आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुशांत आत्महत्या प्रकरण:कॉल डिटेलवरून खुलासा - संदीप सिंह आणि रुग्णवाहिकेचा चालक यांच्यात चार वेळा झाली होती चर्चा, सुब्रमण्यम स्वामींनी विचारले- संदीप किती वेळा आणि का दुबईला गेला होता?

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी दोघांमध्ये चार वेळा चर्चा झाली.
  • चालक अक्षयने संदीप सिंहला ओळखण्यास नकार दिला

मंगळवारी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आला. त्यानुसार सुशांतच्या निधनानंतर त्याचा तथाकथित मित्र संदीप सिंह आणि त्याचा मृतदेह घेऊन जाणा-या अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हर यांच्यात चार वेळा बातचीत झाली होती. मात्र, ड्रायव्हरला याबाबत विचारणा केली असता त्याने असे कोणतेही संभाषण झाले नसल्याचे म्हटले आहे.

न्यूज चॅनेल रिपब्लिक इंडियाने संदीप सिंहच्या मोबाइल कॉल डिटेल रिपोर्टच्या आधारे हा नवीन खुलासा केला आहे. त्यानुसार, सुशांतचा मृत्यूचा दिवस म्हणजे 14 जून ते 16 जून दरम्यान, संदीप सिंह आणि अॅम्ब्युलन्स चालक अक्षय बंडगर यांच्यात चार वेळा चर्चा झाली होती.

  • तीन वेळा ड्रायव्हरने फोन केला होता

सीडीआरच्या अहवालानुसार अक्षयने संदीपला तीन वेळा कॉल केला, तर संदीपने अक्षयला एकदा फोन केला. यातील तीन फोन 14 जून रोजीचे म्हणजे सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी झाले, तर एक फोन 16 जून रोजीचा आहे. .

  • ड्रायव्हर म्हणाला - मी कोणत्याही संदीप सिंहला ओळखत नाही

कॉलची माहिती समोर आल्यानंतर रिपब्लिक टीव्ही वाहिनीने अॅम्बुलन्सच्या ड्रायव्हरची बाजू जाणून घेण्यासाठी त्याला फओन केला, तेव्हा त्याने संदीप सिंहसोबत बातचीत झाल्याचे नाकारले. इतकेच नाही तर संदीप सिंह नावाच्या कोणत्याही व्यक्तीला ओळखत नसल्याचेही तो म्ङणाला. त्याने सांगितल्यानुसार, 14 जून रोजी पोलिसांनी त्याला फोन करुन बोलावले होते.

  • संदीप आणि अक्षय यांच्यातील संभाषण

पहिला कॉल - 14 जून संध्याकाळी 6.40 वाजता (अक्षय to संदीप) 48 सेकंद

दुसरा कॉल - 14 जून संध्याकाळी 7.57 वाजता (अक्षय to संदीप) 51 सेकंद

तिसरा कॉल - 14 जून रात्री 9.59 वाजता (संदीप to अक्षय) 104 सेकंद

चौथा कॉल - 16 जून (अक्षय to संदीप) (24 सेकंद)

  • सुब्रमण्यम स्वामी म्हणाले- संदीपची चौकशी झाली पाहिजे

मंगळवारी दुपारी भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, 'संशयित संदीप सिंहची चौकशी झाली पाहिजे. तो दुबईला किती वेळा आणि का गेला होता? हे समोर यायला पाहिजे'

  • संशयास्पद आहे संदीपची भूमिका

सुशांत प्रकरणात सीबीआय सुशांतचा मित्र असल्याचा दावा करणा-या संदीप सिंहचीही चौकशी करण्याची तयारी करत आहे. या प्रकरणात संदीपची भूमिका अत्यंत संशयास्पद मानली जाते. 14 जून रोजी सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या वांद्रेच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचलेल्यांपैकी संदीप हा पहिला होता. संदीपचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो सुशांतचा मृतदेह बघून मुंबई पोलिसांना थम्स अप दाखवताना दिसतोय. याशिवाय नॅशनल टेलिव्हिजनवर संदीप वारंवार आपले वक्तव्य बदलत आहे. त्यामुळे त्याची भूमिका अधिकच संदिग्ध बनली आहे.

सुशांतची बहीण मितू सिंहसोबत संदीप सिंह
सुशांतची बहीण मितू सिंहसोबत संदीप सिंह
  • संदीपला ओळखत नाही सुशांतचे कुटुंबीय

सुशांतचे कौटुंबिक वकील विकास सिंह यांनीही म्हटले आहे की, "संदीपला कुटूंबातील कोणताही सदस्य ओळखत नाही." जेव्हा सुशांतच्या मृत्यूची बातमी समोर आली तेव्हा संदीप तिथे पोहोचला. सुशांतचा मृतदेह पाहून त्याची बहीण मितू अतिशय खचून गेली होती, तेव्हा संदीप तिला सावरण्यासाठी पुढे आला होता. इतकेच नाही तर त्याला प्रत्येक गोष्टीत पुढे येण्याची संधी मिळाली. संदीपने या संधीचा फायदा घेतला. संदीप पोस्टमॉर्टमपासून ते अंत्यसंस्कारापर्यंत सर्व गोष्टींमध्ये सामील होता.

अनेक माध्यमांच्या मुलाखतीत त्याने सुशांतला आपला भाऊ म्हटले. सुशांतच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी तो पाटण्यातही गेला होता आणि प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला. सोशल मीडियावरील सुशांतचे चाहतेही सतत संदीपबद्दल संताप व्यक्त करत आहेत, यामुळे संदीपने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरील कमेंट सेक्शन बंद केले आहे.

  • एकेकाळी संदीप सुशांत-अंकिताचा कॉमन फ्रेंड होता संदीप

काही माध्यमांच्या मुलाखतींमध्ये 38 वर्षीय संदीपने असे सांगितले आहे की, ऑक्टोबर, 2019 पासून तो सुशांतच्या संपर्कात नव्हता, परंतु तो त्याच्या जवळच्या व्यक्तींपैकी होता. तो सुशांत आणि त्याची पुर्वाश्रमीची गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे यांचा कॉमन फ्रेंड आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर संदीपने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले ज्यामध्ये तो सुशांत आणि अंकितासोबत दिसला. सुशांत-अंकिता 2016 पर्यंत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यावेळी हा फोटो घेण्यात आला होता.