आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत मृत्यू प्रकरणात नवीन खुलासा:सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी राधिका नावाच्या महिलेशी तासभर बोलली होती रिया,  एका अज्ञात व्यक्तीशीही साधला होता संवाद

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे 14 जून रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या दरम्यान निधन झाले, असे सांगितले जाते.
  • राधिका आणि रिया चक्रवर्ती यांच्यात सकाळी 7 वाजून 38 मिनिटांपासून ते 8 वाजून 38 मिनिटांपर्यंत फोनवर बोलणे झाले होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ज्या दिवशी निधन झाले, त्या दिवसाशी संबंधित एक मोठा खुलासा झाला आहे. सुशांतच्या मृत्यूपूर्वी अभिनेत्री रिया चक्रवर्तीचे राधिका नावाच्या महिलेशी तब्बल एक तासापेक्षा जास्त वेळ बोलणे झाले होते. 14 जून रोजी राधिका रियाला एकदा कॉल केला तर रियाने तिला दोन वेळा कॉल केला होता. दैनिक भास्करला रियाचे 14 जून रोजीचे संपूर्ण कॉल डिटेल मिळाले आहे. यानुसार रियाचे या दिवशी एका अज्ञात व्यक्तीशीही बोलले झाले होते.

14 जून रोजी राधिका मेहतासोबत रियाचे किती वाजता झाली होती बातचीत?

सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सकाळी 7 वाजून 38 मिनिटांना राधिका मेहता नावाच्या महिलेने रियाला फोन केला होता. यादरम्यान या दोघांमध्ये 30 मिनिटे 55 सेकंदाची चर्चा झाली. यानंतर रियाने पुन्हा 8 वाजून 8 सेकंदांना राधिका मेहताला फोन केला आणि यावेळी दोघांमध्ये 30 मिनिटांची दीर्घ चर्चा झाली. रियाने पुन्हा राधिकाला सकाळी 8.38 वाजता फोन केला आणि यावेळी दोघींमध्ये 5 मिनिटे 41 सेकंदांची चर्चा झाली. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी, रियाचे राधिका मेहता नावाच्या महिलेशी 1 तास 36 सेकंद बोलणे झाले होते.

  • एका वर्षात राधिका आणि रिया यांच्यात 280 वेळा झाली बातचीत

दैनिक भास्करच्या चौकशीत असेही स्पष्ट झाले आहे की, 14 जून रोजीच नव्हे तर यापूर्वीही अनेकदा रियाचे राधिका मेहतासोबत बोलणे झाले होते. 1 ऑगस्ट 2019 ते 14 जून 2020 पर्यंत रिया आणि राधिका यांच्यात 280 पेक्षा जास्त वेळा फोनवर संभाषण झाले होते.

बघा 14 जून रोजीचा रियाचा संपूर्ण कॉल तपशील (अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा नंबर 96 पासून सुरू होत आहे. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रियाला 7 कॉल्स आणि 25 मेसेजेस आले. तर रियाने 9 कॉल केले.)

सीरियल नंबरया नंबरवरुन कॉल केले गेलेया नंबरवर कॉल/मेसेज आलेतारीखवेळकालावधी(सेकंद)कॉलचा प्रकार
1323496XXXXXXXX(रिया)राधिका मेहता14-06-20207:38:011855OUT
13235BG-SMSALTरिया चक्रवर्ती14-06-20208:06:211SMS_INC
13236रिया चक्रवर्तीराधिका मेहता14-06-20208:08:561800OUT
13237रिया चक्रवर्तीराधिका मेहता14-06-20208:38:56341OUT
13242मिलनरिया चक्रवर्ती14-06-202010:14:2410INC
13243मिलनरिया चक्रवर्ती14-06-202010:14:5385INC
13250शतभिषा चौधरीरिया चक्रवर्ती14-06-202012:45:211SMS_INC
13254फहीम रूहानीरिया चक्रवर्ती14-06-202013:16:301SMS_INC
13256रिया चक्रवर्तीफहीम रूहानी14-06-202013:46:0864OUT
13258निधि पीरिया चक्रवर्ती14-06-202014:21:3336INC
13259मेघना सीरिया चक्रवर्ती14-06-202014:28:308INC
13260रिया चक्रवर्तीरूपा सी14-06-202014:29:258OUT
13261रूमी जाफरीरिया चक्रवर्ती14-06-202014:30:0217INC
1326298xxxxxxxxxxरिया चक्रवर्ती14-06-202014:30:4518INC
13263रिया चक्रवर्ती96xxxxxxxx14-06-202014:31:2010OUT
13264रिया चक्रवर्ती96xxxxxxxx14-06-202014:31:4316OUT
13265रिया चक्रवर्ती90xxxxxxxx14-06-202014:34:2539OUT
13266रिया चक्रवर्ती96xxxxxxxx14-06-202014:43:5156OUT
1326796XXXXXXXरिया चक्रवर्ती14-06-202014:57:01144INC
1326998XXXXXXXXरिया चक्रवर्ती14-06-202016:04:381SMS_INC
1327175XXXXXXXXरिया चक्रवर्ती14-06-202016:23:301SMS_INC
1327498XXXXXXXरिया चक्रवर्ती14-06-202019:37:261SMS_INC

कॉल डिटेलच्या चौकशीत, सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी रिया चक्रवर्तीचे राधिका मेहताशी तीन वेळा, मिलनसोबत दोनदा, शताभिषा चौधरीसोबत एकदा, फहीम रुहानीसोबत दोनदा आणि रूमी जाफरी यांच्याशी एकदा बोलणे झाले होते. याशिवाय बर्‍याच लोकांनी रियाला मेसेजही पाठवले आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी रियाला कॉल करणा-या जवळपास सर्वच लोकांची चौकशी केली आहे.

  • रियाने सुशांतला 3 सेकंदांचा कॉल केला होता

कॉल तपशीलात असे दिसून आले की, रिया आणि सुशांत यांचे फोनवर अखेर बोलणे 5 जून रोजी झाले होते. रियाच्या म्हणण्यानुसार, तेव्हा तिने सुशांतचे घर सोडले नव्हते. 5 जून रोजी सुशांतने सकाळी 8 वाजून 19 मिनिटांना रियाला फोन केला होता. दोघांमध्ये सुमारे 2 मिनिटांची चर्चा झाली. त्यानंतर रियाने 10 च्या सुमारास सुशांतला फोन केला होता. हा कॉल फक्त 3 सेकंदांचा होता. हे त्यांचे फोनवरचे शेवटचे संभाषण होते.

बातम्या आणखी आहेत...