर आणि नविका कुमार यांच्याविरोधात कोर्टात तक्रार दाखल करण्यात आली होती. सिनेमा क्षेत्रातील कलाकारांच्या विरोधातील मीडिया ट्रायल चालवण्यात येऊ नये, तसेच त्यांच्या वैयक्तिक आणि गोपनियतेच्या हक्काला धक्का पोहोचवू नये, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांमध्ये या चार एसोसिएशन

1. द प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया 2. द सिने एंड टीव्ही आर्टिस्ट्स एसोसिएशन 3. द फिल्म एंड टीव्ही प्रोड्यूसर्स काउंसिल 4. स्क्रीन-राइटर्स एसोसिएशन

आणि या 34 प्रोडक्शन हाऊसचा समावेश

 • यशराज फिल्म्स
 • धर्मा प्रोडक्शन्स
 • आमिर खान प्रोडक्शन्स
 • सलमान खान वेंचर्स
 • सोहेल खान प्रोडक्शन्स
 • रोहित शेट्टी पिक्चर्स
 • रेड चिलीज एंटरटेनमेंट
 • रिलायंस बिग एंटरटेनमेंट
 • राकेश ओमप्रकाश मेहरा पिक्चर्स
 • नाडियाडवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट
 • कबीर खान फिल्म्स
 • अजय देवगण फिल्म्स
 • केप ऑफ गुड फिल्म्स
 • अरबाज खान प्रोडक्शन्स
 • आशुतोष गोवारीकर प्रोडक्शन्स
 • अनिल कपूर फिल्म एंड कम्युनिकेशन नेटवर्क
 • एक्सेल एंटरटेनमेंट
 • विनोद चोप्रा फिल्म्स
 • विशाल भारद्वाज फिल्म्स
 • रॉय-कपूर प्रोडक्शन्स
 • एड-लॅब्स फिल्म्स
 • आंदोलन फिल्म्स
 • बीएसके नेटवर्क एंड एंटरटेनमेंट
 • क्लीन स्लेट फिल्म्स
 • एमी एंटरटेनमेंट एंड मोशन पिक्चर्स
 • फिल्म-क्राफ्ट प्रोडक्शन्स
 • होप प्रोडक्शन्स
 • लव फिल्म्स
 • मॅकगुफिन पिक्चर्स
 • वन इंडिया स्टोरीज
 • आर एस एंटरटेनमेंट
 • रियल लाइफ प्रोडक्शन्स
 • सिखया एंटरटेनमेंट
 • टाइगर बेबी डिजिटल

सुशांतच्या आत्महत्येनंतर काही न्यूज चॅनेलने मीडिया ट्रायल सुरु केले होते. यात अनेकांना आरोपीच्या पिंज-यात उभे करण्यात आले होते. बॉलिवूडमध्ये खूप घाण आहे आणि ती साफ केली पाहिजे. बॉलिवूड ही जगातील सर्वात वाईट इंडस्ट्री आहे. ड्रग्ज घेण्यात अनेक मोठे कलाकार आघाडीवर आहेत, अशा प्रकारचा आरोप न्यूज चॅनेलकडून करण्यात आला होता.

14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केली. त्यानंतर ड्रग्ज प्रकरणावरुन बॉलिवूड चर्चेत आले. बॉलिवूडमधील पार्ट्यांमध्ये कसे हमखास ड्रग्ज घेतले जाते, हे सांगण्यात आले. तसेच यात अनेक कलाकारांची नावे न्यूज चॅनेलकडून घेण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर काही न्यूज चॅनेलविरोधात बॉलिवूड एकवटले.

बातम्या आणखी आहेत...