आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत प्रकरणात नवा खुलासा:सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या घरी येणा-या 'मिस्ट्री गर्ल'चे शिबानी दांडेकरकडून रहस्य उघड, म्हणाली- माझ्याविषयीच्या अफवा पसरवणे थांबवा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 जून रोजी सुशांतच्या बिल्डिंगच्या कंपाऊंडमध्ये ही मिस्ट्री गर्ल दिसली होती. शिबानी दांडेकर ही अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड असून तिने ट्विटरवर एक स्पष्टीकरण दिले आहे.
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एका वृत्त वाहिनीने क्राइम सीनचे काही अनसीन व्हिडिओ समोर आणल्याचा दावा केला आहे.
  • 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या घरी पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता, याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एडीआर नोंदवला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या दिवशी त्याच्या घरी जाणा-या मिस्ट्री गर्लचे रहस्य समोर आले आहे. 14 जून रोजीच्या व्हिडिओमध्ये एक तरुणी सुशांतच्या घराच्या कंपाऊंडमध्ये दिसली होती. ही तरुणी सुशांतची पीआर आणि असिस्टंट राधिका निहलानी असल्याचे आता उघड झाले आहे. यापूर्वी ही तरुणी शिबानी दांडेकर असल्याचे म्हटले गेले होते. मात्र आता शिबानीने स्वत: समोर येऊन मौन सोडले असून ती मुलगी मी नाही, असे म्हटले आहे. शिबानी ही अभिनेता फरहान अख्तरची गर्लफ्रेंड आहे.

शिबानीने ट्विट करुन सांगितले, ''ही व्यक्ती मी नाही आणि सिमोनसुद्धा नाहीये. संशय घेण्यापूर्वी एकदा सत्य काय आहे ते जाणून घ्या. ही मुलगी सुशांत सिंह राजपूतची पीआर आणि अस्टिस्टंट राधिका निहलानी आहे. त्यामुळे अफवा पसरवणे बंद करा. खूप झाले. मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणत्याही खोट्या आणि चुकीच्या गोष्टी पसरवाल'', असा संतापदेखील शिबानीने व्यक्त केला आहे.

  • राधिका निहलानी कोण आहे?

राधिका निहलानी ही सुशांतची पीआर होती. ती सुशांतच्या थिंक इन फाऊंडेशनची को फाऊंडर होती. तसेच ती चित्रपट निर्माते आणि सीबीएसी चीफ पहलाज निहलानी यांची सून असल्याचे म्हटले जाते. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी राधिकाचीदेखील चौकशी झाली होती.

  • व्हिडिओमध्ये काय दिसले होते?

रिपब्लिक टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओमध्ये काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये एक पुरुष सुशांतच्या पार्थिवाजवळ एक काळ्या रंगाची बॅग धरुन उभा दिसतो. त्याने फिकट गुलाबी रंगाची टोपी घातली आहे. ही व्यक्ती सुशांतचा हाऊस मॅनेजर दीपेश सावंत असल्याचे सांगितले जात आहे. ही व्यक्ती काळ्या रंगाची ही बॅग घेऊन घराच्या खाली उतरतानाही दिसतेय. या व्हिडिओमध्ये निळ्या आणि पांढर्‍या रंगाच्या टॉपमध्ये एक मुलगी सुशांतच्या बिल्डिंग कंपाऊंडमध्ये ये-जा करताना दिसत आहे. ती जाऊन या व्यक्तीला भेटते, त्यांच्यात काही वेळ बोलणे होते. त्यानंतर या व्यक्तीच्या हातात काळ्या रंगाची बॅग दिसत नाही. खास गोष्ट म्हणजे हे सर्व घडत असताना मुंबई पोलिसही तिथे हजर असतात.

  • सुशांतच्या वडिलांच्या वकिलांनी उपस्थित केले प्रश्न

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी संशयित व्यक्ती, बॅग आणि महिलेविषयी प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले होते, "घटनेच्या दिवशी एखादी व्यक्ती घरातून काही घेऊन जात असेल तर हे संशयास्पद आहे. तो एखाद्या मुलीशी बोलतो आणि नंतर ती गायब होते, हेदेखील संशयास्पद आहे. त्या मुलीची ओळख पटली पाहिजे", असे ते म्हणाले होते. सिंह यांनी याबाबत मुंबई पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, पोलिसांच्या उपस्थितीत एक अज्ञात व्यक्ती आणि एक महिला घटनास्थळावर कशी येऊ किंवा जाऊ शकते. हे सर्व पुरावे पुसून टाकण्यासाठी केले गेले आहे, अशी शंकादेखील त्यांनी उपस्थित केली.