आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रिया चक्रवर्तीचा पलटवार:सुशांतच्या कुटुंबाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार रिया; वकील म्हणाले- सुशांतच्या आजारपणाविषयी बहिणींना माहिती असताना सुप्रीम कोर्ट, ईडीला खोटे सांगितले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका इंग्रजी न्यूज वेबसाईटच्या वृत्तानुसार रिया चक्रवर्ती आता सुशांतच्या कुटुंबाविरोधात लीगल अ‍ॅक्शन घेणार आहे.
  • सोमवारी सीबीआयने रिया चक्रवर्तीची सलग चौथ्या दिवशी चौकशी केली. तिला ड्रग्ज चॅटविषयी प्रश्न विचारले गेले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाला आता नवी कलाटणी मिळाली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी समजली जाणारी रिया चक्रवर्ती आता सुशांतच्या कुटुंबाविरोधात कायदेशीर कारवाईची तयारी करत आहे. सुशांतच्या आजारपणाविषयी कुटुंबातील सदस्यांना माहित होते, तरीही त्यांनी तपास अधिकारी आणि सर्वोच्च न्यायालयासमोर खोटी विधाने केली, असा दावा तिने केला आहे.

  • खरंच सुशांतचे कुटुंबीय सर्वोच्च न्यायालय आणि ईडीशी खोटे बोलले का?

टीओआयच्या रिपोर्टनुसार, रियाचे वकील सतीश मानशिंदे म्हणाले, "औषधांचे प्रिस्क्रिप्शन आणि समोर आलेल्या दोन बहिणींच्या चॅटवरुन सुशांतच्या कुटुंबीयांना त्याच्या आजारपणाविषयी सर्वकाही माहित होते. त्यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्ट आणि ईडीला खोटे जबाब दिले आहेत", असे ते म्हणाले आहेत.

सतीश मानशिंदे पुढे म्हणाले, 'औषधांचे प्रिस्क्रिप्शन बहिणींनी एकमेकींना पाठवले होते. ईडी आणि कोर्टासमोर ते खोटे बोलत आहेत. डॉक्टरांचा घेतलेला सल्लासुद्धा बेकायदेशीर होता. ऑनलाइन सल्ला घेतला असला तरी रुग्णाचा इतिहास माहित असल्याशिवाय डॉक्टर औषधे लिहून देत नाहीत. त्यामुळे रिया याविरोधात कारवाई करणार आहे.'

  • सुशांतच्या मोठ्या बहिणींना होती त्याच्या आजापणाची कल्पना

यापूर्वी रविवारी सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदी आणि त्याची मोठी बहीण मितू सिंह यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅट समोर आले. सुशांत डिप्रेशनमध्ये होता हे त्याच्या बहिणीला माहित होते हे चॅटमधून दिसून येते. या चॅटमध्ये श्रुतीने डॉक्टरांचा नंबर आणि सुशांतला लिहून दिलेल्या औषधांची नावेही मितूला सांगितली आहेत. या चॅटच्या स्क्रीनशॉटमध्ये श्रुतीशी बोलताना मितू स्वत: डॉक्टरांना भेटण्याविषयी म्हणाली होती.

  • सुशांत आणि मोठी बहीण प्रियंका यांचेही व्हॉट्सअ‍ॅप चॅट आले समोर

आता सुशांत आणि त्याची मोठी बहीण प्रियंका यांचेही काही मेसेज समोर आले असून यात तिने सुशांतला काही औषधे सुचवल्याचे सांगण्यात येत आहे. 8 जून रोजी प्रियंकाने सुशांतला काही औषधांची नावे सुचवली होती. यात तिने सुशांतला दिल्लीतील एका डॉक्टरांचे प्रिस्किप्शनदेखील दिल्याचे दिसून येत आहे. 'एक आठवडा Librium हे औषध घे. त्यानंतर दररोज नाश्त्यानंतर एकदा Nexito 10 mg हे घेत जा आणि जर कधी एजाइटी अटॅक आला तर Lonazep हे औषध घेत जा', असे मेसेज प्रियंकाने सुशांतला केले होते. त्यावर, 'सोनू दी पण कोणत्याही प्रिस्किप्शनशिवाय ही औषधे मिळणार नाही', असा रिप्लाय सुशांतने दिला होता. त्यावर 'मी पाहते काय करायचे, मी मॅनेज करते', असे प्रियंका सुशांतला म्हणाली होती.

  • सोमवारी सीबीआय टीम पुन्हा सुशांतच्या फ्लॅटवर

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करत असलेल्या सीबीआय टीमने सोमवारी पुन्हा त्याच्या वांद्रेतील फ्लॅटवर जाऊन तपास केला. दुसऱ्या टीमने रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ शोविक, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीची चौकशी केली. सलग चौथ्या दिवशी रियाची कसून चौकशी करण्यात आली. सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीलाही प्रश्न विचारण्यात आले. सीबीआय सूत्रांनुसार, सुशांतशी ब्रेकअप कधी झाला, त्यांच्या मृत्यूची बातमी कधी मिळाली, व्हॉट्सअॅप चॅट्स आदींबाबत रियाला प्रश्न विचारण्यात आले. आयपीएस नुपूर शर्मा यांनी रिया आणि शोविक या दोन्ही भावंडांना समोरासमोर प्रश्न विचारले. सूत्रांच्या माहितीनुसार, सोमवारी रियाला ड्रग चॅट आणि होम पार्टीजवर प्रश्न विचारण्यात आले होते, ज्याची तिला योग्य उत्तरे देता आले नाही. सीबीआयने विचारलेल्या प्रश्नांवरुन रिया संतापली होती. तिचा अधिका-यांशी वाद झाल्याचेही सांगितले जात आहे.

  • सीबीआय चौकशीच्या 12 व्या दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर रोजी रियाच्या आईची पहिल्यांदाच होतेय चौकशी

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीचा आज (मंगळवार) 12 वा दिवस आहे. रियाची आई संध्या चक्रवर्ती यांची सीबीआयकडून प्रथमच चौकशी केली जात आहे. रियाचे वडील इंद्रजितही सीबीआय कार्यालयात हजर आहेत. यापूर्वी असे वृत्त आले होते की, सीबीआय मंगळवारी पुन्हा रियाची चौकशी करेल. पण आता सांगितले जात आहे की, गरज पडल्यास रियाला बोलावले जाऊ शकते.

  • ईडीकडून गौरव आर्यची चौकशी

ईडीने सोमवारी गोव्याचा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्यची मनी लाँडरिंगबाबत चाैकशी केली. रिया व गौरव यांच्यातील ड्रग्जबाबतच्या व्हाॅट्सअ‍ॅप चॅटबाबत गौरवला प्रश्न करण्यात आले. रिया व शोविकसोबतच्या त्याच्या आर्थिक व्यवहारांचीही माहिती घेण्यात आली.