आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत मृत्यू प्रकरण:संशयाच्या भोव-यात सापडलेला संदीप देशाबाहेर जाण्याच्या तयारीत, त्याची पीआर एजन्सी व्हिसा एजंटच्या संपर्कात; रिया म्हणाली- मी संदीपला ओळखत नाही

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृत्तानुसार संदीप सिंहच्या पीआर टीमने व्हिसा एजंटसोबत चर्चा सुरू केली आहे.
  • रियाने एका बातचीतदरम्यान सांगितले की, संदीप कधी घरी आला नाही किंवा त्याचा कधी फोनही आला नाही

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात निर्माता संदीप सिंह संशयाच्या भोव-यात सापडला आहे. ताज्या रिपोर्टनुसार, आता तो देशाबाहेर जाण्याची तयारी करत आहे. तो ब्रिटनला जाऊ शकतो. त्याच्या पीआर एजन्सीने व्हिसा एजंटसोबत चर्चा सुरू केली आहे.

  • सुशांतच्या कुटुंबाप्रमाणे रियासुद्धा संदीपला ओळखत नाही.

कॉल डिटेलवरून संदीपचे गेल्या दीड वर्षांत सुशांतसोबत एकदाही फोनवर बोलणे झाले नसल्याचे समोर आले आहे. सुशांतचे कुटुंबीयदेखील संदीपला ओळखत नाही. आता सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीनेसुद्धा हाच दावा केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना रिया म्हणाली, "मी संदीपला ओळखत नाही. तो कधीही घरी आला नाही किंवा त्याने कधी फोनही केला नाही. जर तो सुशांतचा खरंच चांगला मित्र होता तर गेली दीड वर्षे तो कोठे होता?"

  • मुंबई पोलिसांना इशारा करताना दिसला होता संदीप

14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वांद्रेच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलेल्यांपैकी संदीप हा पहिला होता. संदीपचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सुशांतचा मृतदेह बघून मुंबई पोलिसांना थम्स अप दाखवताना दिसला होता. याशिवाय नॅशनल टेलिव्हिजनवर संदीप वारंवार आपले वक्तव्य बदलत आहे. त्यामुळे त्याची भूमिका अधिकच संशयास्पद बनली आहे.

काही दिवसांपूर्वी रिपब्लिक टीव्हीने दावा केला होता की, सुशांतचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर रुग्णालयात नेला जात असताना संदीपदेखील रुग्णवाहिकेमध्ये हजर होता. याशिवाय 14 ते 16 जून दरम्यान त्याचे रुग्णवाहिका चालकाशी चार वेळा बोलणे झाल्याचेही कॉल डिटेलवरुन समोर आले आहे. संदीप सिंहच्या मॅनेजरच्या म्हणण्यानुसार संदीप सुशांतच्या बहिणीला आणि कुटुंबाला मदत करत होता. अशा परिस्थितीत, रुग्णवाहिका चालकास कॉल करणे सामान्य आहे.

  • मॅनेजरचा दावा- ड्रायव्हरने पैशांसाठी संदीप सिंहला फोन केला होता

संदीप सिंहचा मॅनेजर दीपक साहूने ट्विटरवर याविषयी स्पष्टीकरण देताना लिहिले की, "संदीप सुशांतची बहीण मितू आणि कुटुंबीयांना औपचारिकरित्या मदत करत आहे. रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरला कॉल करणे हे काही रॉकेट सायन्स नाही. ड्रायव्हरला संदीपचा नंबर पोलिसांनी दिला होता. 14 जून रोजी त्याचा फोन माझ्याजवळच होता. संध्याकाळी ड्रायव्हरने पेमेंटसाठी कॉल केला होता. 16 जून रोजी ड्रायव्हरने पुन्हा पेमेंटसाठी फोन केला, 22 जून रोजी त्याचे पेमेंट करण्यात आले.'

  • पण पैसे तर सॅम्युअल मिरांडाने दिले

संदीप सिंहच्या मॅनेजरने सांगितल्यानुसार, ड्रायव्हला पैसे संदीपने दिले. मात्र रुग्णवाहिकेचा मालक विशाल याने मात्र पेमेंटविषयी वेगळेच काही सांगितले आहे. एका न्यूज वेबसाइटच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये विशालने सांगितले की, रुग्णवाहिकेचे भाडे 8100 रुपये झाले होते, पण त्याला हे पैसे संदीप सिंह नव्हे तर सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडाने दिले होते.