आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sushant Singh Rajput Death Death Case Investigation Latest Updates | Mumbai Police On Production House Manager Ashish Singh And Ankita Lokhande

सुशांत आत्महत्या प्रकरण:जुना मित्र संदीप सिंह आणि एका प्रॉडक्शन हाऊसच्या मॅनेजरची वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये चौकशी, आतापर्यंत 25 जणांचे जबाब नोंदवले गेले

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक प्रॉडक्शन हाऊसचे मॅनेजर आशीष सिंह यांची शुक्रवारी जवळपास तासभर चौकशी झाली. - Divya Marathi
एक प्रॉडक्शन हाऊसचे मॅनेजर आशीष सिंह यांची शुक्रवारी जवळपास तासभर चौकशी झाली.
  • पोलिसांनी सांगितल्यानुसार, सुशांत सिंह राजपूत आणि अंकिता लोखंडे यांचा कॉमन फ्रेंड संदीप एस. सिंहला चौकशीसाठी बोलविण्यात आले होते.
  • पोलिसांनी आतापर्यंत सुशांतचे कुटुंबीय, मित्र, जुने मॅनेजर, टीम मेंबर्स, घरातील कर्मचारी आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्यासह 25 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी शुक्रवारी वांद्रे पोलिसांनी एका प्रसिद्ध प्रॉडक्शन हाऊसचे मॅनेजर आशीष सिंग यांना चौकशीसाठी बोलावले होते. मिळालेल्या माहितीनुसार, 2012 मध्ये आशीष यांनी सुशांत सिंह राजपूतचा एका नामांकित प्रॉडक्शन हाऊसबरोबर करार करुन दिला होता. याशिवाय सुशांत सोबत राहणारा त्याचा मित्र आणि रुममेट संदीप सिंहचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. संदीप हा सुशांत आणि अंकिता लोखंडे यांचा कॉमन फ्रेंड आहे. दोघांच्या चौकशीनंतर वांद्रे पोलिस स्टेशनबाहेर हजर असलेल्या मीडियाने त्यांना प्रश्न विचारले असता, दोघेही काहीही न बोलता तेथून निघून गेले.

चौकशीसाठी वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये जाताना संदीप सिंह
चौकशीसाठी वांद्रा पोलिस स्टेशनमध्ये जाताना संदीप सिंह
  • ओटीटी प्लॅटफॉर्मवर शेवटचा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चाहते संतप्त 

24 जुलै रोजी सुशांतचा 'दिल बेचार' हा शेवटचा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. निर्मात्यांच्या या निर्णयामुळे सुशांतचे कुटुंबीय आणि चाहते मात्र नाराज आहेत. सुशांतचा हा चित्रपट थिएटरमध्येच प्रदर्शित करावा, अशी मागणी कुटुंबीय आणि चाहत्यांनी केली आहे. हा चित्रपट थिएटरऐवजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर अर्थात डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात येणार आहे.  

  • मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ शकतो सुशांतचा चुलत भाऊ 

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला पाहिजे, असे सुशांतच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.  सुशांतचा चुलत भाऊ आणि भाजपचे आमदार नीरजसिंग बबलू यांच्या म्हणण्यानुसार, सुशांतचा 'दिल बेचार' हा शेवटचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर नव्हे तर थिएटरमध्ये प्रदर्शित झाला पाहिजे. यासंदर्भात ते दिग्दर्शक मुकेश छाबरा यांच्याशी बोलणार आहेत, पण जर मार्ग निघाला नाही तर ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनाही भेटण्याचा प्रयत्न करतील आणि या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेतील.

  • आतापर्यंत 25 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले गेले

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत त्याचे कुटुंबीय, मित्र, जुने मॅनेजर, टीम मेंबर्स, घरातील कर्मचारी आणि गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती यांच्यासह 25 हून अधिक लोकांचे जबाब नोंदवले आहेत. एका मोठ्या प्रॉडक्शन हाऊसने कराराची प्रतदेखील पोलिसांकडे सादर केली आहे, ज्यावर सुशांतने 2012 मध्ये सही केली होती. त्याच्या डॉक्टरांचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. त्याच्या सीएचा जबाब बुधवारी नोंदविण्यात आला आहे. अजूनही या प्रकरणात इतर बर्‍याच जणांची चौकशी केली जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...