आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ड्रग्स केसमध्ये रियाचा खुलासा:NCB च्या चार्जशीटमध्ये अभिनेत्रीचा जबाब - बहिण आणि मेहुण्यासोबत गांजा घ्यायचा सुशांत

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोणत्याही भिती आणि धमकीशिवाय दिला जबाब

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स अँगलमध्ये रिया चक्रवर्तीच्या जबाबास नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB)आपल्या चार्जशीटमध्ये समाविष्ट केले आहे. वृत्तानुसार हा जबाब तिने हाताने लिहिलेले असून त्यात रियाने सुशांतच्या कुटूंबावर गंभीर आरोप केले आहेत. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांत तिला भेटण्यापूर्वीच मादक पदार्थांच्या आहारी गेली होती. म्हणूनच तो तिच्या जवळ आला होता.

सुशांत नशा करतो याची कुटुंबियांना होती माहिती
रियाने आपल्या जबाबात म्हटले आहे की, सुशांत आपली बहिण प्रियंका आणि भाऊजी सिद्धार्थसोबत गांजा घ्यायचा आणि त्यांच्यासाठी तो गांजाही आणायचा. रियाच्या कबुलीजबाबानुसार सुशांतच्या कुटुंबीयांना चांगल्या प्रकारे माहित होते की तो ड्रग्सच्या आहारी होता.

रियाने एनसीबीला असेही सांगितले की, जेव्हा सुशांतची प्रकृती बिघडू लागली तेव्हा त्याचा भाऊ शौविक त्याला रुग्णालयात दाखल करणार होता, पण तो तयार झाला नाही. रियाच्या म्हणण्यानुसार सुशांत तिला भेटायचा जेणेकरुन ती त्याला (सुशांतला) ड्रग्स पुरवू शकेल.

प्रियंकाने पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनचाही उल्लेख
रियाने आपल्या जबाबामध्ये त्या प्रिस्क्रिप्शनचाही उल्लेख केला आहे, जे 8 जून 2020 ला सुशांतची बहिण प्रियंकाने तिला व्हॉट्सअपवर पाठवले होते. यामध्ये librium 10 mg, nexito, सारख्या औषधांचा उल्लेख होता. जे NDPS नुसार ड्रग्स होते. प्रिस्क्रिप्शनमध्ये सुशांतला हे औषध घेण्यास सांगण्यात आले होते. औषधांची ही चिठ्ठी दिल्लीचे कार्डियोलॉजिस्ट डॉ. तरुणने सुशांतला न भेटता बनवली होती. कंसल्टेशन शिवाय हे औषध दिले जाऊ शकत नाहीत.

औषधांनी सुशांतचा मृत्यूही होऊ शकत होता
रियाने NCB ला दिलेल्या जबाबात एक गोष्ट विशेष नोट केली आहे की, प्रियंकाने पाठवलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या औषधांनी सुशांतचा मृत्यूही होऊ शकत होता. 8-12 जून दरम्यान त्याची बहिण मीतू त्याच्यासोबत राहत होती. तिने याविषयीही माहिती मुंबई पोलिसांना दिली होती.

कोणत्याही भिती आणि धमकीशिवाय दिला जबाब
रियाने आपल्या जबाबात म्हटले आहे की, तिने सुशांतला रुग्णालयात दाखल करण्याचा प्रयत्न केला होता आणि याचे तिच्याकडे पुरावेही आहेत. मात्र यासाठी सुशांत तयार नव्हता. यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करु शकली नाही. रियाने आपल्या जबाबात शेवटी लिहिले आहे की, तिला अशा प्रकारचे जबाब देण्यासाठी NCB द्वारे घाबरवण्यात किंवा धमकावण्यात आले नाही. सर्व अधिकाऱ्यांनी तिच्यासोबत चांगला व्यवहार केला.

12 हजार पानांचे चार्ज शीट, 200 साक्षीदारांचे जबाब
नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने गेल्या वर्षी 14 जूनला झालेल्या बॉलिवूड अॅक्टर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्स अँगलमध्ये 5 मार्चला मुंबईच्या एका विशेष कोर्टाच्या समक्ष आरोपपत्र दाखल केला होता. 12,000 पानांच्या चार्जशीटमध्ये अभिनेत्री आणि सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविकसह 33 आरोपींची नावे आहेत. या डॉक्यूमेंट्समध्ये 200 पेक्षा जास्त साक्षीदारांचे जबाब आहेत.

NCB ने सुशांतच्या रुम पार्टनरला केली अटक
तपास एजेंसीने मेच्या अखेरीस सुशांत सिंह राजपूतचा रुम पार्टनर राहिलेल्या सिद्धार्थ पिठाणीला हैदराबादेतून अटक केली होती. 4 जूनच्या रिपोर्टनुसार, त्याला 14 दिवसांसाठी NCB च्या ताब्यात देण्यात आले होते.

14 जून 2020 ला जेव्हा सुशांत आपल्या बेडरुममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता, तेव्हा त्याच्या घरात उपस्थित लोकांमध्ये पिठानीचा समावेश होता. NDPS अॅक्टच्या सेक्शन 27A, 28 आणि 29 अनुसार अटक केलेल्या पिठानीवर ड्रग्स खरेदी करणे आणि सुशांतपर्यंत पोहोचवण्याचा आरोप आहे.

बातम्या आणखी आहेत...