आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन:दीपिका, श्रद्धा, सारा आणि रकुल सोबत पुढे काय होईल? कोणत्या ड्रग्जवर किती शिक्षेची तरतूद आहे आणि व्हॉट्सअ‍ॅप चॅट शिक्षेचा आधार बनणार का?, जाणून घ्या या सर्व प्रश्नांची उत्तरे

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ड्रग्जचे उत्पादन किंवा व्यवसाय करण्याच्या प्रकरणातील आरोपींना जामीन मिळत नाही.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणी ड्रग्स अँगलचा तपास करणार्‍या नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (एनसीबी) आता दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांना स्वतंत्र समन पाठवले आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी चौकशीतून ही नावे उघड केली आहेत. काही व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सही समोर आल्या आहेत. त्या आधारे या अभिनेत्रींनी ड्रग्ज ऑर्डर केले होते, असा दावा केला जातोय. आता प्रश्न उपस्थित होत आहे की व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे किंवा एखाद्याच्या दाव्याच्या आधारे अभिनेत्रींना शिक्षा होऊ शकते का? या 6 प्रश्नांमधून समजून घेऊयात संपूर्ण प्रकरण...

1. हे प्रकरण कुठून सुरू झाले?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात एनसीबीने त्याची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक केली होती. तसेच रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्याशी संबंधित काही ड्रग पेडलरनाही अटक केली होती. रिया चक्रवर्तीवर नार्कोटिक ड्रग्स अँड सायकोट्रोपिक सबस्टन्स (एनडीपीएस) अधिनियम 1985 च्या कलम 8 (c), 20 (b) (ii), 22, 27 A, 28, 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंतच्या तपासात असे दिसून आले आहे की दीपिकासह बॉलिवूडमधील अनेक सेलेब्सही ड्रग्ज घेत आहेत. या कारणास्तव, आता हे सर्व सेलेब्स एनसीबीच्या चौकशीत अडकले आहेत.

2. या अभिनेत्रींना समन्स का पाठवले गेले?

या प्रकरणात एनसीबीने चौकशी केलेल्या ड्रग पेडलर्स आणि सेलिब्रिटींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे अभिनेत्रींची नावे समोर आली आहेत. या कारणास्तव परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी चौकशीचे समन्स पाठविण्यात आले आहे. टॅलेंट मॅनेजर जया साहावर ड्रग सिंडिकेट चालवल्याचा आरोप आहे. असे म्हटले जाते की, तिनेच दीपिका आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश यांच्या चॅटचे स्क्रीनशॉट एनसीबीला दिले आहे. यानंतर दीपिकाला समन्स बजावण्यात आले आहे. त्यात दीपिका करिश्मासोबत व्हॉट्सअ‍ॅप चॅटमध्ये हॅश या ड्रगबद्दल बोलताना दिसत आहे. ड्रग्जच्या भाषेत, हॅश म्हणजे चरस. दीपिकाला अटक केली जाऊ शकते का, या प्रश्नावर एनसीबीचे उपसंचालक (ऑपरेशन) कमल मल्होत्रा यांनी काही बोलण्यास नकार दिला.

3. व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे एखाद्याला शिक्षा होऊ शकते का?

अनेक चर्चित प्रकरणांमध्ये विशेष सरकारी वकील असलेले उज्ज्वल निकम म्हणतात की, एनसीबीने ड्रग्ज पेडलर्स आणि इतर अटक केलेल्या लोकांच्या चौकशीच्या आधारे पुरावे गोळा केले आहेत. या प्रकरणातील मुख्य पुरावा म्हणजे त्यांचे खुलासे. ज्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटविषयी चर्चा केली जात आहे ते अभिनेत्रीच्या मालकीच्या फोनवरुन झाले आहेत. हे कोरोबोरेटिव्ह एव्हिडन्स (सहसंबंधात्मक पुरावा) म्हणून घेतले जाऊ शकते. यानंतर, अभिनेत्रींना हे सिद्ध करावे लागेल की त्यांनी कधीही ड्रग्ज घेतलेले नाहीत. पुरावा म्हणून व्हॉट्सअ‍ॅप चॅट स्वीकारले जाणार नाही असे म्हणणे चुकीचे आहे.

4. आता या प्रकरणात पुढील कारवाई काय असू शकेल?

