आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत प्रकरणात कोट्यावधींच्या व्यवहाराचे दावे:वर्षभरात सुशांतच्या दोन सीएच्या खात्यात ट्रान्सफर झाले होते 2.63 कोटी, दोन एफडीमधूनही काढण्यात आले होते 2.5 कोटी रुपये

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मे 2019 पासून एप्रिल 2020 च्या काळात दोन्ही चार्टर्ड अकाउटेंटच्या खात्या ट्रांजेक्शन
  • सुशांतच्या कुटुंबियांचा दावा आहे की, रिया चक्रवर्तीच्या इशाऱ्यावर हे व्यवहार करण्यात आले

सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात धक्कादायक वृत्त समोर आले आहे. रिपोर्ट्सनुसार सुशांतच्या खात्यातून मे 2019 ते एप्रिल 2020 या कालावधीत दोन सीएंच्या खात्यात 2.63 कोटी रुपयांचा व्यवहार झाला. त्यातील एकाचे नाव संदीप श्रीधर असे आहे, जो सुशांतच्या मृत्यूच्या आधी त्याच्यासाठी वर्षभर कार्यरत होता.

टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार सुशांतने आपली बहीण राणीसाठी दोन फिक्स डिपॉझिट केले. दोघांची एकूण रक्कम 4.5 (2.5 + 2) कोटी होती. परंतु दोन दिवसांनंतर दोन्ही एफडीमधून 2.5 (1.5 + 1) कोटी वजा करण्यात आले. या दोन्ही फिक्स डिपॉझिट 26 नोव्हेंबर 2019 रोजी करण्यात आल्या आणि 28 नोव्हेंबरला त्या मोडण्यात आल्या आणि नवीन फिक्स ठेवी प्रत्येकी एक कोटीच्या करण्यात आल्या होत्या.

हा व्यवहार रियाच्या सांगण्यावरून झाला का?

रिया चक्रवर्तीच्या आदेशानुसार दोन सीएच्या खात्यात 2.63 कोटी रुपयांचे हस्तांतरण आणि फिक्स डिपॉझिटमधून 2.5 कोटी काढल्याचा आरोप सुशांतच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, याबाबत सीएची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आणि रियानेही याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

रियाच्या भावाची ईडीकडून 20 तास चौकशी
अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रियाविरूद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करीत आहे. शुक्रवारी तिला चौकशीसाठी बोलावण्यात आले. तिची सुमारे साडे आठ तास चौकशी करण्यात आली. शनिवारी तिचा भाऊ शोविकला फोन करण्यात आला आणि जवळपास 20 तास त्याची चौकशी केली गेली. शनिवारी ईडी कार्यालयात पोहोचलेल्या शोविकला रविवारी सकाळी तेथून बाहेर पडताना पाहिले. या प्रकरणात रियाचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, सीए रितेश शहा आणि सुशांतचा फ्लॅट मेट सिद्धार्थ पिठानी याचीही चौकशी झाली आहे.

सोमवारी पुन्हा रियाची चौकशी केली जाईल

शुक्रवारी रिया अनेक प्रश्नांची उत्तरे योग्य प्रकारे देऊ शकली नाही. तिच्या व आपल्या वडिलांच्या इंद्रजितच्या नावावर रिजस्टर्ड दोन फ्लॅट्सबाबत ती स्पष्टपणे सांगू शकली नाही. तिचे उत्पन्न आणि खर्चाविषयीही ती स्पष्ट करु शकली नाही. हेच कारण आहे की अंमलबजावणी संचालनालयाने सोमवारी पुन्हा तिला चौकशीसाठी बोलावले. रियाकडून पुढील प्रश्न शोविकच्या चौकशीच्या आधारे केले जातील असे सांगितले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...