आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सुशांतच्या मृत्यूनंतर अंकिताने सोडले मौन:सुशांत म्हणाला होता सर्वकाही संपले तरी पुन्हा साम्राज्य उभे करेल; 5 वर्षांची प्लानिंग केली होती, सर्वकाही साध्यदेखील केले

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या मृत्यूनंतर त्याची एक्स-गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने पहिल्यांदा एका टीव्ही चॅनेलला मुलाखत दिली.
  • अंकिता म्हणाली - सुशांतवर कधीही यशाचा परिणाम झाला नाही, किंवा अपयशामुळे तो अस्वस्थदेखील झाला नाही.
  • सुशांतचा ट्रेनर समी अहमदने दावा केला - सुशांत काही औषधे घेत होता, ज्यामुळे त्याचे पाय थरथरत होते.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात आता त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेने नुकतीच एका टीव्ही वाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने सुशांतसंबंधी अनेक गोष्टींची माहिती दिली. या मुलाखतीत अंकिताने सांगितले की, सुशांतसाठी पैसा कधीही महत्त्वाचा नव्हता. जर सर्वकाही संपले तरीदेखील पुन्हा एकदा साम्राज्य उभे करेल, असे तो कायम म्हणायचा, असे अंकिताने सांगितले. दुसरीकडे, या प्रकरणात बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयात कॅव्हिएट दाखल केले आहे. हे कॅव्हिएट रिया चक्रवर्तीच्या याचिकेसंदर्भात केले गेले आहे, ज्यात तिने पटना येथे दाखल करण्यात आलेला खटला मुंबईत वर्ग करण्याची मागणी केली आहे. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी पाटणा पोलिसांत रियासह सहा जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.

अंकिताने अलीकडेच रिपब्लिक टीव्हीला मुलाखत दिली. ती म्हणाली, "सुशांतसाठी पैसा ही खूप लहान गोष्ट होती, परंतु त्याचे पॅशन खूप मोठे होते. त्याची सर्जनशीलता, चित्रपटांबद्दलची त्याची आवड खूप मोठी होती. तो प्रत्येक गोष्ट मोठ्या जोमाने करायचा. मी त्याला पाहिले आहे, तो आनंदाने नाचत असे. श्यामक दावर यांच्या ग्रुप बॅकग्राऊंडमध्ये तो डान्सर होता. त्याचा प्रवास येथून सुरू झाला आणि ‘दिल बेचार’ या चित्रपटापर्यंत येऊन संपला'', असे अंकिता म्हणाली.

  • सुशांतने पाच वर्षांचे प्लानिंग केले होते

अंकिता पुढे म्हणाली, ''सुशांतला डायरी लिहिण्याची सवय होती. तो या डायरीमध्ये त्याच्या पुढच्या पाच वर्षांचे प्लॅन लिहून ठेवत असे. सुशांतला सर्वजण नैराश्यामध्ये असलेल्या मुलापेक्षा एक हिरो म्हणून काय लक्षात ठेवतील. तो एक साधा मुलगा होता. छोट्या गावातून आलेला. त्याने इंडस्ट्रीमध्ये चांगले नाव कमावले होते. आतापर्यंत मी त्याला जितके ओळखते त्यावरून इतके सांगते की, तो डिप्रेशनमध्ये जाणारा व्यक्ती नव्हता. त्याच्या विषयी बायपोलर किंवा नैराश्यात असलेला मुलगा हे शब्द वापरणे चुकीचे ठरेल'', असे अंकिता म्हणाली. सुशांतच्या वडिलांनी सुशांतला शेती करायची असल्याचे म्हटले होते. हे खरं आहे सांगत ती म्हणाली, सुशांतला शॉर्ट फिल्म देखील तयार करायच्या होत्या.

  • 'त्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळायचा'

अंकिता मुलाखतीत पुढे म्हणाली, "सुशांत नेहमी मला एक गोष्ट सांगायचा की, यश आणि अपयाशात एक लाइन असते, जी महेंद्र सिंह धोनी फॉलो करतो. जेव्हा काही चांगले घडते तेव्हा तो सेटल असतो आणि जेव्हा काही वाईट घडले तेव्हादेखील तो सेटल असतो. मला असेच व्हायचे आहे. सुशांतवर कधीही यशामुळे तो कधीही हुरळून गेला नाही, किंवा अपयशामुळे कधी खचलादेखील नाही. सुशांतचा असा विश्वास होता की, आनंद हा एका क्षणाचा असतो. तो प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवत असे. त्याला मुलांना शिकवण्यात आनंंद मिळायचा. तारे बघून तो आनंदित व्हायचा. त्याने बर्‍याच मुलांना शिकवले होते. ही त्याची आवड होती", असे अंकिताने सांगितले.

  • सुशांतच्या ट्रेनरचा दावा- सुशांत विचित्र औषधे घेत होता

दरम्यान, सुशांतचा ट्रेनर समी अहमद याचीही एक मुलाखत समोर आली आहे. या मुलाखतीत समीने दावा केला आहे की, सुशांत गेल्या वर्षी डिसेंबरपासून काही विचित्र औषधे घेत होता. त्यामुळे त्याची प्रकृती खालावली आणि त्याचे पाय थरथरु लागले होते. जेव्हापासून त्याने रियाला डेट करण्यास सुरुवात केली होती, तेव्हापासून त्याच्या वागण्यात बरेच बदल झाले होते, असा दावाही समीने केला आहे.

  • सुशांतच्या तीन बँक खात्यातून रियाच्या कंपनीत पैसे ट्रान्सफर झाले

दुसरीकडे, सुशांतच्या कोटक महिंद्रा, एचडीएफसी आणि एक्सिस बँकेच्या खात्यातून रियाची कंपनी विविड्रेज रियालिटी एक्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तीन व्यवहार झाले आहेत. ही कंपनी रियाच्या नावावर सुरु झाली होती. रियाच्या सांगण्यावरूनच कंपनीच्या नावात स्वतःचे नाव सामिल करुन Reality चे स्पेलिंग बदलून ते 'Rhea'lity केले होते इतकेच नाही तर रियाने सुशांतला गळ घालून तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला कंपनीचे डायरेक्टरपद दिले होते.

  • सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केली

26 जून रोजी रियाविरोधात सुशांतच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. सुशांतचे वडील के.के सिंह यांच्या तक्रारीवरुन रियासह तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती आणि दोन व्यवस्थापक सौमिल चक्रवर्ती आणि श्रुती मोदी यांच्याविरोधात पाटण्यातील राजीव नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रिया चक्रवर्तीविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, फसवणूकीसह विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • रियावर फसवणुकीचा आरोप

सुशांतच्या वडिलांनी रियावर या आरोपांसह पैसे उकळल्याचा आरोपही केला आहे. पोलिसांना दिलेल्या आपल्या जबाबात त्यांनी सांगितले की, "माझ्या मुलाच्या बँक खात्याच्या स्टेटमेंटवरुन गेल्या एका वर्षात त्यातून सुमारे 15 कोटी रुपये काढले गेल्याचे मला समजले आहे. ज्या ठिकाणी पैसे ट्रान्सफर केले गेले त्या ठिकाणी माझ्या मुलाचा काही संबंध नव्हता. रियाने आपल्या कुटुंबीय व सहकार्‍यांसह मिळून माझ्या मुलाच्या बँक खात्यातून आणि क्रेडिट कार्डातून किती पैसे काढले? याची सखोल चौकशी व्हावी', असे ते म्हणाले आहेत.