आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समोर आला रियाचा खोटारडेपणा:रिया म्हणाली होती- 'सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया होता आणि तो विमान प्रवासापूर्वी मोडाफिनिल नावाचे औषध घ्यायचा';  पण हे औषध या आजारासाठीचे नाहीच

मुंबई3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • मानसोपचारतज्ज्ञ डॉ. गुंजन सोलंकी यांनी सांगितल्यानुसार, मोडाफिनिल औषधाचा क्लॉस्ट्रोफोबियाशी काही संबंध नाही, हे औषध स्लीप डिसऑर्डर असलेल्या रूग्णांना दिले जाते.
 • सुशांतला क्लॉस्ट्रोफोबिया असल्याचा दावाही संशयाच्या भोव-यात आहे, कारण सुशांतने बोईंग -737 प्रशिक्षण घेतले होते.
 • अंकिता लोखंडे हिनेदेखील सुशांतचा विमान चालवतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. रिया चक्रवर्ती हिने अलीकडेच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुशांत आणि तिच्या यूरोप ट्रिपचा उल्लेख केला. सोबतच यूरोप ट्रिपला जाण्यापूर्वी सुशांतलने मोडाफिनिल नावाचे औषध घेतले होते, असे तिने सांगितले आहे. रियाच्या सांगण्यानुसार, सुशांतला फ्लाइटमध्ये बसण्यास भीती वाटायची. ही भीती दूर करण्यासाठी तो मोडाफिनिल नावाचे औषध घेत असे. हे औषध त्याला हरेश शेट्टी नावाच्या मानसोपचार तज्ञाने दिले होते. हे औषध तो कायम आपल्या जवळ बाळगायचा, असा दावा रियाने केला आहे.

 • क्लॉस्ट्रोफोबिया म्हणजे काय?

क्लॉस्ट्रोफोबिया हा एक प्रकारचा एंजियोटिक डिसऑर्डर आहे. या आजाराच्या रूग्ण बंद ठिकाणी गेल्यास अस्वस्थ होतात. किंवा त्यांना तिथए गुदमरल्यासारखे वाटते. या डिसऑर्डरचा काही रुग्ण लिफ्ट किंवा एमआरआय मशीनमध्ये जाण्यासही खूप घाबरतात.

 • एका वक्तव्यातून रियाचे दोन खोटे उघड झाले

पहिला खोटारडेपणा : क्लॉस्ट्रोफोबिया असलेल्या रूग्णांना मोडाफिनिल औषध दिले जात नाही

 • जयपूरच्या एसएमएस हॉस्पिटलच्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. गुंजन सोलंकी यांच्या म्हणण्यानुसार, क्लॉस्ट्रोफोबिया असलेल्या रूग्णांना मोडाफिनिल औषध दिले जात नाही. या विकाराशी या औषधाचा काही संबंध नाही. मोडाफिनिल हे औषध स्लीप डिसऑर्डर असलेल्या रुग्णांना प्रिस्क्राइब केले जाते.
 • ज्या रुग्णांना खूप झोप येते, त्यांची झोप कमी करण्यासाठी त्यांना हे औषध दिले जाते. लेटनाइट शिफ्टमध्ये काम करणारे अनेकदा वैद्यकीय सल्ल्यासह हे औषध घेत असतात. या औषधाचा क्लॉस्ट्रोफिबिया या आजाराशी काहीही संबंध नाही.
 • जर एखाद्या व्यक्तीस उंच ठिकाणाची किंवा उडण्याची भीती वाटत असेल तर त्यावेळी ते झोपण्याला प्राधान्य देतात. यादरम्यान, जर मोडाफिनिल हे औषध घेतले तर त्या व्यक्तीला झोपच येणार नाही.

दुसरा खोटारडेपणा : बोईंग - 737 विमानाचे ट्रेनिंग घेणा-याला उंच आणि बंद जागेची भीती कशी असू शकते

 • सुशांतला उंच ठिकाणाची किंवा विमानात बसण्याची भीती होती, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. कारण सुशांतचे अनेक व्हिडिओ आहेत ज्यात तो विमानात बसलेला दिसतोय. विमान प्रवासादरम्यान त्याचे हावभाव बघता त्याला क्लॉस्ट्रोफोबिया आहे, असे क्षणभरही कुणाला वाटणार नाही.
 • सुशांतने बोईंग -737 चालविण्याचे ट्रेनिंगही घेतले होते. हे ट्रेनिंग पूर्ण करण्यासाठी त्याला ते विकत घ्यायचे होते. त्याने स्वत: त्याच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ शेअर केले होते.
 • सुशांतसोबत बरीच वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या अभिनेत्री अंकित लोखंडे हिनेदेखील रियाचा हा दावा खोटा ठरवला आहे. अंकिताने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये सुशांतचा विमान चालवताना व्हिडिओ शेअर केला आहे.
 • अंकिताने शेअर केलेल्या 1 मिनिटे 56 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये सुशांत विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. अंकिताने व्हिडिओ शेअर करुन लिहिले, ‘हे क्लॉस्ट्रोफोबिया claustrophobia आहे का? तुला नेहमीच विमान उडवायचे होते आणि तू ते करून दाखवले. आम्हाला तुझा अभिमान आहे.’
एका फिल्मसाठी सुशांतने नासामधून ट्रेनिंग घेतले होते.
एका फिल्मसाठी सुशांतने नासामधून ट्रेनिंग घेतले होते.