आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत प्रकरणातील एफआयआर मुंबईत ट्रान्सफर होणार?:सुप्रीम कोर्टात बिहार पोलिस म्हणाले - आमच्या एसपींना मुंबईत दाखल होताच क्वारंटाइनच्या नावाखाली ताब्यात घेतले गेले, एसआयटीलाही तपासापासून रोखले

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाच्या वतीने सुप्रीम कोर्टाने म्हटले गेले होते- सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यामागे बिहार पोलिस, असे करणे त्यांच्या अधिकारक्षेत्रात नाही
  • वकिल उज्ज्वल निकम म्हणाले - जर सुप्रीम कोर्टाने पाटण्याची एफआयआर मुंबईत ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले तर सीबीआय चौकशी रद्द मानली जाईल.
  • सुशांतची बहीण श्वेताने एक फोटो पोस्ट करुन इंस्टाग्रामवर लिहिले - ही अशी वेळ आहे, जेव्हा आपल्याला सत्याचा शोध घेऊन न्याय मिळायला हवा.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल देऊ शकतं. तत्पूर्वी बिहार सरकार आणि रिया यांनी न्यायालयात आपले जबाब नोंदवले आहे. बिहार पोलिस म्हणाले की, आमचे एसपी विनय तिवारी या प्रकरणाच्या चौकशीसाठी 2 ऑगस्ट रोजी मुंबईत पोहोचले होते, मात्र क्वारंटाइनच्या नावाखाली त्यांना ताब्यात घेतले गेले.

सुशांतचे वडील केके सिंह यांनी पाटण्यात रिया विरोधात एफआयआर नोंदवला होता. यात त्यांनी सुशांतला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप रियावर केला आहे. कोर्टात उत्तर देताना बिहार पोलिसांनी आरोप लावला की, मुंबई पोलिसांनी बिहारच्या एसआयटीच्या 4 सदस्यांच्या पथकाला चौकशीची परवानगी दिली नाही. बिहार पोलिस म्हणाले की, विनय तिवारींना क्वारंटाइन मुक्त करण्यासाठी बिहारच्या आयजींना मुंबई पोलिसांकडे विनंती करावी लागली होती.

  • सुप्रीम कोर्टात कुणी काय उत्तर दिले?
  1. बिहार सरकार म्हणाले - सीबीआय चौकशीत कोणत्याही प्रकारचा अडथळा येऊ दिला जाणार नाही. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल.
  • सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपविण्याचा निर्णय बिहार पोलिसांच्या शिफारशीवरून घेण्यात आला आहे. असे करणे त्यांच्या अधिकारक्षेत्रात येत नाही.

उज्ज्वल निकम काय म्हणाले?

मुंबईतील ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणाले की, जर सुप्रीम कोर्टाने रियाच्या याचिकेवर पाटण्यातील केस मुंबईत हस्तांतरित करण्याचा आदेश दिला, तर सीबीआय चौकशी रद्द मानली जाईल.

  • कोर्टाचा निर्णय सध्या राखीव आहे

यापूर्वी 11 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. आज या प्रकरणाशी संबंधित सर्व पक्षांना म्हणजेच रिया, सुशांतचे कुटुंब, बिहार आणि महाराष्ट्र पोलिसांना लेखी उत्तर देण्यास सांगितले. रियाच्या याचिकेवरही आज कोर्टात सुनावणी होणार आहे, ज्यात तिने या प्रकरणातील मीडिया ट्रायल थांबवण्याची मागणी केली आहे.

  • सुशांतची बहीण म्हणाली - सत्य जाणून घेण्याचा आमचा हक्क आहे

या प्रकरणातील सत्यता समोर आणली जावी अशी मागणी वारंवार सुशांतच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. दरम्यान कोर्टाच्या निर्णयापूर्वी सुशांतची मोठी बहीण श्वेता सिंह किर्तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, 'मी तुम्हाला एक विनंती करते की सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र यावे आणि या केससाठी सर्वांनी एकजूट होऊन सीबीआय चौकशीची मागणी करावी. आम्हाला सत्यता जाणून घ्यायची आहे आणि हे सत्य जाणून घेण्याचा आमचा अधिकार आहे. जर असे नाही झाले तर आम्ही सत्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आम्ही शांतीपूर्ण जीवन जगू शकणार नाही.'

  • रिया चक्रवर्तीच्या 14 पानांच्या शपथपत्र काय म्हटले आहे?

रिया चक्रवर्तीने या प्रकरणी 14 पानांचे शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे. पाटण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी कोणताही आधार नाही. ही केस मुंबई पोलिसांकडे ट्रान्सफर होऊ नये म्हणून सीबीआयकडे तपास देण्यात आला. महाराष्ट्र सरकारच्या परवानगीशिवाय हे करता येणार नाही, असे रियाचे म्हणणे आहे. मात्र तिने असेही म्हटले आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या वतीने सीबीआयकडे चौकशी सुपूर्द केली तर आपला कोणताही आक्षेप नाही. सीबीआय आणि ईडीच्या कार्यप्रणालीवरही रियाने प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या शपथपत्रात म्हटले आहे, की पाटण्यात दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ईडीने सुशांतच्या बँक खात्यांमधून झालेल्या व्यवहारांची चौकशी सुरु केली. दुसरीकडे सीबीआयनेही त्वरित गुन्हा दाखल केला. मात्र बरीच मोठी प्रकरणे आहेत, ज्यांचा तपास या एजन्सीज करत नाहीत. मात्र यावेळी दोघेही विद्युतवेगाने कामाला लागले.

यात संपूर्ण प्रकरणाच्या मीडिया ट्रायलचाही तिने उल्लेख केला आहे. मीडियाने आपल्याला आधीच दोषी ठरवले आहे. पहिल्या टूजी आणि आरुशी तलवार प्रकरणात ज्यांना मीडियाच्या वतीने दोषी ठरवण्यात आले होते, ते निर्दोष ठरले होते. सुशांतनंतरही काही कलाकारांनी आत्महत्या केली आहेत, पण माध्यमांना या प्रकरणातच रस आहे. या प्रकरणात अतिशयोक्ती केली जात आहे. मी सुरुवातीपासूनच अस्वस्थ आहे, आणि आता आपले वैयक्तिक आयुष्य एक तमाशा बनले आहे, असे रियाने म्हटले आहे.

बिहारमध्ये निवडणुका तोंडावर असल्याने यात राजकीय चढाओढ सुरु आहे. खुद्द बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणात रस दाखवला. यानंतर सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीवरुन पाटणा पोलिसांनी एफआयआर नोंदवला. कायद्यानुसार पाटणा पोलिसांना तसे करण्याचा अधिकार नव्हता, असा दावाही रियाने केला आहे.

रिया चक्रवर्तीने सर्वप्रथम या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पाटण्यात नोंदवलेली एफआयआर मुंबईत हस्तांतरित करण्याची मागणी तिने केली होती. नंतर बिहार सरकारच्या सूचनेवरून पाटण्यात नोंदवलेली एफआयआर सीबीआयकडे सोपवण्यात आली.

महाराष्ट्र सरकारने आपल्या प्रतिज्ञापत्रात सीबीआयला चौकशी सोपवणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. सीबीआयने दाखल केलेला एफआयआर मुंबईच्या वांद्रे पोलिस ठाण्यात वर्ग करावा अशी मागणी राज्याने केली आहे. गेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना या प्रकरणात आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

0