आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक यांना त्यांच्या मालमत्ता आणि कमाईबद्दल विचारपूस करत आहे. दरम्यान, रियाचा एक वर्षाचा कॉल डिटेल रेकॉर्ड समोर आला आहे. एका रिपोर्टमध्ये कॉल डिटेल रेकॉर्ड्सचा हवाला देत दावा करण्यात आला आहे की, रिया चक्रवर्ती वांद्रेचे डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांच्या संपर्कात होती. तिने त्यांना दोनदा फोन केला होता आणि त्रिमुखे यांचा रियाला दोनदा कॉल आला होता. एवढेच नाही तर या दोघांमध्ये मेसेजवरही बोलणे झाले होते. 21 जून ते 18 जुलै दरम्यान रिया चक्रवर्ती आणि अभिषेक त्रिमुखे यांच्यात संभाषण झाले. वृत्तानुसार 21 जून रोजी त्रिमुखे यांनी रियाला फोन केला होता आणि सुमारे 28 सेकंद त्यांच्यात बोलणे झाले होते. यानंतर त्यांनी 22 जून रोजी रियाला मेसेज केला होता. 22 जून रोजी त्रिमुखे आणि रिया यांच्यात 29 सेकंद चर्चा झाली. 8 दिवसांनंतर, त्रिमुखेंनी रियाला फोन केला आणि सुमारे 66 सेकंद त्यांचे बोलणे झाले. 18 जुलै रोजी रियाने डीसीपींना फोन केला होता.
या संपूर्ण प्रकरणावर मुंबई पोलिसांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ते म्हणतात की हे फोन कॉल अधिकृत कारणास्तव केले गेले होते. रियाला वांद्रे आणि सांताक्रूझ पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले. त्यांना ही माहिती देण्यासाठी हे कॉल केले गेले होते.
टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, सुशांत आणि रिया यांच्यात वर्षभरात 147 वेळा फोनवर बातचित झाली होती. यापैकी 94 कॉल रियाने सुशांतला केले. तर 51 वेळा सुशांतचा कॉल रियाला आला होता. आश्चर्याची बाब म्हणजे सुशांतपेक्षा अधिक कॉल रियाने सुशांतच्या घराचा व्यवस्थापक सॅम्युएल मिरांडा आणि त्याची माजी व्यवस्थापक श्रुती मोदी यांना केले होते. दोघांच्या कॉल डिटेलचा डाटा: -
नाव | इनकमिंग कॉलची संख्या | आउटगोइंग कॉल नंबरची संख्या | एकूण कॉल (एसएमएस सहित) |
सॅम्युएल मिरांडा | 28 | 259 | 289 |
श्रुती मोदी | 222 | 569 | 808 |
रियाचे तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती आणि भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्याशी एका वर्षात फोनवर बोलणे झाले होते. तिने आपल्या वडिलांशी 890 वेळा आणि भावाबरोबर 886 वेळा बातचित केली. या दोघांसोबतचा रियाच्या कॉल्सचा डाटा: -
नाव | इनकमिंग कॉलची संख्या | आउटगोइंग कॉल नंबरची संख्या | एकूण कॉल (एसएमएस सहित) |
इंद्रजित चक्रवर्ती | 203 | 660 | 890 |
शोविक चक्रवर्ती | 243 | 629 | 886 |
कुटुंबीय आणि मॅनेजर्स व्यतिरिक्त रिया चक्रवर्ती डॉ. केरसी चावडा आणि डॉ. परवीन दादाचांजी या दोन मानसोपचार तज्ज्ञांच्या संपर्कात होती. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि सुशांत सिंह राजपूतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानी यांच्यातील कॉलचा तपशीलही या अहवालात देण्यात आला आहे. रिया आणि या चौघांमधील कॉल्सचा डाटा: -
नाव | इनकमिंग कॉलची संख्या | आउटगोइंग कॉल नंबरची संख्या | एकूण कॉल (एसएमएस सहित) |
डॉ. केरसी चावडा | 5 | 10 | 15 |
डॉ.परवीन दादाचांजी | 1 | 5 | 6 |
सिद्धार्थ पिठाणी | 16 | 84 | 101 |
महेश भट्ट | 7 | 9 | 16 |
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.