आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत आत्महत्या प्रकरण:नारायण राणेंनी घेतले डिनो मोरियाचे नाव, संतापलेला डिनो म्हणाला - कृपया या प्रकरणात माझे नाव खेचू नका, माझा याच्याशी काहीही संबंध नाही

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपा नेते नारायण राणेंचा दावा - 13 जून रोजी डिनो मोरियाने आपल्या घरी सुशांत सिंह राजपूत आणि काही राजकारण्यांसाठी पार्टी होस्ट केली होती.

सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या आदल्या रात्री अभिनेता डिनो मोरियाच्या घरी पार्टी झाली होती. त्या पार्टीत सुशांत सहभागी झाला होता, असा दावा केला जातोय. मात्र डिनोने या वृत्ताचे खंडन केले आहे. डिनो यावर संतापला असून त्याने या प्रकरणात माझे नाव उगाचच आणू नका, असा इशारा दिला आहे. संबंधित घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्याने म्हटले आहे.

डिनोने ट्विटरवर स्पष्ट केले की, "माझ्या घरी कोणतीही पार्टी झाली नव्हती. कृपया असे आरोप करण्यापूर्वी तथ्य तपासा. माझे नाव या प्रकरणात उगाच खेचू नका. जे काही घडले, त्यात माझा काहीही संबंध नाही."

  • भाजपा नेते नारायण राणेंचा दावा

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या झाली आहे, असा दावा भाजपा नेते नारायण राणे यांनी केला. मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नारायण राणे यांनी गंभीर आरोप करत राज्य सरकारवर टीका केली. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात राज्य सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या रात्री म्हणजे 13 जून रोजी डिनो मोरियाने आपल्या घरी सुशांत सिंह राजपूत आणि काही राजकारण्यांसाठी पार्टी होस्ट केली होती. पहिले सगळ्यांनी डिनो मोरियाच्या घरी पार्टी केली आणि त्यानंतर ते सर्वजण सुशांतच्या घरी पार्टीसाठी गेले होते, असा दावा राणेंनी केला. मात्र मुंबई पोलिसांनी 13 जून रोजी सुशांतच्या घरी कुठलीही पार्टी झाली नसल्याचे सांगितले आहे.

  • राणेंचा आरोप - सुशांतची हत्याच झाली

सुशांतची हत्या झाल्याचा आरोप नारायण राणेंनी लावला आहे. 'सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलिस योग्य दिशेनं तपास करत नाही. याप्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाली. मात्र मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केली नाही. गेल्या 50 दिवसांत मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध का लावला नाही,’ असा सवाल राणेंनी उपस्थित केला. या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचीही टीका त्यांनी केली.

  • दिशाचा बलात्कार करुन खून झाला

या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी सुशांतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियनच्या मृत्यूबाबतही गंभीर आरोप केले. 'दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणाचा तपास का झाला नाही. तिचा शवविच्छेदन अहवाल माझ्याकडे आहे. तिने आत्महत्या केली नसून तिचीसुद्धा हत्या करण्यात आली आहे. दिशावर बलात्कार करून तिला ठार मारण्यात आले आहे', असा आरोप राणेंनी केला आहे.

  • 8 जून रोजी दिशा आणि 14 जून रोजी सुशांतचा झाला मृत्यू

8 जून रोजी दिशा सॅलियन हिच्या मृत्यूची बातमी आली होती. रिपोर्ट्स नुसार, दिशाने 14व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या पाच दिवसांनी म्हणजे 14 जून रोजी सुशांतने आत्महत्या केल्याचे समोर आले. वांद्र्यातील त्याच्या राहत्या घरी सुशांत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. सुशांतच्या मृत्यूच्या 50 दिवसांनी बिहार सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली. सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांनी बुधवारी सांगितले की, बिहार सरकारची सीबीआय चौकशीच्या शिफारशीस केंद्राने मंजुरी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...