आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत आत्महत्या प्रकरण:मुंबई पोलिसांनी रुमी जाफरींना चौकशीसाठी बोलावले, मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी सुशांतने फोन करुन त्यांना डिप्रेशनविषयी दिली होती माहिती

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रुमी जाफरी सुशांतच्या जवळच्या मित्रांपैकी एक आहे, ते सुशांत आणि रियासोबत एक चित्रपट बनवण्याची प्लानिंग करत होते
  • या प्रकरणी आतापर्यंत 40 लोकांची चौकशी झाली आहे, यामध्ये राजीव मसंद, आदित्य चोपडासारख्या लोकांचा समावेश आहे

सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे. सुमारे 40 जणांचे जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी बुधवारी चित्रपट निर्माते रुमी जाफरे यांना वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलावले. त्यांचा जबाब नोंदवण्यासाठी ते जवळपास तीन वाजता पोहोचले. रुमी यांनी मुलाखतीत सांगितले होते की सुशांतसोबत त्यांचे त्याच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी 12 जून रोजी बोलणे झाले होते. यावेळी सुशांतने त्याच्या डिप्रेशनविषय़ी सांगितले होते आणि इंडस्ट्री सोडण्याची इच्छाही व्यक्त केली होती. 

सुशांतच्या जवळच्या मित्रांमध्ये सामिल आहेत रुमी जाफरी
रुमी सुशांतच्या जवळच्या मित्रांमधील एक आहेत. अभिनेत्याच्या निधनानंतर त्यांनी खुलासा केला होता की, त्यांना सुशांत आणि रिया चक्रवर्तीसोबत एक फिल्म बनवायची होती. रुमी म्हणाले होते की, मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच सुशांतने स्क्रिप्टविषयी चर्चाही केली होती. या दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग असल्याची माहिती आहे. 

रुमी हे सुशांत आणि गर्लफ्रेंड रियासोबतच्या फिल्मचे काम हे एप्रिलमध्ये सुरु करणार होते. मात्र लॉकडाऊनमुळे असे होऊ शकले नाही. यानंतर त्यांनी प्लान केला होता की, देशातील परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर चित्रपटाची शूटिंग सुरू केली जाईल. 

सुशांतजवळ काम न होण्याच्या दाव्यावर भडकले होते रुमी 
14 जूनला सुशांतने मुंबई येथील आपल्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली. यानंतर अनेक अंदाज वर्तवण्यात आले. सुशांतजवळ काहीच काम नव्हते असाही अंदाज वर्तवण्यात आला होता. याच कारणामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता असे बोलले जात होते. मात्र यावर रुमी जाफरी प्रचंड भडकले होते. 

रुमी जाफरी एका मुलाखतीत भावुक होऊन म्हणाले होते की- मी केवळ यासाठी मीडियासोबत बातचित करण्यासाठी आलो आहे कारण सुशांत सारख्य सुपरस्टारविषयी असे बोलले जात आहे. त्याच्या जवळ कोणतेही काम नव्हते आणि तो आर्थिक चणचणीचा सामना करत होता. हे सर्व वाचून मला खूप त्रास झाला. तो खूप टॅलेंटेड होता आणि लीडचा स्टार होता. लोक त्याच्यासोबत न्याय करत नाहीये. प्लीज त्याचा सन्मान करा. तो स्टार होता आणि जोपर्यंत इंडस्ट्री आहे तोपर्यंत स्टार राहिल.