आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रिया आणि गौरवचे ड्रग्ज कनेक्शन:गोव्याचा हॉटेल व्यावसायिक गौरव आर्यच्या घर आणि रिसॉर्टवर नार्कोटिक्स ब्युरोचे छापे, ईडीने 31 ऑगस्टपर्यंत मुंबईत चौकशीसाठी बोलावले

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रिया आणि गौरव आर्य यांच्यातील ड्रग्सविषयीचे संभाषण ईडीने रिट्रीव्ह चॅटमधून उघडकीस आणले आले.
  • वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रियानेही गौरवला ओखळत असल्याची कबुली दिली आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगल उघडकीस आल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची (एनसीबी) टीम गोव्यात आता सक्रिय झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित महत्त्वाचे पात्र हॉटेल व्यावसायिका गौरव आर्यच्या शोधात या पथकाने शुक्रवारी त्याच्या हॉटेल व घरी छापा टाकला आहे. परंतु, दोन्ही ठिकाणी त्याची भेट झाली नाही.

दरम्यान, ईडीची टीम त्याला समन्स बजावण्यासाठी त्याच्या अंजुना स्थित रिसॉर्टवर पोहोचली होती. तो इथेही हजर नव्हता. टीमने त्याच्या हॉटेलबाहेर समन्स बजावण्याची नोटीस चिकटवली आहे. यात त्याला 31 ऑगस्टपर्यंत चौकशीसाठी मुंबई कार्यालयात पोहोचण्यास सांगितले आहे.

यापूर्वी गुरुवारी रात्री एनसीबीने गोव्यातील सियोलिम भागात गौरवच्या घरावर छापा घातला. परंतु घरमालक म्हणाले की, गेल्या कित्येक महिन्यांपासून तो येथे येत नाहीये. दोन पोलिस अधिकारी साध्या ड्रेसमध्ये चौकशीसाठी त्याच्या रिसॉर्टमध्ये गेले, पण परत आल्यानंतर त्यांनी माध्यमांना कोणतीही माहिती दिली नाही. गौरवचे नाव रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून समोर आले होते.

ईडीने गौरवच्या रिसॉर्टवर समन्सची नोटीस चिकटवली आहे.
ईडीने गौरवच्या रिसॉर्टवर समन्सची नोटीस चिकटवली आहे.

रियाने मुलाखतीत गौरवला ओळखत असल्याची दिली कबुली रियाचे व्हॉट्स अॅप चॅट समोर आल्यानंतर गौरव ड्रग पॅडलर असल्याचे म्हटले जात आहे. चॅटमध्ये हे सिद्ध झालंय की रिया आणि तिचे लोक गौरवशी ड्रग्जविषयी बोलायचे. आज तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रियाने गौरवला ओळखत असल्याची कबुली दिली आहे. दुसरीकडे गौरवने एका वृत्तवाहिनीशी बोलताना या प्रकरणात आपले स्पष्टीकरण दिले. गौरवने सांगितले की, तो 2017 पूर्वीपासून रियाला ओळखत होता, परंतु ड्रग्जसंदर्भात त्यांच्यात कोणतीही चर्चा झालेली नाही. त्याने सांगितल्यानुसार, तो हॉटेल व्यवसायाशी संबंधित आहेत आणि कोणत्याही रॅकेटशी त्याचा संबंध नाही.

रिया आणि गौरव यांचे तीन चॅट्स आले होते समोर

पहिला चॅट: (रियाने गौरवला केला होता) 8 मार्च 2017 रोजी गौरवला पाठविलेल्या या चॅटमध्ये रियाने लिहिले की, 'जर आपण हार्ड ड्रग्जविषयी बोलत असून तर मी त्या ड्रग्जचा जास्त वापर केलेला नाही'

हे रिया आणि गौरवचे रिट्रीव वॉट्स अ‍ॅप चॅट्स आहेत. त्यांच्यात ही बातचीत 2017 मध्ये झाली होती.
हे रिया आणि गौरवचे रिट्रीव वॉट्स अ‍ॅप चॅट्स आहेत. त्यांच्यात ही बातचीत 2017 मध्ये झाली होती.

दुसरा चॅट: (रियाने गौरवला केला होता) यामध्ये रिया गौरवला विचारते, 'तुझ्याजवळ एमडी आहे का?' येथे एमडीचा अर्थ 'मिथिलीन डायऑक्सी मेथाम्फेटामाइन' असा आहे, हा एक ड्रग्जचा प्रकार आहे.

या चॅटमध्ये रियाने ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले आहे.
या चॅटमध्ये रियाने ड्रग्ज घेतल्याचे कबुल केले आहे.

तिसरा चॅट : 8 मार्च 2017 रोजी या चॅटमध्ये रिया गौरवला म्हणाली, "जास्त नशा असलेल्या ड्रग्जविषयी बोलायचे झाल्यात तर मी ते जास्त घेतलेले नाही. एकदा एमडीएमए घेतले होते.' रियाने ड्रग्ज घेतल्याचे या चॅटमधून स्पष्ट झाले आहे. यानंतर ती गौरवला विचारते, "तुझ्याजवळ एमडी आहे का?"

या चॅटमध्ये मिरांडाने स्टफ (ड्रग्ज) संपल्याचे रियाला सांगितले आहे.
या चॅटमध्ये मिरांडाने स्टफ (ड्रग्ज) संपल्याचे रियाला सांगितले आहे.
  • गौरवचे गोव्यातील अंजुना येथे आहे रिसॉर्ट

गौरव आर्यकडे गोव्यातील अंजुना आणि वागाटोर येथे रिसॉर्ट्स आणि कॅफे आहेत. गौरव जुन्या दिल्लीचा रहिवासी असून त्याने आपल्या करियरची सुरुवात एका जाहिरात कंपनीतून केली. त्याने युनायटेड किंगडममधून संगीताचे शिक्षण घेतले आणि 2007 मध्ये गोव्यात आला.

हा फोटो गौरव आर्यच्या अंजुना स्थित रिसॉर्टचा आहे.
हा फोटो गौरव आर्यच्या अंजुना स्थित रिसॉर्टचा आहे.
  • वडील हॉस्पिटॅलिटी बिझनेसमध्ये तर बहिणीचा आहे कपड्यांचा ब्रँड

गौरवचे वडील राम आर्य हे हॉस्पिटॅलिटीच्या व्यवसायात आहेत. गौरव हा मीडिया इंडस्ट्रीशीही संबंधित आहे. त्याचा भाऊ अविजीत आर्यची डिजिटल मार्केटींग एजन्सी आहे, जी हॉटेलची कमाई वाढविण्याचे काम करते. गौरवची बहीण सिमरन डिझाईनर कपड्यांचा ब्रँड 'कारोसेल' चालवते, ज्याचे आउटलेट रिसॉर्टमध्येच आहे.