आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत डेथ मिस्ट्री:सीबीआयच्या रडारवर सुशांतच्या आयुष्याशी संबंधित हे 10 पात्र, यांची चौकशी करुन सुटू शकतो 'हत्या की आत्महत्या'चा गुंता

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूत वांद्रेच्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला होता.
 • सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह सहा जणांविरूद्ध पाटण्याच्या राजीव नगर पोलिस ठाण्यागुन्हा दाखल केला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला. त्यानंतर तो बिहार पोलिसांकडे गेला आणि तेथून तो अंमलबजावणी संचालनालयाकडे पोहोचला आणि आता सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. देशातील हे पहिलेच प्रकरण आहे जिथे मृत्यूच्या एवढ्या दिवसानंतरही मृतकची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली हे समजू शकलेले नाही. दिव्य मराठी आज तुम्हाला सुशांतच्या मृत्यूशी संबंधित अशा 10 पात्राविषयी सांगणार आहे, ज्यांची चौकशी केल्यावर त्याच्या मृत्यूचे रहस्य समोर येऊ शकते.

 • पात्र क्रमांक 1. केशव बचनेर, सुशांतचा कुक

सुशांतचा कुक केशव बचनेर जवळपास दीड वर्षे त्याच्याबरोबर राहत होता. वृत्तानुसार, केशवला रियाने नियुक्त केले होते. केशव हा शेवटचा माणूस आहे जो सुशांतशी शेवटचे बोलला होता आणि त्याला ज्युस दिला होता. सुशांतच्या मृत्यूच्या आधीची त्याची मनस्थिती केवळ केवळ केशवच समजावून सांगू शकतो. कदाचित याच कारणामुळे सीबीआयने प्रथम त्याला ताब्यात घेतले. शनिवारी सीबीआय केशवची चौकशी करू शकते.

सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी
सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी
 • पात्र क्रमांक 2. सिद्धार्थ पिठानी, रुममेट आणि मित्र

सिद्धार्थ सुशांतसाठी क्रिएटिव्ह कंटेंट मॅनेजर म्हणून काम करत होता. सुशांतने सिद्धार्थला त्यांची कंपनी विविड्रेज रियल्टीएक्समध्ये ग्राफिक्स तयार करण्यासाठी नेमले होते. सुशांत त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांच्यासह ही कंपनी चालवत होता. सिद्धार्थनेच सर्वप्रथम सुशांतचा मृतदेह पंख्याला लटकलेला पाहिला आणि सुशांतची बहीण मीतूला फोन करुन सूचना दिली. सिद्धार्थने पोलिसांना सांगितल्यानुसार, मीतूच्या सांगण्यावरूनच त्याने सुशांतचा मृतदेह खाली काढला होता आणि त्याचा श्वास सुरु आहे की नाही ते पाहिले होते. मुंबई पोलिस आणि ईडीने सिद्धार्थची दोनदा चौकशी केली आहे. सुशांतच्या कुटूंबाने रिया चक्रवर्तीविरूद्ध साक्ष देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप सिद्धार्थने सुशांतच्या कुटुंबीयांवर केला आणि तसा ईमेलदेखील त्याने मुंबई पोलिसांना केला होता.

 • पात्र क्रमांक 3. नीरज सिंह, सुशांतचा दुसरा कुक

सुशांत सिंह राजपूतच्या निधनाबद्दल ब-याच गोष्टी ठाऊक असलेल्यांपैकी नीरज सिंह एक असू शकतो. आठ महिन्यांपासून नीरज सुशांतकडे स्वयंपाकी म्हणून काम करत होता. असे मानले जाते की, नीरज हा सीबीआयच्या टार्गेटवरील दुसरे नाव आहे. नीरजला काही महिन्यांपूर्वी रिया चक्रवर्तीने नियुक्त केले होते. नीरजची बिहार आणि मुंबई पोलिसांनी चौकशी केली आहे. नीरजने मुलाखतीत सांगितले होते की, सुशांतने आत्महत्येच्या दिवशी त्याच्याकडे पाणी मागितले होते आणि तो वरच्या मजल्यावर गेला होता. रिया चक्रवर्ती 8 जून रोजी सुशांतच्या घराबाहेर पडली. नीरजने सांगितले होते की, सुशांतकडे 12 जण कामावर होते, त्यापैकी त्याने काही लोकांना काढून टाकले होते. लॉकडाऊनमध्ये रियाने मलाही जाण्यास सांगितले होते. 14 जून रोजी सर (सुशांत) सहा वाजता उठले. त्यांनी मॉर्निंग वॉक केला. सुशांत सकाळी आठच्या सुमारास परत आले तेव्हा मी साफसफाई करीत होतो. तेव्हा सर अगदी ठीक होते. सरांनी मला थंड पाणी आणायला सांगितले. मी पटकन थंड पाणी आणले. मग त्यांनी मला विचारले की, खाली सर्व काही ठीक आहे ना.. मी हो म्हणून उत्तर दिले. मग ते आपल्या रुममध्ये निघून गेले. त्यानंतर मी रुमचे दाद ठोठावलेपण पण आतून काहीच उत्तर आले नाही. अर्ध्या तासानंतर परत गेलो. शेफ (केशव) सरांना दोन वेळा कॉल केला. बेल वाजत होती, पण उत्तर आले नाही. मग आम्ही त्यांच्या बहिणीला कॉल करुन बोलावले.

