आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा निकटवर्तीय राहिलेल्या ऋषिकेश पवारचा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो शोध घेत आहे. तो सध्या बेपत्ता आहे. अनेक समन्स पाठवूनही ते अद्याप तपास यंत्रणेसमोर हजर झालेला नाही.
एका ड्रग सप्लायरने सुशांतचा माजी सहायक दिग्दर्शक ऋषिकेश पवारचे नाव घेतले होते. त्यानंतर फक्त एकदाच ऋषिकेशची चौकशी झाली होती. पण त्यानंतर तो बेपत्ता असल्याची नोंद आहे. सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंत या देखील ऋषिकेश सुशांतसाठी ड्रग्ज आणत असल्याचा दावा केला होता.
अटकपूर्व जामीन याचिका गुरुवारी फेटाळली
या प्रकरणात अटक टाळण्यासाठी ऋषिकेश पवारने एनडीपीएस न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी याचिका दाखल केली होती, मात्र त्याची ही याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. यानंतर त्याच्या शोधात जेव्हा तपास यंत्रणा त्याच्या घरी पोहोचली तेव्हा तो घरी सापडला नाही. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले की, ते पवार शोध घेत आहेत. असे म्हणतात की, पवारने काही काळ सुशांतसोबत काम केले होते. पण मागील वर्षी त्याला काढून टाकण्यात आले होते.
एनसीबी बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणाची सातत्याने चौकशी करत आहे
सुशांत सिंह राजपूत 14 जून 2020 रोजी मुंबईच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत सापडला होता. त्याच्या निधनानंतर सीबीआय, ईडी, एनसीबी, मुंबई पोलिस आणि बिहार पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला, पण अभिनेत्याच्या मृत्यूमागील खरे कारण अद्याप समोर आलेले नाही. या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आल्यानंतर सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला एक महिना तुरूंगात राहावे लागले होते तर तिचा भाऊ शोविक हादेखील 3 महिने तुरुंगात होता.
यानंतर बॉलिवूडमध्ये ड्रग्जचे मोठे रॅकेट उघडकीस आले. दीपिका पदुकोणसह अनेक अभिनेत्रींची याप्रकरणी चौकशी करण्यात आली. अभिनेता अर्जुन रामपाललाही याचा फटका बसला. 30 पेक्षा जास्त ड्रग्ज पेडलर्सना अटक करण्यात आली आहे. एनसीबी अद्याप या प्रकरणाचा तपास करत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.