आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Death Case: Spiritual Healer Reveals That Rhea Chakraborty Approached Him And Told That Late Actor Was Suffering From Depression

सुशांत प्रकरणात रियाचे आणखी एक रहस्य उघड:अध्यात्मिक गुरूंचा खुलासा - गूगलवर सर्च करुन रिया चक्रवर्तीने मला सुशांतवर उपचार करण्यासाठी बोलावले होते, सुशांतसोबत जास्त बोलणे झाले नव्हते

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
सुशांतसिंग राजपूतवर उपचार करणारे अध्यात्मिक गुरु मोहन सदाशिव जोशी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांच्यासमवेत त्यांच्या घरी एकत्र जेवण केले होते. - Divya Marathi
सुशांतसिंग राजपूतवर उपचार करणारे अध्यात्मिक गुरु मोहन सदाशिव जोशी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सुशांत आणि रिया चक्रवर्ती यांच्यासमवेत त्यांच्या घरी एकत्र जेवण केले होते.
  • अध्यात्मिक गुरु मोहन सदाशिव जोशी यांनी सांगितल्यानुसार, ते कधीही स्वतःची जाहिरात करत नाहीत आणि उपचारांसाठी पैसेही घेत नाहीत.
  • जोशी यांच्या म्हणण्यानुसार, वांद्रे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते, परंतु वयाचे कारण देत ते गेले नाहीत.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. असाच एक खुलासा नुकताच झाला आहे. यानुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ठाण्यातील एका अध्यात्मिक गुरूंनी सुशांतची उदासीनता दूर केली होती. रिया चक्रवर्तीने स्वतः या अध्यात्मिक गुरूशी संपर्क केल्याचेही उघड झाले आहे.

टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, या अध्यात्मिक गुरूंचे नाव मोहन सदाशिव जोशी आहे आणि त्यांनी दावा केला आहे की, ते मागील वर्षी 22 आणि 23 नोव्हेंबर 2019 रोजी सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती यांना भेटले होते. 22 नोव्हेंबरला सुशांतवर त्यांनी उपचार केले होते त्यानंतर तो ठीक असल्याचेही जोशी यांनी सांगितले होते. यानंतर 23 नोव्हेंबरला त्यांनी सुशांत आणि रियासोबत जेवण केल्याचाही दावा केला आहे. जोशी म्हणाले की, रियानेच त्यांच्याशी संपर्क करत सुशांत नैराश्यात असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे यावेळी सुशांतशी त्यांचे जास्त बोलणे झाले नव्हते, असेही जोशी यांनी सांगितले.

  • रियाने गूगलवर सर्च करुन नंबर शोधला होता

जोशी यांना रियाने बोलावले होते की त्यांच्याशी इतर कुणी संपर्क केला होता? असे जेव्हा त्यांना विचारले गेले, त्यावर उत्तर देताना त्यांना सांगितले, "रियाने मला बोलावले होते. मी स्वतःची जाहिरात करत नाही. नैराश्याने पीडित लोक मला गुगलवर शोधतात आणि नंतर माझ्याशी संपर्क साधतात. रियाने मला फोन करुन सांगितले होते की सुशांत डिप्रेशनमध्ये आहे."

  • मोहन जोशी कसे उपचार करतात

जोशी यांच्या म्हणण्यानुसार, ते पीडित व्यक्तीमध्ये आपल्या हातांनी ऊर्जा हस्तांतरित करतात. ते म्हणाले, "माझे हात गरम असतात. ही ऊर्जा मानवी शरीरात जाते. ही ऊर्जा त्यांना बरे करते. मी स्वतः काही करत नाही." जोशी यांनी पुढे स्पष्ट केले की, या कामासाठी ते कोणतेही शुल्क आकारत नाहीत. पण एखाद्याला स्वतःहून काही द्यायचे असेल तर ते स्वीकारतात. यासाठी ते कोणत्याही प्रकारची पूजादेखील करीत नाहीत, त्यांच्यानुसार ते नास्तिक आहेत. सुशांत सिंह राजपूतवरही 90 टक्के उपचार केल्याचे जोशी यांनी सांगितले.

  • वांद्रे पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते

जोशी यांच्या म्हणण्यानुसार वांद्रे पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावले होते. पण ते जाऊ शकले नाहीत. ते म्हणाले, "मी त्याला सांगितले की मी 70 वर्षांचा आहे आणि माझी एंजियोग्राफी झाली आहे. मी एवढ्या लांब येऊ शकत नाही. मी जे काही केले ते रेकॉर्ड आहे. मी ते तुला पाठवू शकतो", असे त्यांनी सांगितले. टाइम्स नाऊच्या मुलाखतीत जोशी यांना सुशांतवर काळ्या जादूने उपचार केले का? असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, याला काळी जादू म्हणता येणार नाही पण सफेद जादू म्हणू शकता. 70 वर्षांचे आध्यात्मिक गुरू जोशी यांनी दावा केला आहे की, प्रसिद्ध उद्योजक धीरूभाई अंबानी आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री यांच्यावरही त्यांनी उपचार केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...