आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांत मृत्यू प्रकरण:सुशांतने ज्या नाइट गाऊनने गळफास घेतला त्याचा टेन्सिल स्ट्रेंथ रिपोर्ट आला समोर, कापडामध्ये 200 किलो वजन उचलण्याची क्षमता, तर सुशांतचे वजन होते 80 किलो

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5 जुलै रोजी मुंबई पोलिसांनी हा नाइट गाऊन टेन्सिल टेस्टसाठी पाठवला होता.
  • 27 जुलै रोजी पोलिसांना फॉरेन्सिक सायन्स लॅबकडून रिपोर्ट मिळाला.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने कथितरित्या ज्या हिरव्या रंगाच्या नाइट गाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली होती, तो मुंबई पोलिसांनी टेन्सिल स्ट्रेंथ टेस्टसाठी पाठवला होता. आता त्याचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यावरुन असे समोर आले आहे की, त्या कापडात 200 किलोपर्यंतचे वजन उचलण्याची क्षमता आहे. एवढेच नव्हे तर या रिपोर्ट नुसार, सुशांतच्या गळ्यावर मिळालेले कपड्याचे तंतू आणि त्या कपड्याचे तंतू समान आहेत.

  • ग्रीन नाइट गाऊन घेतला गळफास

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतच्या घरातून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. सुशांतने 14 जून रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने फास तयार करण्यासाठी कॉटनच्या नाइट गाऊनचा वापर केला होता. सुशांतच्या मृत्यूनंतर पोलिसांच्या चौकशीत घटनास्थळावरील जे व्हायरल व्हिडिओ समोर आले होते, त्यात तो हिरव्या रंगाचा नाइट गाऊन दिला होता.

  • 27 जुलै रोजी पोलिसांना मिळाला रिपोर्ट

वृत्तानुसार, पोलिसांनी हा नाइट गाऊन 5 जुलै रोजी केमिकल आणि फॉरेन्सिक तपासाठी कलिनाच्या फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी येथे रात्री पाठवला होता. पोलिसांनी सांगितल्यानुसार, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांनी सुशांतच्या गळ्यावरील खुणांची तपासणीही केली होती. टेन्सिल टेस्टचा रिपोर्ट 27 जुलै रोजी मुंबई पोलिसांना मिळाला होता.