आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ड्रग्ज प्रकरणात नवीन दावा:ड्रग्जविषयी बोलण्यासाठी आपल्या आईचा फोन वापरायची रिया चक्रवर्ती, अभिनेत्रीने हा फोन ईडी ऑफिसमध्ये जमा केला नव्हता

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एनसीबीला रिया चक्रवर्तीच्या घरी तिच्या आईचा फोन मिळाला.
  • रियाने आईच्या फोनवर अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधित ड्रग्स प्रकरणातील आरोपी रिया चक्रवर्तीच्या संदर्भात एक नवीन दावा समोर आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या (एनसीबी) सूत्रांनी सांगितले की, रिया आपली आई संध्या चक्रवर्ती यांचा मोबाईल फोन ड्रग्जविषयी बोलण्यासाठी वापरत असे. असे सांगितले जात आहे की, जेव्हा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) रियाला तिचा फोन जमा करण्यास सांगितले तेव्हा तिने हा फोन दिला नव्हता.

  • एनसीबीला रियाच्या घरातून मिळाला फोन

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, एनसीबीला रियाचा आईचा फोन तिच्या घरातून मिळाला होता. या फोनद्वारे रिया आपल्या मित्रांसह इतर लोकांशी संपर्कात होती. या फोनच्या माध्यमातून ती अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपशीही जोडली गेली होची. या ग्रुपचे बरेच सदस्य आता एनसीबीच्या रडारवर आहेत.

  • ईडीच्या तपासणीत ड्रग्ज प्रकरण समोर आले होते

मनी लाँडरिंग प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीने रिया चक्रवर्तीचा मोबाईल फोन ताब्यात घेतला होता. तपासादरम्यान एजन्सीने अभिनेत्रीचे अनेक चॅट रिलीज केले. व्हॉट्सअॅप चॅटवरुन रियाचे जया साहा, श्रुती मोदी, सॅम्युअल मिरांडा आणि गौरव आर्य यांच्यासोबत ड्रग्ज कनेक्शन असल्याचे समोर आले. त्यानंतर एनसीबीने तिच्याविरोधात गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था केल्याप्रकरणी रियाला नंतर अटक करण्यात आली.

  • रिया चक्रवर्ती भायखळा कारागृहात आहे

रिया चक्रवर्ती 9 सप्टेंबरपासून मुंबईच्या भायखळा कारागृहात आहे. लोअर आणि सेशन कोर्टाकडून तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. अभिनेत्रीचे वकील सतीश मानशिंदे यांचे म्हणणे आहे की, मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्जासाठी ते घाई करु इच्छित नाही. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रियाविरोधात नवीन गुन्हा दाखल करू शकेल अशीही बातमी आहे.