आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांतच्या बहिणीचा कंगनाला पाठिंबा:फॅमिली वकिलांचा कंगनावर स्वतःचा अजेंडा चालवल्याचा आरोप, दुसरीकडे सुशांतची बहीण श्वेताने तिला म्हटले योद्धा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विकास सिंह यांनी एका मुलाखतीत कंगनाला लक्ष्य करत म्हटले होते की, सुशांत प्रकरणात कंगना रनोट स्वतःचा अजेंडा चालवत आहे. दुसरीकडे कंगनाने श्वेताचे ट्विट रिट्विट करत लिहिले- माझ्याविरूद्ध पसरलेल्या अफवांना पुर्णविराम दिल्याबद्दल धन्यवाद

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळावा म्हणून लढा देत असलेल्या अभिनेत्री कंगना रनोटला त्याची बहीण बहीण श्वेता सिंह किर्तीचा पाठिंबा मिळाला आहे. श्वेताने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांचे फॅमिली वकील विकास सिंह कंगनावर केलेल्या टीकेनंतर स्पष्टीकरण देत आहेत.

कॅप्शनमध्ये श्वेताने लिहिले की, "मी माझ्या भावाच्या सर्व योद्ध्यांना सलाम करते. तुम्ही सर्वजण आमची ताकद आहात आणि खरे नायक आहात. सध्या आपले ध्येय खर्‍या कारणासाठी एकत्र येणे आहे. ऐक्य आणि समजूतदारपणाचा आग्रह करते."

  • कंगनाने प्रोत्साहन दिल्याबद्दल म्हटले धन्यवाद

प्रोत्साहन दिल्याबद्दल कंगना रनोटने श्वेताचे आभार मानले आहेत. कंगनाने श्वेताचे ट्विट रिट्विट केले आणि लिहिले, "धन्यवाद श्वेता. तुझ्या या शब्दांसाठी खूप खूप धन्यवाद. माझ्याविरूद्धच्या सर्व अफवांना पुर्णविराम दिल्याबद्दल धन्यवाद."

  • कंगनावर आरोप करताना काय म्हणाले होते विकास सिंह?

अलीकडेच विकास सिंह यांनी एका मुलाखतीदरम्यान कंगना रनोटला लक्ष्य केले होते. ते म्हणाले होते, "ती फक्त स्वतःचा अजेंडा चालवत असून त्या लोकांना लक्ष्य करत आहेत, ज्यांच्यासोबत तिचे पटत नाही. सुशांतच्या कुटुंबीयांकडून दाखल करण्यात आलेल्या एफआयआरचा ती करत असलेल्या दाव्यांशी काही संबंध नाही. सुशांतला कदाचित घराणेशाहीचा फटका बसला असावा. पण या प्रकरणात हा प्राथमिक तपासणीचा मार्ग असू शकत नाही. मुख्य प्रकरण रिया आणि तिच्या टोळीने सुशांतचे शोषण करुन त्याचा खून केला का? हे आहे", असे सिंह यांनी म्हटले होते.

विकास सिंह यांनी दुसर्‍या मुलाखतीत सांगितले की, "ती (कंगना) ना सुशांतची प्रतिनिधी आहे ना मित्र. ती केवळ इंडस्ट्रीतील समस्या समोर आणत आहे. होऊ शकते सुशांतला घराणेशाहीचा फटका बसला असेल. पण सध्या कंगना जे काही करतेय ते सुशांतसाठी नाही तर स्वतःसाठी करतेय." यानंतर अनेकांनी कंगनाला सोशल मीडियावर ट्रोल करत तिला संधीसाधू म्हणत तिच्यावर टीका केली होती.

  • नंतर स्पष्टीकरण देताना काय म्हणाले विकास सिंह

एका मुलाखतीत विकास सिंह यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देताना म्हटले की, "मला किंवा कोणालाही कंगनाबद्दल कोणतीही तक्रार नाही. फिल्म इंडस्ट्रीतील भेदभावाबद्दल कंगनाने आपले रोखठोक मत मांडले आहे. मी फक्त एवढंच म्हटले की, सुशांतच्या मृत्यूचे कारण त्यावेळी फक्त हेच (भेदभाव) वाटले नाही. पण जर याची थेट लिंक समोर आली तर सीबीआय त्या कोनातूनही चौकशी करेल.'