आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंगळवारी एम्सने दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा व्हिसेरा अहवाल सीबीआयकडे सादर केला. यावेळी पॅनेलने मुंबई फोरेन्सिक लॅबने केलेल्या घोर दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. त्यांच्या मते प्रयोगशाळेने अनेक आवश्यक चाचण्या केल्या नाहीत. यातील एक चाचणी होती, ज्याद्वारे सुशांतला ड्रग्ज देण्यात आले होते की नाही? हे समजू शकले असते.
निष्काळजीपणा समोर आल्यानंतर सुशांतच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, कदाचित त्याला जबरदस्तीने ड्रग्ज दिले गेले असावेत. आता सीबीआय हे शोधण्याचा प्रयत्न करीत आहे की, मुंबईच्या फोरेन्सिक लॅबने व्हिसेराच्या चाचणीत असे दुर्लक्ष का केले?
एम्सच्या 5 डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. सुधीर गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आणि सीबीआयने या प्रकरणात एकत्र काम केले आहे. परंतु अद्याप काही गोष्टींवर चर्चा होणे आवश्यक आहे. गुप्तांच्या म्हणण्यानुसार, हे खरे आहे की सुशांतच्या शरीरात विषाचा अंश सापडला नाही. पण तरीही सुशांतने आत्महत्या केली की त्याला मारण्यात आले हे स्पष्टपणे सांगता येत नाही.
1 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी सुशांतच्या व्हिसेरा तपासणीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये फॉरेन्सिक लॅबने असे म्हटले होते की, अभिनेताच्या शरीरात कोणतेही विष किंवा संशयास्पद रसायन सापडले नाही. सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंतर गुदमरल्यामुळे झाला असा दावाही अहवालात करण्यात आला आहे.
वृत्तानुसार, सुशांत मृत सापडलेल्या खोलीत जाऊन सीबीआयने डमी टेस्ट केली होती. आता त्याच्या रिपोर्टची प्रतिक्षा आहे. अजून काही अहवाल सीबीआयला मिळालेले नाहीत. या प्रकरणातील दिरंगाईच्या प्रश्नावर सीबीआयने स्पष्टीकरण दिले की ते प्रत्येक कोनातून या प्रकरणाची चौकशी करत आहेत. याच कारणामुळे तपासाला विलंब होत आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.