वरिष्ठ वकील उज्ज्वल निकम म्हणतात की, एनसीबी ही एक राष्ट्रीय पातळीवरील एजन्सी आहे. जिच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ड्रग रॅकेटचा पर्दाफाश करण्याची जबाबदारी आहे. अशा परिस्थितीत, सध्या जो काही तपास चालू आहे त्यानुसार त्यांचे लक्ष्य बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतच त्यांना ड्रग सप्लाय करणा-यांचे जाळे कुठवर पसरले आहे, याचा शोध घेणे हेदेखील आहे. या प्रकरणात खळबळ वाढवण्यापेक्षा आपल्या मुख्य कामावर एनसीबीने लक्ष केंद्रित केले पाहिजे. रियावर ड्रग्ज सिंडिकेटचा भाग असल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत दीपिका आणि अन्य अभिनेत्रींवर अशाच प्रकारचे आरोप लागले तर त्यांच्या अडचणीत वाढ होऊ शकते.

5 अभिनेत्रींनी ड्रग्ज घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्यांना शिक्षा होईल का?

निकम यांच्या म्हणण्यानुसार, जर या सर्व अभिनेत्री ड्रग्ज सिंडिकेटचा भाग आहेत हे तपासात सिद्ध झाले तर त्यांना शिक्षा नक्कीच मिळेल. ड्रग्ज प्रमाणानुसार त्यांच्या शिक्षेचा निर्णय घेतला जाईल. तथापि, जर त्या केवळ ड्रग्ज घेतल्याबद्दल दोषी ठरल्या आणि त्यांनी न्यायालयात याची कबुली दिली, तर न्यायालय त्यांना माफीनाम्यावर सोडू शकते. आणि सोबतच भविष्यात कधीही ड्रग्जला स्पर्श कऱणार नाही, असे वचनही त्यांना न्यायालयाला द्यावे लागेल. यापूर्वी 2012 मध्ये फरदीन खाननेही याच आधारावर कोर्टाकडे माफी मागितली आहे.

6. बॉलिवूड सेलिब्रिटींना माफी मिळू शकते का?

त्यांच्यावर कोणते आरोप आहेत, यावर हे अवलंबून असेल. निकम यांच्या म्हणण्यानुसार, 1999 मध्ये बॉम्बस्फोटाचा खटला चालू असताना एका अभिनेत्याच्या वकिलाने त्याच्या क्लायंटची वागणूक चांगली झाली आहे हे सांगून शस्त्रे अवैधरीत्या बाळगल्याबद्दल माफी मागितली होती. त्यावेळी निकम यांचा याला विरोधात होते. जर असे झाले तर न्यायालय मोठ्या लोकांना शिक्षा देत नाही, असा संदेश जगासमोर जाईल, असा युक्तिवाद निकम यांनी या प्रकरणात केला होता. ड्रग्जच्या बाबतीतही हा संदेश जाणे गरजेचे आहे की, कोर्टासमोर सर्व लोक समान आहेत. त्यांचे स्टेटस बघून वागणूक दिली जात नाही. सोबतच भारतातील मोठी लोकसंख्या या सेलिब्रिटींच्या फॅशनपासून प्रत्येक गोष्टीचा अवलंब करते. त्यामुळे त्यांच्या वाईट सवयी देखील लोकांसाठी प्रेरणा बनू शकतात. यामुळे, जर कोणी दोषी असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे मत निकम यांनी व्यक्त केले आहे.

कोणत्या ड्रग्जच्या किती प्रमाणावर किती शिक्षेची तरतूद आहे?

  • गांजा : 1 किलोपेक्षा कमी जप्त झाल्यास प्रमाण कमी. 1 किलो ते 20 किलोदरम्यान मध्यम प्रमाण. दोन्ही जामीनपात्र गुन्हे. 20 किलोपेक्षा जास्त व्यावसायिक प्रमाण आहे. तो अजामीनपात्र गुन्हा.
  • चरस, कोकेन, मारिजुआना, हशीश : 100 ग्रॅमपर्यंत कमी प्रमाण. जामीन मिळतो. 100 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत प्रमाण असेल तर तथ्यांच्या आधारावर जामीन. 1 किलोवर असेल तर जामीन नाही.
  • हेरॉइन : 5 ग्रॅमपेक्षा कमी प्रमाण कमी मानले जाते, हा जामीनपात्र गुन्हा आहे. 250 ग्रॅमपेक्षा जास्त व्यावसायिक प्रमाण आहे. त्यात किमान 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे.
बातम्या आणखी आहेत...