दीपेश सावंतला रिया चक्रवर्तीने नोकरीवर ठेवले होते.
दीपेश सावंतला रिया चक्रवर्तीने नोकरीवर ठेवले होते.

पात्र क्रमांक 4. दीपेश सावंत, होम केअर टेकर

सुशांतच्या आयुष्यातील आणखी एक मोठे पात्र म्हणजे दीपेश सावंत. मीडिया रिपोर्टनुसार बिहार पोलिस आणि मुंबई पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर हा माणूस घरातून बेपत्ता आहे. ईडी टीमनेही चौकशीसाठी त्याला समन्स बजावले होते. गेल्या दोन ते चार महिन्यांत सुशांतच्या बँक खात्यातून पैसे कसे काढले गेले आणि बँकेतून पैसे काढण्यात रिया चक्रवर्तीची भूमिका काय होती, याची ईडीला दीपेशकडून माहिती हवी आहे. दीपेशला रियानेच कामावर ठेवले होते. दीपेशच्या भावाने सांगितल्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून तो घरी आला नाही. तर दीपेशच्या शेजार्‍यांचे म्हणणे आहे की, त्यांनी गेल्या काही दिवसांपासून दिपेशला घरी पाहिले नव्हते. दीपेशच्या भावाच्या म्हणण्यानुसार, त्याची मुंबई पोलिसांकडून चौकशी झाली आहे. जे काही सांगायचे होते, ते त्याने पोलिसांना सांगितले आहे.

 • पात्र क्रमांक 5. सुशांतच्या घरी पोहोचलेला चावीवाल

सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या घरी पोहोचणा-या बाहेरच्या माणसांपैकी पहिला होता चावीवाला. गुरुवारी एका वृत्तवाहिनीने त्याला शोधून काढले. त्याने दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याला सिद्धार्थ पिठानीचा फोन आला होता. कॉल आल्यानंतर सुमारे 10 मिनिटांनी तो वांद्रे येथील सुशांतच्या घरी पोहोचला. एका मिनिटापेक्षा कमी वेळात सुशांतच्या खोलीचे कुलूप उघडले आणि सिद्धार्थने खिशातून पैसे काढून त्याला तेथून निघून जाण्यास सांगितले. त्याला खोलीत नेमके काय घडले हे पाहायचे होते पण ते पाहण्याची परवानगी नव्हती. तब्बल एक तासानंतर, त्यालापोलिस स्टेशनचा फोन आला आणि त्याने आपला जबाब पोलिसांना दिला. आता सीबीआय या व्यक्तीची चौकशी करुन कुणी त्याला तेथून जाण्यास सांगितले आणि बाहेर हजर असलेल्या लोकांना खोलीस नेमके काय घडले याचा अंदाज होता का? हे विचारु शकते.

सुशांतच्या घरी आलेला रुग्णवाहिकेचा चालक
सुशांतच्या घरी आलेला रुग्णवाहिकेचा चालक
 • पात्र क्रमांक 6. अॅम्बुलन्सचा चालक

अक्षय अशी व्यक्ती आहे, ज्याने 14 जून रोजी सुशांतचा मृतदेह खोलीतून रुग्णवाहिकेत आणला होता. एका मुलाखतीत अक्षयने सांगितले होते की, सुशांतच्या खोलीत प्रवेश करताच त्याने पाहिले की त्याचा मृतदेह आधीच सीलिंगवरुन काढून खाली पलंगावर ठेवलेला होता. पोलिसांच्या सूचनेनंतर त्याने तो मृतदेह एका चादरीत गुंडाळला आणि स्ट्रेचरवरुन काही लोकांच्या मदतीने तो इमारतीतून खाली आणला. अक्षयने मुलाखतीत सांगितले होते की, रुग्णवाहिकेच्या व्हीलचेयरमध्ये काहीतरी अडचण आली होती, त्यामुळे सुशांतचा मृतदेह अॅम्बुलन्समध्ये बसत नव्हता. म्हणून तातडीने दुसर्‍या रुग्णवाहिकेला घटनास्थळी बोलावले गेले आणि मग ते पुढच्या दिशेने रवाना झाले होते. त्या दिवसाचा घटनाक्रम रिक्रिएट करताना सीबीआय अक्षयची पुन्हा चौकशी करू शकते.

