आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात एकानंतर एक अनेक दावे चुकीचे ठरत आहे. पहिले एम्सच्या पॅनलने हत्येची शक्यता फेटाळली होती. आता अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने अभिनेत्या बँक खात्यातून मनी लॉन्ड्रिंगचे पुरावे मिळण्याच्या दाव्यावर इनकार केला आहे. रिपोर्टमध्ये ईडीच्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, सुशांतच्या कुटुंबाकडून गैरसमजातून आरोप लावण्यात आले आहेत.
कुटुंबाला सुशांतच्या पैशांचा अंदाज नव्हता
मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, ईडीच्या सूत्रांनी म्हटले की, सुशांतच्या कुटुंबाला फायनेन्सविषयी काहीच आयडिया नव्हती. याच कारणामुळे त्याच्या खात्यात मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचा संशय होता.
ईडीला सुशांतच्या खात्यातून मनी लॉन्ड्रिंग किंवा संशयास्पद व्यवहारांचा पुरावा सापडला नाही. परंतु, अकाउंटमध्ये झालेल्या छोट्या-मोठ्या ट्रान्जेक्शनचा तपास केला जात आहे. कारण हे ट्रान्जेक्शन कुणाला आणि का करण्यात आले याची माहिती मिळावी.
जवळपास 2.78 कोटी रुपये टॅक्समध्ये भरले
रिपोर्टनुसार, ईडीला तपासात कळाले आहे की, सुशांतच्या बँक खात्यातून 2.78 कोटी रुपये टॅक्स (जीएसटी सह) मध्ये देण्यात आले होते. तर छोटी-मोठी रक्कमही मिसिंग आहे. तपास एजेंसी याची माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे. ईडीच्या सूत्रांनीही हे सांगितले की, त्यांना रिया चक्रवर्तीच्या खात्यामध्ये सुशांतच्या अकाउंटमधून एखाद्या मोठ्या अमाउंटचे थेट ट्रान्जेक्शन सापडलेले नाही. तपास करणाऱ्यांनुसार दोघांमध्ये छोट्या-मोठ्या पैशांची देवाण-घेवाण होऊ शकते.
कुटुंब फायनेंसमध्ये दखल देत नव्हते
आपल्या जबाबात सुशांतच्या वडिलांनी वकील विकास सिंह यांनी असेही म्हटले आहे की अभिनेत्याच्या आर्थिक बाबतींविषयी कुटूंबाला काहीच कल्पना नव्हती. कुटुंबाने त्याच्या आर्थिक बाबतीत कधीही हस्तक्षेप केला नाही किंवा त्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला नाही. ईडीची चौकशी सुरू. जेव्हा चौकशी पूर्ण होईल तेव्हाच फाइंडिंग समोर येऊ शकले. आम्ही आमच्या चिंतेबद्दल चौकशी एजन्सीला सांगितले आहे आणि त्याचा (सुशांत) निधी काही आरोपींकडे गेला आहे का? याची चौकशी करण्यास सांगितले आहे. त्याचा चार्टर्ड अकाउंटंट बदलण्यात आला होता.
31 जुलैला ईडीने दाखल केला होता मनी लॉन्ड्रिंगची केस
31 जुलैला ईडीने सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंहच्या पटनामध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या आधारावर रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजीत, आई संध्या, सुशांतचे हाउस मॅनेजर सॅमुअल मिरांडा आणि मॅनजर श्रुति मोदीविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचा केस दाखल करण्यात आला होता.
केके सिंह यांनी आरोप लावला होता की, या सर्व आरोपींनी सुशांतच्या बँक खात्यातून 15 कोटी रुपयांची गडबड केली आहे. या प्रकरणात ईडीने जवळपास 24 लोकांना विचारपूस केली आहे, ज्यामध्ये मुख्य आरोपींसह सुशांतचा माजी स्टाफ आणि माजी टॅलेंट मॅनेजर्सचा समावेश आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.