आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण:9 महिन्यांपासून एनसीबीला चकमा देत होता सिद्धार्थ पिठानी, नवीन सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो शेअर करताच अडकला NCBच्या जाळ्यात

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांत सिंह राजपूत आणि सिद्धार्थ पिठानी. सिद्धार्थने त्याचा साखरपुड्याचा हा फोटो 14 मे रोजी सोशल मीडियावर शेअर केला होता. - Divya Marathi
सुशांत सिंह राजपूत आणि सिद्धार्थ पिठानी. सिद्धार्थने त्याचा साखरपुड्याचा हा फोटो 14 मे रोजी सोशल मीडियावर शेअर केला होता.
  • सिद्धार्थने एप्रिलमध्ये नवीन सोशल मीडिया अकाउंट तयार केले

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या 11 महिन्यांनंतर त्याचा रुममेट सिद्धार्थ पिठानी याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने हैदराबाद येथून अटक केली आहे. जवळपास 9 महिन्यांपासून तो तपास यंत्रणेला चकमा देत होता. मात्र त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या मदतीने एनसीबीची टीम त्याच्यापर्यंत पोहोचली. सुशांतच्या निधनानंतर सिद्धार्थने आपले जुने सोशल मीडिया अकाउंट डिलीट केले होते. 14 जून 2020 रोजी सुशांत त्याच्या मुंबईतील राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. सिद्धार्थ त्या निवडक व्यक्तींपैकी एक होता. जे त्याच्या निधनाच्या वेळी त्याच्या घरी उपस्थित होते. त्यानंतर सिद्धार्थ गायब झाला होता.

सिद्धार्थने एप्रिलमध्ये नवीन सोशल मीडिया अकाउंट तयार केले
एका इंग्रजी न्यूज वेबसाइटच्या वृत्तानुसार, एनसीबी ऑगस्ट 2020 पासून पिठानीच्या मागावर होते. तेव्हापासून तो एनसीबीपासून स्वतःचा बचाव करत होता. यावर्षी एप्रिलमध्ये त्याने आपले नवीन सोशल मीडिया अकाउंट तयार केले आणि जीममधील आपला एक फोटो शेअर केला. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "पिझ्झा पॉवर. फूड अँड फिटनेस." त्याशिवाय त्याने त्याच्या साखरपुड्याचा फोटोही सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला होता. त्यानंतर एनसीबीने त्या जीमचा शोध घेतला ज्या जीमला सिद्धार्थने आपल्या पोस्टमध्ये टॅग केले होते.

एनसीबी जनरल डिरेक्टर समीर वानखेडे म्हणाले, 'मागच्या बऱ्याच काळापासून सिद्धार्थ पिठानी एनसीबीने पाठवलेल्या कोणत्याही नोटीसचे उत्तर देत नव्हता. त्यामुळे आम्ही सोशल मीडियावरून त्याचा पत्ता शोधण्याचा प्रयत्न करत होतो.'

1 जून पर्यंत एनसीबी कस्टडीत आहे सिद्धार्थ पिठानी
मागील आठवड्यात सिद्धार्थ पिठानीला हैदराबादहून अटक करण्यात आली. गेल्या शुक्रवारी पहाटे त्याला मुंबईत आणण्यात आले आणि नंतर न्यायालयात हजर केले. येथून त्याला 1 जूनपर्यंत एनसीबी कस्टडीमध्ये पाठविण्यात आले. एनसीबीने कोर्टाला सांगितले की, सिद्धार्थ ड्रग सिंडिकेटशी संबंधित असल्याचे त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक पुरावे आहेत. या पुराव्यांच्या आधारे चौकशीसाठी एनसीबीने त्याची कस्टडी कोर्टाकडे मागितली होती. सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर सुशांतच्या कुटुंबीयाचे वकील विकास सिंह यांनी समाधान व्यक्त केले होते.

एनसीबीने सुशांतच्या नोकराला आणि कुकला समन्स बजावले

सिद्धार्थ पिठानीच्या अटकेनंतर एनसीबीने सुशांतच्या घरात काम करणारा केशव आणि कुक नीरजला समन्स बजावले आहे. ड्रग्ज प्रकरण आणि सुशांतच्या मृत्यूच्या संदर्भात एनसीबी या दोघांची पुन्हा चौकशी करेल. दोघेही मागील आठ महिन्यांपासून एनसीबीपासून पळ काढत असून मुंबई बाहेर होते.

बातम्या आणखी आहेत...