श्रुती मोदी, सुशांत आणि रिया चक्रवर्ती दोघांचेही काम पाहात होती.
श्रुती मोदी, सुशांत आणि रिया चक्रवर्ती दोघांचेही काम पाहात होती.
 • पात्र क्रमांक 7. श्रुती मोदी, सुशांतची माजी मॅनेजर

बिझनेस मॅनेजर म्हणून श्रुती सुशांतचे फायनान्स आणि चित्रपटाचे काम सांभाळत असे. श्रुतीची अंमलबजावणी संचालनालय आणि मुंबई पोलिसांच्या पथकाने दोनदा चौकशी केली आहे. तिने दोन्ही ठिकाणी सुशांतच्या कामाशी संबंधित आणि त्याच्या गुंतवणूकीशी संबंधित माहिती दिली आहे. श्रुतीने मुंबई पोलिसांना सांगितले की, रिया चक्रवर्ती सुशांतच्या आयुष्यात आल्यानंतर तिनेच त्याचे सर्व निर्णय घ्यायला सुरूवात केली होती. श्रुतीने फक्त सुशांतचेच नव्हे तर रियाचेही टॅलेंट मॅनेजर म्हणूनही काम पाहिले होते. सुशांतच्या वडिलांनी बिहारमध्ये दाखल केलेल्या एफआयआरमध्ये श्रुती मोदीच्या नावाचाही समावेश आहे.

सॅम्युएल मिरांडाविरोधात सुशांतच्या वडिलांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे.
सॅम्युएल मिरांडाविरोधात सुशांतच्या वडिलांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे.
 • पात्र क्रमांक 8. सॅम्युएल मिरांडा, सुशांतचा मॅनेजर

सॅम्युएल सुशांतच्या घरी हाऊस मॅनेजर म्हणून काम करत होता. सुशांतच्या घरातील कर्मचार्‍यांची व घरातील खर्चाची नोंद ठेवणे हे त्याचे काम होते. सॅम्युएलची पोलिसांनी चौकशी केली नाही, परंतु सुशांतच्या मृत्यूशी त्याचे नाव जोडल्यामुळे ईडीनेही तक्रारीत त्याचे नाव नोंदवले आहे. सुशांतच्या वडिलांनीही आपल्या तक्रारीत सॅम्युएलचे नाव घेतले आहे. सॅम्युएलची ईडीने 5 ऑगस्ट आणि 6 ऑगस्ट रोजी चौकशी केली होती. मनी लाँडरिंग प्रकरणात त्याचा जबाब नोंदविण्यात आला आहे. सॅम्युएल मिरांडालासुद्धा रियानेच नोकरीवर ठेवले होते.

रियाचा भाऊ शोविक सुशांतच्या दोन कंपन्यात पार्टनर होता.
रियाचा भाऊ शोविक सुशांतच्या दोन कंपन्यात पार्टनर होता.
 • पात्र क्रमांक 9. शोविक चक्रवर्ती, रिया चक्रवर्तीचा भाऊ

सुशांतच्या दोन कंपन्यांमध्ये भागीदार आणि रियाचा भाऊ शोविक चक्रवर्ती सुशांतच्या वडिलांच्या एफआयआरमधील आरोपी आहे. रिया चक्रवर्ती नंतर शोविक सुशांतच्या वतीने सर्व निर्णय घेत असे. त्याची ग्राफिक्स कंपनी चालवण्याचे कामही शोविकच्या खांद्यावर होते. रिया आणि सुशांत सोबतच शोविक ही अशी व्यक्ती आहे जी दोघांच्या पर्सनल ट्रिपमध्ये बर्‍याचदा त्यांच्याबरोबर असायची. शोविकची मुंबई पोलिसांनी दोनदा आणि ईडीने 3 वेळा चौकशी केली आहे. एकदा शोविकची ईडीकडून 18 तास चौकशी केली गेली.

रिया आणि सुशांत 2018 पासून सोबत होते. मात्र त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली होती.
रिया आणि सुशांत 2018 पासून सोबत होते. मात्र त्यांनी सप्टेंबर 2019 मध्ये आपल्या नात्याची सार्वजनिकरित्या कबुली दिली होती.
 • पात्र नंबर 10, रिया चक्रवर्ती, सुशांतची गर्लफ्रेंड

सुशांतच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भूमिका असलेल्या रिया चक्रवर्तीजवळ त्याच्या मृत्यूचे सर्वात मोठे रहस्य असू शकते. रियाने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की ती सुशांतसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होती. मुंबई पोलिस आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या पथकाने तिची 2-2 वेळा चौकशी केली आहे. रिया सुशांतच्या तीन कंपन्यांमध्ये भागीदार होती. रियाने एम टीव्हीचा एक शो होस्ट करण्यासोबतच काही हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि 15 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी पाटण्यात दाखल केलेला खटला मुंबईत हस्तांतरित करावा, म्हणून सुप्रीम कोर्टात तिने खटला दाखल केला होता. मात्र तो फेटाळण्यात आला असून कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. गरज भासल्यास सीबीआय तिला अटक करू शकते, असे म्हटले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...