आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी:आज सीबीआय सुशांतच्या वडिलांचे आणि दोन बहिणींचे फरीदाबादमध्ये जबाब नोंदवणार, त्यानंतर चौकशीसाठी टीम मुंबईत येणार

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणाचा मुंबई तपास करून पाटण्याला परतलेल्या एसआयटीने 40 पानांचा अहवाल सीबीआयला सोपवला आहे.
  • याप्रकरणाची सीबीआय चौकशी होऊ नये, अशी मागणी करणारी याचिका रियाच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली अूसन त्यावर सुनावणी 11 ऑगस्ट रोजी आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय आपली चौकशी सुरू करणार आहे. सोमवारी सीबीआय सुशांतचे वडील के के सिंह, त्याच्या दोन बहिणी मितू सिंह आणि प्रियांका सिंह यांचे जबाब हरियाणाच्या फरीदाबादमध्ये नोंदवण्याची शक्यता आहे. पाटणा येथे राहणारे सुशांतचे वडील सध्या आपल्या बहिणीच्या घरी फरीदाबाद येथे आहेत. सुशांतचे मेहुणा ओपी सिंह हरियाणा केडरमधील वरिष्ठ आयपीएस आहेत.

असा दावा केला जात आहे की, सुशांतच्या वडिलांची त्यांनी दाखल केलेल्या एफआयआर आणि सुशांतसोबतच्या नात्यावर चौकशी केली जाऊ शकते. त्याचबरोबर सीबीआय रियासंदर्भात बहिणींची चौकशी करू शकते. 26 जुलै रोजी वडिलांनी पाटण्या सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध फसवणूक, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. बिहार सरकारच्या शिफारशीवरुन सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

  • सीबीआयची टीम मुंबईत येईल

फरीदाबादमध्ये जबाब घेतल्यानंतर सीबीआयचे पथक मुंबई पोलिसांकडून त्यांचा तपासाचा अहवाल आणि यासंदर्भात तपास अधिका-यांचे जबाब घेऊ शकतात. या प्रकरणात सुशांतचे कुटुंब व बिहार पोलिस सुरुवातीपासूनच मुंबई पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभे करत आहेत. तत्पूर्वी, एसआयटी मुंबईतील तपास करून पाटण्यात परतले आणि 40 पानांचा अहवाल सीबीआयकडे सादर केला. यामध्ये सुशांत प्रकरणाशी संबंधित 10 हून अधिक लोकांच्या जबाबांचा समावेश आहे.

  • पोस्टमार्टम करणा-या डॉक्टरांचीही चौकशी केली जाईल

सीबीआय सुशांतचा पोस्टमार्टम अहवाल काही मोठ्या रुग्णालयांमधील डॉक्टरांना दाखवून त्यांचे मत घेणार आहेत. सुशांतच्या औषधांची लिस्ट दाखवून तो कोणत्या प्रकारच्या मानसिक दबावाखाली होता हेदेखील सीबीआय जाणून घेणार आहे. जेव्हा सुशांत मानसोपचार तज्ज्ञांना भेटला, तेव्हा तो कोणत्या त्रासात होतात, हेदेखील सीबीआय जाणून घेणार आहे.

  • दिशा सॅलियन प्रकरणावरही सीबीआयचे लक्ष आहे

सूत्रांच्या माहितीनुसार, सुशांत सिंह राजपूत, रिया चक्रवर्ती, दिशा सॅलियन आणि या प्रकरणातील संबंधित सर्व लोकांचा मोबाईल तपशील बाहेर काढून सुशांत आणि दिशा सॅलियन यांच्या मृत्यूच्या आधी आणि नंतर असे कोणते कॉमन लोक होते, जे एकमेकांच्या संपर्कात आले, याचा तपास सीबीआय करणार आहे. त्या सर्व लोकांची यादी तयार केली जाईल व समन्स पाठवले जातील व येत्या काही दिवसांत त्यांना चौकशीसाठी बोलावले जाईल.

  • इलेक्ट्रॉनिक्स पुरावाही सीबीआय तपासेल

सूत्रांच्या माहितीनुसार सुशांतची हत्या झाली आहे की त्याने आत्महत्या केली? त्याला आत्महत्या करण्यापूर्वी कुणी त्रास दिला होता का? हे शोधण्यासाठी सीबीआय इलेक्ट्रॉनिक्स पुराव्याचा आधार घेणार आहे. घटनास्थळाची छायाचित्रे, अपार्टमेंटचे सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजदेखील महत्त्वाचे ठरणार आहेत. सीबीआयच्या तपासणीत पोस्ट मॉर्टम रिपोर्ट आणि एफएसएल अहवाल, सीडीआर देखील प्रभावी ठरतील.

  • 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सीबीआय चौकशी रोखण्याची मागणी करणारी याचिका रिया चक्रवर्तीच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या प्रकरणात 11 ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वांचे लक्ष सर्वोच्च न्यायालयाकडे आहे. या प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी फार महत्वाची ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...