आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Death Case: Mystery Woman Seen In Building Compound On The Day Of Actor's Death In Unseen Video, Family Raised Questions

सुशांत मृत्यू प्रकरणात नवीन दावा:सुशांतच्या पार्थिवाजवळ काळ्या बॅगसोबत दिसली एक व्यक्ती; खाली उतरुन मिस्ट्री गर्लला भेटतो आणि मग त्याच्या हातातील बॅग गायब होते

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाजवळ काळ्या रंगाच्या कपड्यात दिसणा-या व्यक्तीचे नाव दीपेश सावंत असल्याचे सांगितले जाते, तो सुशांतचा हाऊस मॅनेजर होता. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. - Divya Marathi
सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाजवळ काळ्या रंगाच्या कपड्यात दिसणा-या व्यक्तीचे नाव दीपेश सावंत असल्याचे सांगितले जाते, तो सुशांतचा हाऊस मॅनेजर होता. अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही.
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एका वृत्तवाहिनीने क्राइम सीनच्या माध्यमातून काही अनसीन व्हिडिओ उघडकीस आणल्याचा दावा केला आहे.
  • सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला आणि ते म्हणाले - पोलिसांच्या उपस्थितीत घटनास्थळावरुन असे सामान घेऊन जाणे संशयास्पद आहे

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात एका वृत्तवाहिनीने क्राइम सीनच्या माध्यमातून काही अनसीन व्हिडिओ उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी प्रश्न उपस्थित केला आणि ते म्हणाले - पोलिसांच्या उपस्थितीत घटनास्थळावरुन असे सामान घेऊन जाणे संशयास्पद आहे

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) करत आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीने सुशांतच्या मृत्यूच्या दिवशीचे काही अनसीन व्हिडिओ मिळाल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत एक पुरुष आणि एक महिला दिसत असून दोघांवरही संशयाची सुई आहे. या पुरुष आणि मिस्ट्री गर्लवर सुशांतच्या कुटुंबीयांनी प्रश्न उपस्थित केले आहे.

  • व्हिडिओमध्ये काय दिसतंय?

रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक पुरुष सुशांतच्या पार्थिवाजवळ एक काळ्या रंगाची बॅग धरुन उभा दिसतोय. त्याने फिकट गुलाबी रंगाची टोपी घातली आहे. ही व्यक्ती सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंत असल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती काळ्या रंगाची ही बॅग घेऊन घराच्या खाली उतरतानाही दिसतेय.

या व्हिडिओमध्ये निळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या टॉपमध्ये एक मुलगी सुशांतच्या बिल्डिंग कंपाऊंडमध्ये चालताना दिसत आहे. ती जाऊन या व्यक्तीला भेटते, त्यांच्यात काही वेळ बोलणे होते. त्यानंतर या व्यक्तीच्या हातात काळ्या रंगाची बॅग दिसत नाही. खास गोष्ट म्हणजे हे सर्व घडत असताना मुंबई पोलिसही तिथे हजर असतात.

कुटुंबाचा काय आहे प्रश्न?

व्हिडिओ पाहिल्यानंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी संशयित व्यक्ती, बॅग आणि महिलेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, "घटनेच्या दिवशी एखादी व्यक्ती घरातून काही घेऊन जात असेल तर हे संशयास्पद आहे. तो एखाद्या मुलीशी बोलतो आणि नंतर ती गायब होते, हेदेखील संशयास्पद आहे. त्या मुलीची ओळख पटली पाहिजे", असे ते म्हणाले आहेत.

विकास सिंह यांनी याबाबत मुंबई पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या उपस्थितीत एक अज्ञात व्यक्ती आणि एक महिला घटनास्थळावर कशी येऊ किंवा जाऊ शकते. हे सर्व पुरावे पुसून टाकण्यासाठी केले गेले आहे, अशी शंकादेखील त्यांनी उपस्थित केली आहे.

बातम्या आणखी आहेत...