आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Death Case: Rhea Chakraborty Names Sara Ali Khan In Her Statement To NCB, Says She Used To Provide Me With Marijuana Joints

सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील कबुलीजबाब:रिया चक्रवर्तीने NCB समोर घेतले सारा अली खानचे नाव, म्हणाली- ती मला मारुआना जॉइंट्स पुरवत असे

15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रियाने अनेकदा सारासोबत ड्रग्जचे सेवन केले

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सप्टेंबर 2020 मध्ये अभिनेत्री सारा अली खानची चौकशी केली होती. 'केदारनाथ' चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात सारा सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान साराचे नाव एनसीबीसमोर घेतले होते. आता रिया चक्रवर्तीने एनसीबीला दिलेला कबुलीजबाब मीडियामध्ये व्हायरल होत आहे, त्यात तिने सारावर गंभीर आरोप केले आहेत. रियाचा हा कबुलीजबाब एनसीबीने आपल्या चार्जशीटमध्ये सामिल केल्याचे सांगण्यात येत आहे.

रियाने अनेकदा सारासोबत ड्रग्जचे सेवन केले
रियाने आपल्या जबाबात सांगितले, 'ड्रग्जसंदर्भात आमच्या दोघींत अनेकदा बोलणे झाले, ज्यामध्ये ती (सारा) हँगओव्हरवरील उपाय मला सांगायची. सारा आईस्क्रीम आणि गांजाबद्दल माझ्याशी चर्चा करायची. याचे सेवन ती स्वतः करायची आणि वेदना शमवण्यासाठी ती मला ऑफर करायची. आमच्यातील हे बोलणे टेक्स्ट होते, वैयक्तिकरित्या आमच्यात बातचीत झाली नव्हती. सारा रोल्ड डुबीज घ्यायची. डुबीज हे मारुआना (गांजा) चे जॉइंट्स आहेत. अनेकदा मी साराबरोबर ते घेतले. ती मला डुबीज पुरवत असे," असे रियाने आपल्या जबाबात नमुद केले आहे.

साराने एनसीबीला काय सांगितले होते
रिपोर्ट्सनुसार सप्टेंबर 2020 मध्ये चौकशी दरम्यान साराने एनसीबीसमोर 2018 मध्ये ती सुशांतसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. साराच्या म्हणण्यानुसार, 'केदारनाथ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान या दोघांचे अफेअर सुरू झाले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ती सुशांतबरोबर त्याच्या केप्री हाऊस स्थित घरी त्याच्यासोबत राहण्यासाठी गेली होती, असे साराने सांगितले होते. ती सुशांतसोबत पाच दिवसांसाठी थायलंडच्या कोह सॅम्यूई आयलँडवर गेली होती, तिथे दोघांनी एकत्र पार्टी केली होती.

स्वतः ड्रग्जचे सेवन करत असल्याचे नाकारले होते
साराने कबूल केले होते की, सुशांत 'केदारनाथ'च्या शूटिंगदरम्यान ड्रग्ज घेत असे. तिच्या म्हणण्यानुसार, ती सुशांतबरोबर पार्ट्यांमध्ये जायची. पण, तिने स्वत: कधीच ड्रग्जचे सेवन केले नाही. मात्र, सुशांतने ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ड्रग्ज घ्यायला सुरवात केली होती की तो यापूर्वीच त्याचे सेवन करत होता हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

बातम्या आणखी आहेत...